फॉलोअर

असेच सुख नांदू दे

 असेच सुख नांदू दे 


"आई बाबांनी गोळ्या घेतल्या का?" पुजाने विचारले.
"नाही अजून, बसले आहे टीव्ही पाहत. त्यांना आठवणच करून द्यावी लागते. दोन्ही टाईम गोळ्या घेण्याची." आईने सांगितले.
बाबांना म्हणजे मोहनरावांना जरा बरे नव्हते. मागच्या एका आठवड्यापासून. त्यांच्याच संदर्भात हा गोळ्यांचा कोर्स डॉक्टरांनी दिलेला होता महिनाभरासाठी. 
"बाबा गोळ्या घेताना?" पूजा म्हणाली.
"हो घेतो, पाणी आन बरं." बाबा म्हणाले. 
पूजा ने त्यांना पाणी दिले. त्यानंतर त्यांनी गोळ्या घेतल्या.
 "पूजा बेटी तू आता झोपायला जा बरं." बाबा.
"हो जाते, तुम्हीही झोपा आता."
असं म्हणून पूजा तिच्या रूममध्ये निघून गेली. 

"अगं त्या पाहुण्यांचा फोन येऊन गेला, पाच वाजता. तू घरी नव्हतीस भजनाला गेली होती." मोहनरावांनी शकू ताईंना सांगितले. "अगं बाई हो का? देवच पावला म्हणायचं." शकू ताई आनंदाने म्हणाल्या.
"येतो म्हणाले मुलगी बघायला.कधी ते सांगतो नंतर.असे म्हणाले आहेत." मोहनराव म्हणाले.
"बघू, माणसे जर चांगली वाटली.आणि मुळात मुलगाही चांगलाच हवा. तरच पुढे जायचे, अन्यथा नाही."शकुताई. 
"हो मलाही तेच वाटते गं, तिचं उभ आयुष्य आहे तिच्यासमोर.म्हणूनच मन सैरभैर होते आहे बघ. नेमके काय करावे कळेना."
"असं म्हणून कसं चालेल हो." शकुताई म्हणाली. 
"हो ना. आपण सुनेच्या जबाबदारीतून एकदा मुक्त झालो की मग जरा निवांत वाटेल."
थोडे थांबून परत तेच म्हणाले," पण आपण काही चुकीचे तर नाही ना करत आहोत." मोहनरावांनी न राहवुन शकू ताईंना विचारले. "असं सारखं सारखं नका म्हणू बरंऽ. पण मी तुम्हाला सांगते. जे होईल ना ते नक्कीच चांगले होईल बघा. माझं मन मला सांगत आहे. तेव्हा तुम्ही आता निवांत झोपा बरं." शकू ताईंनी मोहनरावांना दिलासा दिला. म्हणून मग तेही आडवे झाले.
ही कथा आपण  kusumanjali.com वर वाचत आहात 
मोहनराव आडवे झाले होते. परंतू, त्यांना झोप येतच नव्हती. सारखी चुळबूळ आणि या कुशीवरून त्या कुशीवर वळणे त्यांचे चालु होते.
काही वेळानंतर त्यांचा फोन वाजला. आणि ते किरकिरतच उठले. 
'काय?? लोकांना काही वेळेचं बंधन आहे की नाही? ही काय वेळ झाली का फोन करायची?'
 असे बडबडतच त्यांनी फोन घेतला," हॅलोऽ हॅलोऽ कोण बोलते आहे?"

मोहनराव काहि वर्षापुर्वी रिटायर झाले होते. पोस्ट खात्यात ते नोकरी करत होते.त्यांना एक मुलगा होता आणि एक मुलगी होती.मुलीचे लग्न झाले होते.ती तिच्या संसारात सुखी होती.आणि मुलांचेही लग्न झाले होते.पण..?

अविनाश म्हणजे मोहनरावांचा मुलगा, हा सैन्यात भरती झाला होता.नोकरी लागल्यामुळे मग लग्न ही करायचे.असे ठरवुन, लगेच पुजा बरोबर त्याचे, खुपच थाटामाटात मोहनरावांनी लग्न लावले होते.

