फॉलोअर

लहान माझी बाहुली...

 लहान माझी बाहुली..


आज स्वप्नाचा साखरपुडा. पाहुणे मंडळी आलेली होती. स्वप्नाने पार्लरमध्ये जाऊन ब्लिच, फेशियल, वॅक्स करून घेतले होते. मेहंदी ही परवाच काढली होती.

आजही ती हलकासा मेकअप आणि साधीशी पण सोबर अशी हेअर स्टाईल करून घेण्यासाठी पार्लरला जाणार होती. घरातील सर्व आवरा आवर तीने केली. वहिनी आल्यापासून जवळजवळ सगळेच कामं ती म्हणजे वहिनीच करत होती. त्यात आता स्वप्नाचे लग्न ठरले म्हणून मग तिनेही नणंदेला, "काम करू नका, राहू द्या. मी करेन जमेल तसे." पण तीही नवीनच होती सहा महिन्यापूर्वीच भावाचे म्हणजे संकेत चे लग्न झाले होते. वडील नेमकेच रिटायर झाले होते. स्वप्नाला आणखी एक भाऊ म्हणजे सचिन. संकेत मोठा सचिन लहान आणि त्यापेक्षा लहान नवसाने झालेली ही स्वप्ना.

…..


साधना ताईच कुटुंब म्हणजे, दोघे नवरा बायको आणि दोन मुलं.मिस्टर सर्विसला होते. दुसरा मुलगा झाल्यावर त्या खूपच नाराज झाल्या. त्यांना मुलगी हवी होती. आणि भावाला बहीण, दोन घरांना उजळून प्रकाशमान करणारी लेक हवी होती. पण झाला मुलगा.. म्हणून मग साधना ताईने देवाला नवस केला. 'की मला मुलगी होऊ दे.' 

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


देवाने त्यांचे ऐकले. त्यांना सचिनच्या पाठीवर मुलगी झाली. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणून मग 'स्वप्ना' असे त्यांनी नाव ठेवले. 

आईची अतिशय लाडकी ही. आणि वडिलांची ही लाडकीच. तिच्या भावभावना कधीच

दुखवित नव्हते. संकेतही तिच्यावर माया करत होता.सचिनची आणि तिची नेहमीच कुठल्यातरी कारणाने भांडणे होत होती. लहानपणी एखाद्या बाहुलीसारखी ही दिसत होती. थोडे डोळे निळसर घारे होते. केस हलकेसे कुरळे होते. मग साधना ताई तिला 'माझी बाहुलीच आहे.' म्हणत असत. कधी कधी छकुली ही म्हणत होती.


आता ही तिघेही मोठी झाली होती. म्हणजे संकेत अकरावीला गेला होता. सचिन नववी, आणि ही छोटी स्वप्ना सातवीत.

 दरम्यान सुरेश रावांनी स्वतःचे घर बांधले होते. दोन बेड, हॉल, किचन त्याचबरोबर दोन रूम किरायाने देण्यासाठी पण बांधल्या होत्या. सोबतीला कुणी असावे म्हणून.

दारासमोर छान पांढरे शुभ्र संगमरवरी असे 'तुळशी वृंदावन' ही बनवले होते. त्यामध्ये साधना ताईंची तुळस ही हिरवीगार, आणि मस्त अशी मंजुळेने लखडलेली कायम असायची. तुळशी वृंदावना समोर दररोज सुरेख अशी रांगोळी असायची आणि सांजवेळी न चुकता दिवा तेवत असे.

अशी ही शांत स्वभावाची, समाधानी असलेली गृहिणी या घरात नांदत होती.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


असे हे सगळे सुखाचे चित्र होते. पण त्याला कुणाची तरी नजर लागली.


एके दिवशी ओळखीतल्या कुणाचे तरी लग्न होते. म्हणून काही मैत्रिणी सोबत साधनाताई लग्नाला गेल्या. मुलं कोणीच गेलेले नव्हते. लग्न लावून येताना गाडीला छोटासा एक्सीडेंट झाला. या एक्सीडेंट मध्ये साधनाताई पूर्ण झोपेतच होत्या. म्हणून त्यांचे डोके जोरात आदळले. बाकीच्यांना थोडा थोडा मार लागला.सर्वांना दवाखान्यात ऍडमिट केले.पण साधनाताई शुद्धीवरच येत नव्हत्या.

