दैव लेखना कुणा कळला..भाग- १
लग्नाची मंगलाष्टके चालू होती.
मीरा आणि तिची मुलगी, म्हणजे मंजिरी या दोघीही अक्षदा टाकत होत्या.दुपारचे लग्न होते. मिराच्या चुलत चुलत भावाच्या मुलीचे हे लग्न होते.म्हणून ती आणि तिची ही मुलगी, मंजिरी आज सकाळीच आल्या होत्या.
मंजिरी ही नववीत होती, शाळेला रविवारला जोडुन सुट्टी आल्यामुळे ती आईबरोबर, मामाच्या गावी लग्नाला आली होती. तसेही आज या दोघीही थांबणारच होत्या.
लग्न लागले.त्या नंतर खूप जणं म्हणजे नातेवाईक भेटत होते मिरेला.
या सगळ्या नातेवाईकांना भेटून मीरालाही खूप आनंद होत होता. खूप दिवसानंतर ती माहेरी आली होती. कामाच्या गडबडीत तिचं येणं होत नव्हतं.
पण या भावाने सगळ्यांनाच खूप आग्रह केला. 'की लग्नाला तुम्ही आलोच पाहिजे, तुमची सर्व कामं बाजूला ठेवून म्हणून.'
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
म्हणुन ही लग्नाला आली होती. या सर्वांमध्ये मीराला विद्या दिसली. विद्या म्हणजे तिची मैत्रीण आणि नातेवाईकही होती. शाळेमध्ये तिच्यापुढील वर्गात ती होती. पण बरोबरच शाळेत जात होत्या. ती दिसल्यावर ही तिच्याजवळ गेली.
"काय विद्या, कशी आहेस?" तिला विचारले. "मी बरी आहे गं, तू कशी आहेस?" तीनही प्रतिप्रश्न केला.
"मजेत आहे बाई."
"काय शेतात वगैरे जातेस का मग?"
"हो, जाते कधी कधी, काम करणारी असतात ना, याच्या मागे राहुन लक्ष ठेवावे लागते." मीरा ने सांगितले.
"आणि मिस्टर?"विद्या.
त्यांचे दुकान आहे तालुक्याच्या गावी."मीरा.
"आणि मुलं काय शिकत आहे का नाही?"विद्या.
"शिकत आहे ना, मुलगा इंजिनियर होतो आहे.आणि ही मुलगी नववीत आहे.वर्गात ती टॉपर आहे."मंजिरी कडे हात करत मीरा ने सांगितले.
"वा,वा, छान आहे."विद्या ने कौतुकाने म्हटले.
"तुझं कसं आहे? मुलं काय करतात? तुझ्या मिस्टरांचे कळाले. खूप वाईट वाटलें. पण तुला भेटायला येणं झालं नाही. राहणार असशील ना आता चार आठ दिवस?"
"हो आठ दिवसांची सुट्टी घेऊनच आले आहे."
विद्या म्हणाली.
" आणि मुलं नाही आणले का?"मीरा.
"हो आणले आहेत ना. त्यांना कुठे ठेवणार? दोघेही आहेत, मोठा नववीला आणि लहाना सहावीला आहे. त्या दोघांनाही नाताळच्या सुट्ट्या आहेत, म्हणूनच मी या लग्नाला आले आहे." विद्या म्हणाली.
लग्न लावून मीरा घरी आली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
घरी आल्यावर वहिनीने,"चहा घ्यायचा का?" विचारले.
"नाही.मी थोडा आराम करते आता."मीरा म्हणाली.
कारण लग्नाचे जेवण नुकतंच झालं होतं. असं म्हणून आराम करण्यासाठी ती कॉटवर आडवी झाली. पण झोप कशाची येते? तरीही ती फक्त डोळे मिटून पडून राहिली. पण विद्या भेटल्यावर काही आठवणींची गर्दी तिच्या मन:पटलावर झाली. तिचं ते रूप पाहून, तिला खुपच वाईट ही वाटत होतं आणि काहितरी चुकले का?...असं तिचं मन तीलाच, चिमणी सारखे टोच्याही मारत होते..
तो दिवस तिला आठवला..
त्या दिवशी सकाळी, म्हणजे मीरा देवपूजा करत होती तेव्हा..