पुजा ही..
शकुताई आणि अविनाशच्या आयुष्यात अचानकच आलेली होती.
त्या दिवशी शकुताई चा सोमवार होता. आणि त्या उपवास, शंभु महादेवाचे दर्शन घेतल्यानंतरच सोडत असंत. मंदिर जरा लांब होते.म्हणजे गावा बाहेर.दर सोमवारी सकाळी कामं आवरली कि अविनाश हा गाडीवर त्यांना 
दर्शना साठी घेऊन जायचा. पण आज तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता.त्यामुळे घरी यायला उशीर झाला.
परंतु आई ही दर्शन घेतल्यानंतरच उपवास सोडते.हे त्याच्या लक्षात आले.म्हणुन तो आईला म्हणाला,"उठ पटकन,अन् चल महादेवाच्या दर्शनाला."
"आता भर उन्हात नको.संध्याकाळी जाऊ.तु आता जेवून घे."पण त्याने काहीच ऐकले नाही.
भर उन्हात, दुपारचे दोन अडीच वाजले असतील. शकुताईंनी दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा घालताना त्या,चक्कर येऊन पडल्या. तेव्हा पूजा तेथे जवळच बसलेली होती. तिने पाहिले की,'या पडल्या आहेत.' मग तिने लगेच त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. जवळ असलेले पाणी त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडले.आणि त्यांना हळूहळू सावलीत आणले. 
आणि मग "कोणी आहे का?" असे म्हणून मोठ्याने आवाज दिला. 
अविनाश बाहेर थांबला होता. कुणाशी तरी गप्पा मारत होता. पूजा चा आवाज ऐकून तो पटकन मंदिरात आला. 
"काय झाले आई तुला?" असे घाबरून त्याने विचारले.
पूजाने मग सांगितले की, "या मावशी, प्रदक्षिणा घालताना चक्कर येऊन पडल्या होत्या. मी त्यांना आता थोडे पाणी दिले प्यायला.तर त्या आता ठीक आहेत."
"आई कसं वाटतय आता तुला?"अविनाशने विचारले.
"बरं वाटतं आहे,पण आता मी काही गाडीवर येत नाही बाबा.मला तू रिक्षात बसवून दे."शकुताई.
"बरं मी रिक्षा आणतो." असं म्हणून तो रिक्षा आणण्यासाठी गेला.
"जेवलीस का गं ? काय नाव आहे तुझं?"शकुताई.
"नाही अजुन, डबा आणला आहे.पण मैत्रिणींची वाट बघत आहे.त्यांचा क्लास संपला की, मग येतील त्याही इथेच. माझं नाव पुजा आहे." पुजा.
मंदिराच्या जवळच कॉलेज होते.
"चल माझ्यासोबत तू पण माझ्या घरी. पुन्हा अविला सोडायला लावते तुला घरी."
"नको मावशी." पूजा म्हणाली.
"अगं चल ना. आजच्या दिवशी तू माझ्यासोबत जेवण कर."
"अहो नकोऽ." पण तिचे काहीच नाही ऐकले शकुताईने.
 तिला घेऊनच त्या घरी आल्या. तिला स्वतः सोबत जेऊ घातले आणि गोडही खायला दिले. मग तिला होस्टेल वर अविनाशने नेऊन सोडले .
तिच्यासोबत गप्पा मारताना असे कळाले की, ती जवळच्या नात्यातलीच मुलगी आहे. त्यामुळे "परत ये ग." असे शकूताईने तिला आवर्जून सांगितले.शकुताईंच्या ती मुलगी मनात भरली होती.
ही कथा आपण  kusumanjali.com  वर वाचत आहात.
योगायोगाने काही दिवसानंतर अविनाश हा सैन्यात नोकरीला लागला.
अन् लगेच मग उशीर न करता शकुताई ने पुजालाच सुन करून घेतले.अविचे आणि तिचेहि चांगलेच जमु लागले होते.जणू शंभू महादेवानेच त्यांच्या आयुष्यात पुजाला पाठवले होते.
…..

लग्न झाले आणि काही दिवस राहून अविनाश ड्युटीवर हजर झाला. पूजाला घरीच आई बाबाजवळ ठेवून.

एके दिवशी सीमेवर काम करत असताना, अचानकच एक नव्हे तर तीन चार गाड्यात काही सेकंदाच्या फरकाने स्फोट झाले. असे झालेले पाहून सगळेजण घाबरले. गाडीत कोण कोण होते? खाली कोण कोण होते? हे कोणाला काहीच माहित नाही. बरेच जन जखमी झाले. कोणी तर त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
या घटनेनंतर,
अविनाशही सापडला नाही. सर्वांनी खूप शोधले पण तो सापडला नाही. की त्याचा मृतदेह ही सापडला नाही.

ही बातमी भयंकर वादळासारखी मोहनरावांच्या आणि शकुताईंच्या आयुष्यात येऊन धडकली. आणि क्षणातच घरातला आनंद हरपला.
यामुळे शकू ताईंचे तर भानच हरपले होते. आणि पूजाची ही अवस्था खुपच कठीण झाली होती.

…….

आज या घटनेला जवळ जवळ चार वर्ष उलटून गेले होते. त्याचा शोध घेऊन घेऊन सगळे थकले होते. पण काहीच हाती लागले नव्हते.

