फॉलोअर

निसटलेलं नातं

 निसटलेलं नातं



अक्षय केव्हाची टी पॉइंट वर समिधाची वाट पाहत होता अर्धा तास झाला तरी, समिधा तिथे उगवली नव्हती.
 त्यानंतर ती आली.
“किती उशीर गं ऽ, आधीच वेळझाला आहे आणि त्यात हा उशीर.” असा जरा मोठ्यानेच अक्षय तिच्यावर रागावला.
धापा टाकतच समिधा त्याच्याजवळ येऊन थांबली. थांबल्या थांबल्याच अक्षय चे हे बोलणे ऐकून, तिलाही उशीर झाल्याची खंतच वाटली.
 म्हणुन मग तीही बोलली,”अरे मला जरा बोलु तर देशील…”
“बोल पण आधी गाडीवर बस.जाता जाता बोलु आता.”
अक्षयचा पारा चढलेला, त्यात आणखी तेल नको, म्हणुन ती चुमित गाडीवर बसली.
“बरं बाबा ठीक आहे.”
तिथुनच त्यांना ‘राजगार्डन’ मध्ये जायचे होते.

अक्षय आणि समिधा गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते.या सहा महिन्यात तीलाच अक्षय आवडु लागला होता.म्हणुन ती काहितरी बहाणा करून त्याला भेटायचीच.
मग त्यालाही तीचे भेटणे सुखावुन जात होते.
समिधा ही कॉलेज करता करता डान्स चे क्लासही घेत होती.तर अक्षय हा कंपनीमध्ये जॉब करत होता.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

तर आज राजगार्डन मध्ये तिच्या शालेय मैत्रिणीचा साखरपुडा होता.आणि त्या कार्यक्रमाला तिला जायचे होते.
गाडी वर बसल्यावर तीने त्याला प्रश्न केला,” अक्षय,तु मला विचारले नाही,कि तुला एवढा उशीर का झाला?”
“कसा म्हणजे ट्राफिक मुळेच झाला असणार,दुसरे काय?” 
“नाही, एक अंध व्यक्ती, रस्ता क्रॉस करत असताना त्याची काठी हातातुन खाली पडली,तर ती त्याला लवकर सापडेना,शेवटी एक रिक्षावाल्याने खाली उतरून त्याची काठी त्यांच्या हातात दिली.मग त्या व्यक्तीला रस्ता ही पार करून दिला.”
“ओह असं आहे होय, मला वाटले ट्राफिक मुळेच उशीर झाला आहे मॅडमला.”

******

गेल्या आठ दिवसात तिला एकदा तरी हा प्रसंग आठवतच होता. तो म्हणजे ती अंध व्यक्ती आठवतच होती.

 एके दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर तिच्या ज्या डान्स टीचर होत्या.
त्या म्हणाल्या, “समिधा, तुझा डान्सचा क्लास आहेना? कसा चालू आहे, किती विद्यार्थिनी आहेत?”
“मॅडम छान चालू आहे, बारा ते पंधरा विद्यार्थिनी असतात क्लासमध्ये.”
 संमिधाने सांगितले.
“मग अगं मग तुला एक सुचवू का!”
“काय आहे?”
“अगं माझ्या मैत्रिणीच्या शाळेमध्ये, म्हणजे मूकबधिर विद्यालयात ‘विद्यालय वर्धापनदिन’ या निमित्त कार्यक्रम ठेवले आहेत. तर त्या कार्यक्रमात तुही सहभागी व्हावेस. म्हणजे तुझ्या क्लासच्या मुलींचा छान उद्बोधक डान्स किंवा नाटिका बसव, आणि स्टेजवर सादर कर.”
हे मॅडमचं बोलणं ऐकून तिच्या मन:पटलावर पुन्हा एकदा त्या दिवशीचा घडलेला प्रसंग जोरात टकटक करू लागला.
तीला स्वतः ला थोडंफार लिहिताही येत असल्याने तीने रात्रीच पेन ने वहीवर भरा भरा एक छोटा पण छान ,उद्बबोधक असा प्रसंग लिहुन काढला.
आणि डान्स च्या मुलींकडुन तो डान्स मध्ये बसवुन घेतला. 
 
 तीने विद्यालयात वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा प्रयोग यशस्वी रित्या सादर केला.तर त्याला प्रेक्षकांनी छान दाद दिली. त्या बद्दल समिधाचे कौतुक ही केले गेले.