या मुळे सगळे कुटुंब दु:खात बुडाले होते.तिघेही एकमेकांना धरून रडु लागली.संकेतने मग प्पंप्पांचे अश्रु पुसले.आणि त्यांना मिठी मारली. तो त्यांना म्हणाला,"पंप्पा काही काळजी करू नका,आई नक्कीच बरी होईल.तिच्या या बाळांसाठी."असे म्हणुन सर्व च जणं रडु लागली.

  काही दिवसात सगळ्या जणी बऱ्या होऊन घरी गेल्या. पण साधनाताई मात्र शुद्धीवरच आल्या नव्हत्या. महिना, दोन महिने, त्यानंतर वर्ष म्हणून मग त्यांना घरीच शिफ्ट केले होते. सगळी काळजी घेण्यासाठी सिस्टर अरेंज केली होती.

    

या काळात घराची संपूर्ण जबाबदारी, छोट्या बाहुली वर येऊन पडली. सुरेश रावांना आई होती मग त्या इथेच राहू लागल्या. तेवढीच मग स्वप्नाला मदत होऊ लागली.

असेच दिवस जात होते. साधना ताईंना वर्ष, दोन, वर्ष करत करत अजूनही त्या कोमातच होत्या. त्यांच्या या बाहुलीचा आज साखरपुडा होता.

सहा महिन्यापूर्वीच संकेत चे लग्न केले होते. म्हणून मग, घरातील सर्व जबाबदारी तिने उचलली होती.

पाहुण्यांची लगबग घरात सुरूच होती. मामा- मामी, मावशी-काका, आत्या-मामा, आईची आई असेच सर्व जन आवर्जून आलेले होते. ताईच असं झाले म्हणून मामाने तिचे भरपूर लाड केले होते. मावशी ही प्रत्येक सणावाराला इथे येऊन, तिच्यासाठी कपडे मिठाई घेत होती. कधीतरी स्वतःच्या घरी बोलावत असे पण स्वप्नाच तिकडे जायला नकार देत होती. कारण तिकडे गेले की मग भाऊ आणि वडील हे एकटे राहत होते. त्यामुळे तिला करमत नसायचे.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


नवऱ्या मुलाकडची पाहुणेमंडळी आली. आणि त्यांनी पटापटा सगळी तयारी केली साखरपुड्याची. 

स्वप्नाच्या आत्याच्या नणंदेच्या मुलाशी हे लग्न, म्हणजे निखिलशी ठरले होते. कारण त्याची आई खूपच प्रेमळ होती. त्यामुळे स्वप्नाला आईची उणीव जाणवणार नव्हती. किंवा भरून येणार होती. असे वाटले. पण मुलगाही कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. दिसायलाही छान रुबाबदार आणि सुस्वभावी होता.समजुतदार ही होता.सगळ्य परिस्थिती ची त्यांना आधीच कल्पना होती.यामुळे स्वप्नाला या घरात परकं वाटणार नव्हतं.


"चला आवरा लवकर उशीर होतो आहे." असे स्वप्नाच्या वडिलांनी म्हणजे सुरेश रावांनी सगळ्यांना घराच्या दारातून सांगितले. हे ऐकून पटापटा सगळ्यां जनी आवरून बाहेर आल्या साहित्य सर्व आधीच बाहेर म्हणजे स्टेजवर नेऊन ठेवलं होतं. स्वप्नाही तयार होऊन आलेली होती. सिम्पल पण ती खूप छान दिसत होती रंग गोरा, नाजूक जीवनी, सरळ नाक, हलके निळसर डोळे आणि त्यावर केलेला छानसा मेकअप, जणू 'नाजूकपरीच' दिसत होती.

एक एक करत सगळे विधी व्यवस्थित पार पडले.

त्यानंतर सगळ्यांच्या पाया पडता पडता सुरेश रावा जवळ ही दोघे आली.