म्हणूनच मग 'पूजाचे दुसरे लग्न लावून द्यायचे' ठरवले होते. कारण तिचेही संपूर्ण आयुष्य तिच्या समोर उभे होते. "सासू-सासरे म्हणून आम्ही किती दिवस पुरणार तुला?" असे ते म्हणत होते. हे दोघांचेही म्हणणे होते. पूजा नाहीच म्हणत होती. "मी वाट बघेन त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत" असे ती म्हणत होती. 

पण तिचेही आयुष्यात काही स्वप्न होते.. फुलण्याचे दिवस होते.. आनंदाने बहरण्याचे दिवस होते.. पण या घटनेने ते कोमजले होते.. सांडले होते.. आणि तिला भक्कम आधाराचीही गरज होती. म्हणून मग दोघांनी ही ठरवले की चांगला मुलगा बघुन, हिचे लग्न लावुन द्यायचे.

……

आज शकुताई जरा लवकर, म्हणजे पहाटेच उठल्या. सर्व साफसफाई, सडा, रांगोळी, करून त्या घरातील कामाला लागल्या होत्या. काही फराळाचे पदार्थ लाडू आणि गुलाबजाम त्यांनी कालच करून ठेवले होते. 
पुजालाही "पटापट आवरून छान तयार हो. पाहुणे येणार आहेत तुला बघण्यासाठी." असे सांगितले होते.
आईने आज हे एवढ्या आनंदाने सांगितले होते. त्यांचे आजचे हे रूप पाहून. 
पूजाला वाटले की,'हे मला घरातून घालवायलाच पाहत आहेत.इथे माझ्या मनाची अवस्था मात्र नाजूक झाली आहे.अविनाश ला मी विसरू शकत नाही. आणि यांना माझ्या लग्नाची तयारी करायची आहे.
तरीपण मी आजच्या या कार्यक्रमाला नकार ही देऊ शकत नाही.' असाच काहीसा विचार तिच्या मनात घोळत होता.माहेरी तिला भक्कम आधाराचं असं कुणीही नव्हते.म्हणुनच दुसऱ्या लग्नासाठी ती तयार झाली होती.
आई, बाबा दोघेही मस्त तयार झाले होते.
बाबानी आज कितीतरी दिवसांनंतर कडक इस्त्रीचे कपडे घातले होते. ते पाहुण्यांची वाट पाहत होते.आणि त्यांचे सारखेच आत बाहेर चालले होते.
पुजा तयार होत होती.
"अगं पुजा, तुझे मंगळसूत्र कुठे आहे?मला दे बरे.जरा काम आहे."शकुताई आरतीचे ताट करता करता पुजाला म्हणाल्या.
"कश्याला पाहिजे? देते काढुन कपाटातुन." पुजाने घुश्यातच सांगितले.
"हेआरतीचे ताट कश्याला आई?"पुजाने विचारले.
"असु दे, मुलाला औक्षण करावे लागते आल्यावर."शकुताई नजर चुकवून म्हणाल्या.
ही कथा आपण.   kusumanjali.com  वर वाचत आहात 
इतक्यात बाहेर अविनाश चे मित्र आले. आणि त्यांनी बाबांच्या पायाला हात लावून नमस्कार केला.अन् बाबांना ते बाहेर घेऊन गेले.
बाहेरच या बापलेकाची भेट घडवुन आणली.

हो.अविनाश हा चार वर्षानंतर अगदी सुखरूप घरी परत आला होता.

दोघांच्या ही डोळ्यातुन पुर वाहत होता.भावना निशब्द झाल्या होत्या.लगेच अविनाशने स्वतः ला सावरले कारण आईलाही भेटण्यासाठी तो आतुर झाला होता.बाबांना धरूनच त्याने घरात आणले.
घरात आईला आणि पुजाला पाहुन त्याने दोघींनाही घट्ट मिठी मारली.क्षणभर सगळं वातावरण खुपच भावुक झाले होते."कुठे होतास रे पोरा इतक्या दिवस?"असे एक नाही, अनेक प्रश्न त्याला दोघेही विचारत होते.

शकुताई आणि बाबा या दोघांनाही अविनाश येण्याची पुर्व कल्पना होती. पण पुजाला मात्र हे सगळेच अनपेक्षित होते."हे नक्की खरेच आहे की, आहे स्वप्न?"असा प्रश्न ती स्वतः लाच विचारुन चिमटा काढत होती. 
सगळेच जण आज खुप खुप आनंदी झाले होते.आई बाबांच्या आनंदाला तर पारावारच उरला नव्हता.

थोड्या वेळाने शकुताईने दोघांचनाही पाटावर बसवले.आणि औक्षण करून ओवाळले.
"पुजाला हे कुंकू लाव आणि हे मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घाल."असे त्यांनी अविनाश ला सांगितले.
"आणि आयुष्यभर तुम्हा दोघांच्या जीवनात हे 
स्वर्ग सुख असेच नांदु दे."असा त्यांनाआशीर्वाद दिला.


सौ. शुभांगी सुहास जुजगर.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या