अंगणात इंद्रायणी काकू आल्या आणि म्हणाल्या, "अग मीरा काय करते आहेस? जरा बाहेर ये ना."
त्यांची अशी हाक ऐकून दिपाने सांगितले,
"ती पूजा करते आहे. बोलावू का?" दाराजवळच उभी असलेल्या दिपाने सांगितली.
"हो बोलाव, तशी तुझेही आवरले का? तुला शाळेत जायचे असेल ना?"
"हो जायचे आहे ना. तसं माझं शाळेसाठी आवरलं आहे." दिपाने सांगितले.एवढं बोलणं होईपर्यंत मीरा ही बाहेर आली.
मग तिने विचारले," काय आहे हो काकू?"
"अगं आज विद्याला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत. तर तू ये ना थोडावेळ. स्वयंपाकालाही मदत होईल. आणि विद्याला काही गोष्टींसाठी तुझी मदत होईल.तुझं ऐकती ती." सगळं हे एका दमात काकूंनी सांगितले. त्यावर "वा,वा छान. येते हो जरा वेळाने."
असं मीरा ने सांगितले.
"ये लवकर, मी निघते आता आवरायचे आहे." असं म्हणून त्यानिघुन गेल्या.
मीरा ही एक दहावी पर्यंत शिकुन, नंतर शिक्षण थांबलेली मुलगी होती.कारण घराची सगळी जबाबदारी तिच्यावरच होती.घरात वडील, एक बहिण आणि एक भाऊ.मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी तिच्यावरच आली होती.
तर आई ही, मुलाच्या जन्माच्या वेळी, तिला खुप त्रास झाला होता.मुलगा झाल्यावर तीन दिवसांनंतर तीने डोळे मिटून घेतले ते कायमचेच.मुलासाठी अट्टाहास केला होता.पण मुलगा झाला.आणि ती मात्र गेली.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
वडील मार्केट मध्ये, किराणा दुकानात काम करत होते.आणि यावरच घरखर्च चालत होता.
शेजारी पाजारी सगळे नातेवाईकच होते.कुणाच्या अडीअडचणीत, किंवा तीन दिवसाच्या अडचणीत, ही स्वयंपाक करून देत होती.
म्हणुनच आज इंद्रायणी काकूंनी बोलावले होते.
विद्या आणि मीरा, या दोघी तश्या समवयस्कच होत्या. विद्या ही एक वर्ष पुढे होती.त्यामुळे विद्याचे, हिच्या कडे किंवा हिचे तिच्या कडे, जाणे येणे चालुच होते.मीराचे शिक्षण थांबले मात्र विद्याचे चालु होते.ती पदवी च्या शेवटच्या वर्षाला होती.पण तीचे अभ्यासात विशेष लक्ष नव्हते.आज पाहुणे येणार होते तिला बघण्यासाठी.
काकु निघुन गेल्यावर हीने पटकन भाजी टाकली. आणि पोळ्या ही केल्या.
आवरून ती विद्येच्या घरी आली.
तसे विद्या ही जरा श्रीमंत घरातली मुलगी.घरी शेती होती, एकदोन वाहनेही होती.कीरायाने देण्यासाठी.तीचे वडील शेतीच करत होते.घरात मोठे कुटुंब होते.
विद्याला चार आत्या होत्या. त्यांचे लग्न झालेले होते. पण त्यांचे माहेरी येणे जाणे असायचेच. आणि लहान काका अन् त्याची फॅमिली होती. आजीही होत्या. असा मोठा परिवार होता. तरीही मीराला मदतीला बोलावले होते.
…..
पाहुणे बघून गेले विद्याला. मुलगा म्हणजे विश्वास हा देखना आणि हुशारही होता. ग्रॅज्युएट होता. पण नोकरी वगैरे नव्हती. त्याचे गाव म्हणजे खेडे ही नाही, आणि शहरही नाही. असे होते. आणि हा मुख्य म्हणजे, शेतीच करत होता. वडील अपघातात गेल्यामुळे शेतीचे सर्व हाच पहात होता. आणि म्हणून वर्षाच्या आत याचे लग्नही करायचे ठरवले होते. त्यामुळे आत्याच्या नात्यातील असल्यामुळे तिने पटकन विद्याचे स्थळ सुचवले होते.