आणि आजवर रोखुनी धरलेला अश्रुंचा बांध फुटला.गंगा-यमुना डोळ्यातुन, पुर आल्यागत वाहु लागल्या.हे बघुन पोरंही रडायला लागली. स्वप्नाची ही अवस्था अशीच होती. जिच्यामुळे या घराला घरपण होते. आता तीही परकी होणार होती. त्यामुळे खूप एकटे एकटे वाटणार होते. "किती दिवसही तिला ठेवून घेतले तरी, तिला नवऱ्याच्या घरी एक ना एक दिवस जावेच लागणार आहे." असे इतर त्यांना समजूत घालत होते.

"अग पोरी, सगळ्यांच्या पाया पडली. आता जा साधनाच्या म्हणजे तुझ्या आईच्याही पाया पड." डोळे पुसत पुसत साधना ताई ची आई म्हणाली.

" हो जातो, जातो." असं म्हणून दोघेही मग आईच्या रूम कडे निघाले.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


 तर आई नेहमीसारखीच होती. पण.. चेहऱ्यावरचे भाव वेगळेच वाटत होते. तिथे गेल्यावर दोघांनीही तिच्या पायाला स्पर्श केला.मग तिचा हात हातात घेऊन स्वप्नाने तिच्याशी संवाद साधला.

"अग आई, आता तरी उठ ना. बघ या तुझ्या बाहुलीचा आज साखरपुडा झाला आहे. काही दिवसांनी लग्न होईल. मग मला सासरी जावे लागेल. पण सासरी जाताना मला तुझी उणीव तीव्रतेने जाणवेल. पाठीवर तुझा आशीर्वादाचा हात नसेल तर मी सासरी सुखाने नांदू शकणार नाही. तेव्हा तू आता तरी उठ ना."

तीचे हे असे रडवेल्या आवाजातील बोलणे ऐकुन निखिललाही भरून आले. म्हणून त्याने तिची समजूत काढली. 

"शांत हो स्वप्ना". निखिल चे हे बोलणे ऐकून ती शांत झाली. पण क्षणभरच! मग ती निखिल ला बोलु लागली.

"सांगा ना तुम्ही आईला. की आता तरी जागी हो म्हणून. निदान लग्नापर्यंत तरी मला तिचा सहवास लाभेल,आणि प्रेमही. तिच्या तोंडून छकुली ही हाक ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत." असं म्हणत म्हणत तिने आपले डोके निखिलच्या खांद्यावर ठेवले. त्याचवेळी एक हात आईच्या हातात होता. तेव्हा हाताला काहीतरी वळवळल्या सारखे तिला जाणवले. त्याच क्षणी तिने हाताकडे पाहिले, तर ती वळवळ आता वाढत आहे. असे तिला दिसले. 

"निखिल हे बघा, इथे आईचा हात हलत आहे." ते पाहून निखिलही चकीत झाला. आणि त्याने अधिक निरीक्षण केले. तर हे खरे होते. "हे खरे आहे का?" स्वप्नाने परत निखिलला विचारले."हो मला तरी वाटतं हे खरं आहे म्हणून." हे ऐकून स्वप्नाला खूप आनंद झाला.

"मी बोलवते सगळ्यांना." असे ती म्हणाली. "नको, इतक्यात नको. डॉक्टरांना चेकअप करू दे आधी." असं म्हणून त्याने फक्त संकेत आणि त्याच्या बाबांना बोलवले. आणि सांगितले त्यांनाही खूपच आनंद झाला.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात


साधनाताई शुद्धीवर आल्या सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. आज या घरी जणू दिवाळीच साजरी होत होती. सर्वजण होणाऱ्या जावयाचे खूप कौतुक करत होते. की 'याच्या पायगुणाने साधनाताई शुद्धीवर आल्या म्हणून'

जावयाचा हात हातात घेऊन साधनाताई म्हणाल्या," निखिलराव लग्न थोडे पुढे लांबवा. मला थोडे तरी माझ्या बाहुलीचे, छकुलीचे लाड करू द्या. माझ्याजवळ निदान काही दिवस तरी तिला राहायला मिळेल. आणि मलाही समाधान मिळेल. हवं तर विनंती समजा. कारण लग्नानंतर लेख परकी होते. आमचा अधिकार राहत नाही."

असे हे कळकळीचे बोलणे ऐकून, ऐकणाऱ्या सर्वांचेच डोळे पाझरू लागले.

यावर निखिलने त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांचे सांत्वन आणि समाधान केले.


सौ.शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या