फॉलोअर

नटखट कन्हैया

 नटखट कन्हैया


सविता वहिनीने आज घरी, महिलांचा भजनाचा कार्यक्रम ठेवून, सगळ्यांचे तोंड गोड केले होते. शिवाय सगळ्या कॉलनीतही पेढे वाटले होते. ओळखीचे आणि इतर मित्र-मैत्रिणीपर्यंत आज आनंदाचा हा पेढा पोहोचलेला होता. आनंदाचे कारणही तसेच म्हणजे. सविता वहिनी आजी झाल्या होत्या. त्यांच्या योगेशला काही दिवसापूर्वी मुलगा झाला होता. योग्य वेळेला बारशाचा ही थाट त्यांना करायचाच होता. त्यामुळे आज जरा जास्तच दिवसभर दगदग त्यांना झाली होती.

 तसेही सुन आल्यापासून. म्हणजे दोन अडीच वर्षापासून कामाची एवढी सवयच राहिली नव्हती. सकाळी ह्या उठेपर्यंत तिचे सडा, रांगोळी, आंघोळ, देवपूजा ही झालेली असायची. असेच दिवसभराचे पण होत होते.


 त्यामुळे शरीराला आरामाची सवय लागली होती. हातातील काम गेले की लवकर हात त्यात रूलत नाहीत.


 अगदी असेच. सविता वहिनींचे पण झाले होते. सुनबाई म्हणजे शिल्पा माहेरी बाळंतपणासाठी गेल्यापासून सर्वच यांना बघावं लागत होतं. जमत होतं सगळं. पण..


 आजचे हे भजन ठेवल्यामुळे, जरा जास्तीचा भार पडला होता. सर्व भजनी मंडळीचा नाष्टा, चहा सगळेच व्यवस्थित पार पडले होते. सगळ्याजणी खूप खुश होऊन, बाळाला खूप शुभेच्छा देऊन गेल्या होत्या.


 सगळं आटोपून त्यांनी बाळाची चौकशी करण्याकरता, शिल्पाला फोन केला. आजच्या सर्व कार्यक्रमाची माहिती त्यांनी सुनेला सांगितली. बाळाचीही चौकशी केली.

"कसा आहे गुलाम?" विचारले.

 "अहो आई, दिवसभर झोपलेलीच असते नाऽ ही स्वारी." असे शिल्पाने सांगितले.

 "बरं आहे ना मग!! तुला आराम करता येतो." सविता वहिनी म्हणाल्या.

"आई ऐका ना, तुम्ही उद्या इकडे या ना." शिल्पा म्हणाली.

ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.


" होते ना दोन दिवस. आता सव्वा महिना झाल्यावर येईल.इथेही सगळं बघावं लागतं ना." सविता वहिनी म्हणाली.

"आई ऐका ना, माझी परीक्षा आहे ना परवा. त्यासाठी मला औरंगाबादला जायचे आहे." शिल्पा म्हणाली.


" मग माझं काय काम आहे?" सविता वहिनी म्हणाल्या.

" हे येणार आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही पण या. मी माझ्या आईला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. बाळाला मी घरीच ठेवायचं म्हणते. उगीच त्याची परेशानी कशाला. नाही का?"शिल्पा म्हणाली.


"असं काही करू नको बाई. ते एवढेसे पंधरा दिवसाचे लेकरू. एवढा वेळ कसा राहील गं तुझ्याशिवाय?" सविता वहिनी म्हणाल्या.


 तिला दोन तास जायला, दोन तास यायला. आणि पेपरचे तीन साडे तीन तास. एवढा वेळ लागणार होता. म्हणून तिने त्याची म्हणजे बाळाची अभाळ नको व्हायला. असे म्हणून घरीच ठेवायचे ठरवले होते.