मुलगा बघून गेला. त्यांना मुलगी पसंत असल्याची, त्यांचे चेहरे सांगत होते. मात्र विद्या बाईला हे पसंत नव्हते, आणि तिच्या आईलाही. विद्येचे ग्रॅज्युएशन होत होते. फायनल ला होती. त्यामुळे साहजिकच तिला नोकरीवाला नवरा पाहिजे होता. आणि शहरवासी देखील! त्यामुळे पुढे सगळं गारेगार होतं.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
आठ दिवसानंतर मुलाचे मामा म्हणजे विश्वासचे मामा, लग्नाच्या पुढील बोलणीचे ठरवण्यासाठी आले.पण यांचा नकार होता. त्यामुळे ते काहीच बोलले नाही.
पण या सगळ्या म्हणजे पाहण्याच्या कार्यक्रमात, आणि आजच्या येण्यात त्यांनी मीराची आवर्जून चौकशी केली. आणि घराच्या बाहेर निघाल्यावर त्यांनी, "मला तिच्या घरी घेऊन चला" असे सुचवले. योगायोगाने मीरा आणि तिचे वडीलही घरीच होते.
झालं..
त्यांनी मीराशी, आपल्या भाच्याचे लग्न ठरवूनच ते गावी परतले.
……
मुलाच्या गावी मीराचे थाटामाटात लग्न झाले. भरपूर दागिन्यात आणि उंची वस्त्रात मीरा लक्ष्मीच्या पावलाने घरात प्रवेश करती झाली. वाड्याच्या मोठ्या दारातून ही नवीन जोडी आत प्रवेश करती झाली.
बैठकीच्या दारात, म्हणजे उंबऱ्यावर तांदळाने भरलेलं माप ठेवलं होतं. दारात दोघांचेही औक्षण करण्यात आले.
पण घरात जायला ननंद बाईने अडवले. "उखाणा घेतल्याशिवाय आत येऊ देणार नाही." असेही सुनावले.आणि "तुला मुलगी झाली तर, माझ्या मुलाला द्यावी लागेल." असे सांगितले.
हे ऐकुन विश्वास म्हणाला, "विचारून सांगतो."
त्याचे असे हे उत्तर ऐकून सगळ्या जणी हसायला लागल्य.
"बघा गं आतापासूनच हा 'बायकोला विचारून सांगतो' म्हणाला बाई" असेच हसत हसत त्या दोघांनाही चिडवु लागल्या.
मग हळूच मीराने उखाणा घेतला. "अग्निभोवतीच्या सात फेऱ्या,
सात फेऱ्यांची सात वचनं.
घेतली आहेत, घेऊन हात हाती,
घट्ट ठेवीन विश्वास रावांची सर्व नाती."
मीराचा हा उखाणा ऐकून, सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. मुख्य म्हणजे विश्वासच्या आजीला, हा उखाणा ऐकून एक प्रकारचा जिव्हाळा तिच्याविषयी निर्माण झाला.
त्या म्हणाल्या,"वाऽ वाऽ सुनबाई, वृंदावनातली तुळस हिरवीगार राहील. मला आता भरोसा वाटतोय बाई, तुझ्या येण्यानं."
असं म्हणत त्यांनी तिला, "अखंड सौभाग्यवती भव:" असा आशीर्वादही दिला.
त्यानंतर सगळ्या विश्वास च्या मागे लागल्या.'उखाणा घे, 'उखाणा घे.' म्हणून. मग त्यानेही अडवेढे न घेता उखाणा घेतला.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात
"संसाराच्या नौकेसाठी लग्नाचा हा थाट, मिराच्या येण्याने झाली आहे आयुष्याची पहाट.."
विश्वासचा हा उखाणा ऐकून,
प्रभा म्हणजे त्याची बहीण म्हणाली,
"अरे वा दादाऽ भारीच घेतलास की उखाणा. आवडला मला.
तसा "वहिनी तुझाही उखाणा छानच होता.बाळसे येईल बघ आता घराला. यात शंकाच नाही."
हे ऐकुन विश्वासला बरे वाटले.उखाणा ऐकुन,' मस्त' 'छान' असं सर्वांच्या तोंडातून सहजच बाहेर पडले.
कसा होणार आहे यांचा संसार
? वाचने नक्कीच रंजक ठरेल.बघु या पुढील भागात..
@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
0 टिप्पण्या