तीला ही हे ‘कलेचे नवीन दालन आपल्या साठी ओपन झाले आहे’ म्हणून खुप खुप प्रौढ वाटत होतं.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

*****

समिधा कॉलेजमधून आली. हात पाय धुवून ती फॅन खाली बसली होती. आजीने तिच्या हातात कसले से पाकीट दिले.
“कोणी दिले आहे?” तीने विचारले.
“माहित नाही. बेल वाजली म्हणून मी दार उघडले, तर दारात अडकवलेले होते. बरं ते जाऊ दे, काय आहे यात?” आजीने विचारले. 

“हो पाहते.” असं म्हणून तिने ते पाकीट उघडले.आणि ती वाचु लागली.अन् ती ते वाचत असताना तीचा चेहरा आजीने वाचला.
“आजी गुड न्युज आहे गं, मी आत्ता ज्या विद्यालयात कार्यक्रम केला होता ना, त्या च विद्यालयाचे लेटर आहे.त्यांनी मला तिथे नोकरी ची ऑफर दिली आहे.”
“असं होय.बाबांना विचारून ठरव,मग काय ते.”

*******
गेल्या दीड दोन महिन्या पासुन समिधा खुपच बिझी झाली होती.अगदी शनिवारी सुध्दा तीला वेळ मिळत नव्हता.त्यामुळे तीचे आणि अक्षय चे भेटणेही कमी झाले होते.फोनवरच काय ते बोलणे व्हायचे.म्हणुनच मग दोघांच्याही मनात एकच विचार रूंजी घालु लागला.
’कीआता आपण लग्न करू या.’ 
अक्षय हा समिधाच्या लांबच्या नात्यातल्या असल्याने, तीच्या घरून या लग्नाला नकार नव्हता.
अक्षयने त्याच्या घरी विचारले असता, 

‘समिधा ही मुक बधीर विद्यालयात नोकरी करते’ म्हणुन वडिलांनी या लग्नाला नकार दिला होता.त्यांनी ‘नोकरी सोडत असली तर आम्ही लग्नाचा विचार करू.’
असे सांगितले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

अक्षयने समिधाला हे सांगितले, पण तीने “मी नोकरी सोडणार नाही.”
असे स्पष्ट सांगितले.तीला ही नोकरी सोडायचीच नव्हती.कारण तीच्या वडीलांचं छोटंसं भाजीचे दुकान होतं.आणि या दुकानाच्या जीवावर घर चालत होते.तीला आई नव्हती. ती तीच्या आजारपणात, विलाजा अभावी ह्यांना सोडुन गेली होती.

लहान पणी झालेल्या या आघाताचा सल 
नव्हे, ही जखम आजही जशीच्या तशी तिच्या काळजावर होती. म्हणुनच मग तीला ही नोकरी सोडायचीच नव्हती.
काही दिवसातच तीचे दुसऱ्या मुलांबरोबर लग्न झाले.
तसेच अक्षयचेही झाले.

*******
बारा वर्षानंतर….


समिधा एकुणच छान स्थिरावली होती.
लहान भाऊ होता,तर तो नोकरीला लागला होता.आजी देवाघरी गेली होती.वडिल आता खुप थकले होते. तीची काळजी खुप कमी झाली होती.
इकडे म्हणजे सासरी मिस्टर नोकरीला होते.ही पण नोकरी करत होती.तीला एक मुलगी ही झाली होती.
नोकरीच्या ठिकाणी म्हणजे मुक बधिर विद्यालयात देखील ती छान रूळली होती. त्यापेक्षा ती तेथील मुलांमध्ये एवढी रमली होती की प्रत्येक मुलाला, आईच्या मायेने,त्याच्या कलेनुसार ती शिकवण्याचा प्रयत्न करत होती. मुलांनाही मग शिकण्याची ओढ निर्माण होत असे. अगदी ‘रविवारी देखील सुट्टी नसावी’ असे ते सांगायचे. त्यांच्या भाषेत. 
नेहमीच निरनिराळे उपक्रम घेऊन त्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल? याचाच ती विचार करत असे. जणू या मुलांना पैलू पाडून आकार देण्यासाठीच तिचा जन्म होता. असेच तिला वाटत होते. मग हळूहळू या विद्यालयाची ती मुख्याध्यापिका ही झाली. त्यामुळे जास्त जबाबदारी तिच्यावर पडली.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 
*****

एके दिवशी साधारण आठ नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन, दोन व्यक्ती चौकशी करत ऑफिसमध्ये आले. बरोबर असणाऱ्या मुलाची एक आई होती, आणि दुसरे म्हणजे त्याचे आजोबा होते. म्हणजे हे आजोबा आपल्या नातवाला घेऊन या विद्यालयात आले होते. त्यांच्या मुक बधिर असलेल्या या नातवाला, ह्या विद्यालयात ॲडमिशन हवे होते.