" राहील ना आई. बाहेर ऊन खूप आहे. एवढा वेळ ते उन्हातील वातावरणात आणि प्रवासानेच ते आजारी पडेल. त्यापेक्षा तुमच्या मांडीवर ते बिनधास्त झोपेल. आणि मलाही पेपर सोडवताना मन एकाग्र होईल. व्हा ना माझ्या बाळाची आई. मला अभ्यासासाठी प्रेरणा तुम्हीच देत आलात. तसेच आताही हे तुम्हाला करायचे आहे. तेव्हा यांच्यासोबत नक्की या. मी वाट पाहते आहे."


 शिल्पाने एका दमात सगळेच सांगितले.

 

 झालं, बाईला धाकच पडला. मी नकळत्या वयात आई झाले होते. तेव्हा काहीच वाटले नाही. पण 'आज मात्र हे आई पण झेपते की नाही?" 

असा विचारात करत करतच सविता वहिनी झोपल्या. पण झोप कशाची येते? अजिबात नाही!! मग या अंगावरून त्या अंगावर सारखं चालूच होतं. आजच्या कार्यक्रमाची जरा दगदग जास्तच झाली होती. आता या वयात हे जमत नव्हते. आणि झेपतही नव्हती. शरीराला जास्त सुखव वस्तू राहण्याची सवय लागली होती. त्यात जरा काही जास्तीचे केले की कंबर दुख, किंवा सगळं अंगच दुख, असंच होत होते. त्यामुळे जरा काळजीपूर्वकच सगळं करावं लागत होतं. जरा उशिराने त्यांना झोप लागली.


ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.

सकाळी लवकर उठून सगळे आवरले.देवपुजा, नाष्ट्यासाठी पण केले. शिवाय जायचे म्हणुन मग शिल्पा साठी लाडुही करून घेतले.बाळसाठी काही दुपटी शेजारच्या गोदाकडे शिवण्यासाठी दिली होती.तिही आठवणीने घेतली .


एकदाचं सर्व व्यवस्थित आवरून या लवकरच निघाल्या.

....


या आल्यावर शिल्पाला खुप आनंद झाला.

तीचे सगळे आवरले होते.थोडेसे बोलुन,

शिल्पा तिच्या आईला घेऊन योगेश सोबत परीक्षेसाठी निघून गेली. जाताना बाळाचा इवलासा हात स्वतःच्या गालावर ठेवून, "बाळा तुझी आठवण झाली की मी, गालाला हात लावीन. तेव्हा तुझा स्पर्श आठवेन आणि परत पेपर सोडवेल." असं म्हणून निघून गेली.


 सविता वहिनीने तेव्हा पत्नीच्या भूमिकेची कात टाकली.कारण बालाचे आजोबा पण आलेले होतेच.सासूच्या भूमिकेची कात टाकली. लग्न झालेल्या मुलाची आई. या तीनही भूमिकेतून बाहेर निघून. फक्त एका लहान बाळाची आई. याच भूमिकेचा कॉस्च्युम अंगावर चढवला. तेव्हा जरा त्यांना हलकं हलकं वाटू लागलं. आणि त्या भूमिकेत एकरूप झाल्यासारखे त्यांना वाटले.शिल्पा गेल्यानंतर बाळाला छान तेल मालिश करून. त्यांनी न्हाऊ घातले. व्यवस्थित कोरडे करून त्याला दुपट्या मध्ये छान गुंडाळले. व झोपवण्यासाठी झोक्यात टाकले. अगदी अंगाई म्हणून त्यांनी त्याला झोपवले. एक दीड तास ते आता शांत झोपत होते. तेवढ्या वेळात यांनी यांचे सगळे राहिलेले काम आवरून घ्यायचं ठरवलं. आवरताना मात्र लक्ष बाळाच्या झोक्याकडेच होते. येता जाता त्या झोका हलवत होत्या.

ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.

 तरीही एका तासातच त्याचे ट्याहा ट्याहा सुरू झाले. झोका हलवला तरी ते शांत होईना. मग सविता वहिनीने त्याला बाहेर काढले. आणि बघतात तर काय!! या गुलामाने दोन्ही प्रोग्राम करून ठेवले होते. सगळं मग स्वच्छ केलं. जणू परत अंघोळ घातल्यासारखंच झालं. दुसऱ्या कपड्यात परत त्याला गुंडाळले, आणि 'आता झोक्यात टाकावे आणि आणखी याला झोपु द्यावे.'असे मनातल्यामनात त्या म्हणाल्या.म्हणून त्या उठल्या बाळाला खाली ठेवलं.

 पण खाली ठेवले कीच त्याचा रडका सूर निघाला. चांगलेच हातपाय हलवून गुंडाळलेला कपडा त्यांनी सगळा काढून टाकला. परत यांनी त्याला मांडीवर घेतले. पण रडे काही थांबेच ना."आता काय आहे?"

हा प्रश्न त्यांना पडला.

 'याला भूक लागली असेल कदाचित' असं सविता वहिनीला वाटलं. पोट जरा रिकामी झाले होते. मग सविता वहिनीने वाटीत दूध जरासं कोमट करून आणलं. आणि चमच्याने त्याला पाजू लागल्या. 

"भूक लागली. आलेले."असे म्हणुन चमच्याने दूध पाजत होत्या.बाळही अतिच गुणाचा.तीन-चार चमचे आवडीने पिले.

 नंतर नंतर मात्र इकडून आजीने चमचा ओतला, की तिकडून बाहेर, असंच किती वेळ चालू होत. शेवटी चिडून आजीबाई म्हणाली, "जा आता, तुला प्यायचेच नाही." असं म्हणून त्यांनी कपाळाला हात लावला स्स्वतःलाच म्हणाल्या."मला कळलेच नाही रे की तुला दूध बाटलीने पाजायचे."असं म्हणून सगळं दूध त्यांनी बाटलीत ओतले. आणि मग बाटली हळूच त्याच्या तोंडात दिली पण नखरेच,त्यांनी थोडसंच पिलं.


  तरीपण रडण्याची ठुसतुस मात्र संपलेलीच नव्हती. त्याला हातात घेऊन सविता वहिनी. घरातल्या घरात इकडे तिकडे फिरू लागल्या. तोंडाने त्याच्यासाठी गीत गुणगुणं ही चालूच होतं. पण मनात तर! 

त्या म्हणाल्या की, 'शिल्पा तर म्हणाली की, दिवसभर झोपतो' पण मला तर गेल्या चार पाच तासापासून नुसते उभेच केलेले आहे, आपली आई जवळ नाहीये यामुळेच तर त्याला असुरक्षित वाटत नसेल ??"कशावरून असा विचार करत करतच त्या कितीतरी वेळ त्याला घेऊनच फिरत होत्या. नंतर मग कंटाळून त्यांनी परत झोक्यात टाकले. 

म्हणाल्या,आतातरी झोपा जरा निवांत."

ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.

 त्यांची पाय हि थोडेफार दमल्यासारखे झाले होती. म्हणून आता थोडे बसावे असं त्यांना वाटलं. झोका हलवत हलवत त्याही थोड्या आडव्या झाल्या. आडव्या झाल्या म्हणून हलकीशी डुलकी त्यांना लागली. पाच मिनिटानंतर जाग आली. अचानक खडबडुन त्या उठल्या आणि उठून बाळाकडे बघितलं. तर ते शांत झोपलेले होते.त्या निष्पाप निरागस चेहऱ्याकडे बघुन एक वेगळेच समाधान त्यांना वाटत होते.

 तरी पण यांना अपराध्यासारखं वाटू लागले कारण झोका देत देतच मला केव्हा झोप लागली कळलीच नाही. 'खरंच बाई, आई होणं हे सोपं काम नाही.' असं स्वतःलाच म्हणू लागल्या.आणि 'शिल्पा, ये बाई लवकर.' असं 

त्यांच्या तोंडून सहज निघाले.सौ. शुभांगी सुहास जुजगर. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या