समिधा ही ऑफीस मधे नव्हती. तर काही मुलांकडे ती स्वतःजातीने लक्ष देत होती. त्यांना घडवण्यामध्ये.
काही वेळेच्या प्रतीक्षेनंतर समिधा ऑफिसमध्ये आली. तर बसलेल्या त्या दोघांनीही नमस्कार केला.
“नमस्ते, बोला!” समिधा म्हणाली.
“ मॅम हा माझा मुलगा अर्पित.”नंदिनीने सांगितले. 
“या तुमच्या विद्यालयात अशा मुलांना छान व्यवस्थितपणे शिकवले जाते असं मी ऐकलं आहे. म्हणून तुमच्याकडे घेऊन आले आहे.” असं त्या मुलाच्या आईने सांगितले.
“किती गोड लेकरू आहे माझं पण. त्याच्यासोबत नियतीने…. .”
असं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांचे आजोबा म्हणाले. त्यांना पुढचे बोलू न देता संमिधाने थांबवले, आणि मुलाला स्वतः जवळ असलेल्या खुर्चीमध्ये तीने बसवले.
त्यानंतर एक मोठे चॉकलेट त्याला खायला दिले. ते चॉकलेट घ्यायच्या आधी त्याने आईकडे बघितले, तिने घे म्हटल्यानंतर त्याने ते घेतले.आणि खा म्हटल्यानंतर खायला सुरुवात केली. हे चॉकलेट खात असताना त्याचा व्यवस्थितपणा समिधाच्या लक्षात आला. ते खात असताना तिने त्याला हळूहळू काही प्रश्न विचारले, त्याची जवळीक अधिक व्हावी म्हणून..

त्यानंतर,”त्याची माहिती भरून द्या. त्या तीथेआणि तेच सांगतील तुम्हाला पुढे काय ते.”

अर्पितचे येथे ॲडमिशन झाले.
आणि तो दररोज शाळेला येऊ लागला.

‘२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन’
या दिनाच्या निमित्ताने विद्यालयात मुलांच्या निरनिराळ्या स्पर्धा होत असत. यामुळे आठ दिवस आधीच शाळेतील वातावरण हे स्पर्धामय होत असे.
या विविध स्पर्धां, म्हणजे दोरी च्या उड्या,धावणे, ‌ दोन टीम करून बॉल गोळा करणे,चमचा लिंबू, आणि चित्रकला स्पर्धा इ.

या निरनिराळ्या स्पर्धेत अर्पितनेही भाग घेतला.चमच्या लिंबुच्या स्पर्धेत त्याचा पहिला नंबर आला. आणि चित्रकला स्पर्धेत ही त्याने भाग घेतला होता.यामध्येही त्याचा पहिला नंबर आला.त्याने काढलेलं चित्र खूपच सुरेख होते. या स्पर्धेचा विषय छानपणे त्यांना समजावण्यात आला होता. त्यानुसार त्याने खूपच विचार करून चित्र काढले होते. इतर मुलांच्या तुलनेत ते चित्र कैकपटीने सुंदर होते. बोलके होते. रंग संगतीही अगदीच योग्य होती. त्यामुळे हे चित्र उठून दिसत होते. आणि आकर्षकही दिसत होते. याबरोबरच दिलेल्या विषयाला धरूनच हे चित्र काहीतरी आणखीन सांगून जात होते. आणि या सर्व वैशिष्ट्यामुळे हेच चित्र नंबर वन नव्हे तर सुपर वन ठरले होते.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात. 

सगळ्या स्पर्धांचे एके दिवशी बक्षीस वितरण झाले. या समारंभाला ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचे पालक, आणि इतर मुलांचे पालकही हजर होते. 
या पालकांमध्ये अक्षय ही हजर होता. म्हणजेच अर्पित हा त्याचाच मुलगा होता. आज परत त्याच्या मनाचा तळ ढहुळला होता, समिधाला गमावल्या बद्दलच्या खंतेने.
ज्या कारणाने नकार दिला होता. त्याच कारणाने तिची नव्याने ओळख झाली होती. तिच्या कामाची महती पटली होती. तिला आपण हीच ‘नोकरी सोड’ असे सांगत होतो. आजच्या या प्रसंगाने तो चांगलाच मनात खजील झाला होता.
घरी येऊन त्यानी त्याच्या वडिलांना सर्व सांगितले. तेव्हा त्यांनाही नकार दिल्याचा खूप पश्चाताप झाला. नेहमीच्या धाटणीने विचार करण्याऐवजी नव्या कल्पनेतून विचार केला असता तर कदाचित…??
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे)

@सौ.शुभांगी सुहास जुजगर.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या