फॉलोअर

दोन लघुकथा...

  दोन लघुकथा...

केशरी टिळा..

सुषमा अंथरुणात चुळबुळत असतानाच तिने, तिची कुस बदलली. ही कुस बदलत असताना तिने हलकेच डोळे उघडले, अन् किलकिल्या डोळ्यानींच तिने घड्याळाकडे बघितले..तर सकाळची पाच वाजून वीस मिनिटे झालेली होती. 

असे तिने पाहिले.आणि परत डोळे मिटले. पण डोळे मिटल्यावर तिच्या लक्षात आले की, 'अरे आज तर अश्विन प्रतिपदा आहे. म्हणजेच आज आपल्याला घटस्थापना करायची आहे. त्यासाठीची तयारी करावी लागेल. शिवाय घरातलेही सर्व कामे आहेतच.'

 म्हणून मग ती लगेच उठायची तयारी करते. उठून वॉशरूमला वगैरे जाऊन येते, हात पाय धुवून थोडेसे पाणी पीते.

नंतर 'बाहेरचे अंगण साफ करायचे' यासाठी झाडू घेऊन ती बाहेरचे दार उघडते.

हे दार उघडून ती बाहेर आली.तर बाहेर छान सा, मन धुंद करणारा सुगंध दरवळत होता. एरवी ती कधीही एवढ्या लवकर उठत नव्हती. 

पण आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणूनच ती उठली होती. हा गंध तिने आपल्या श्वासात भरून घेतला.आणि मन मंदिराच्या गाभाऱ्यात ही. त्यामुळेचअगदी मनातील तार छेडल्यासारखं तिला झालं.

  दोन पायऱ्या उतरून ती खाली आली. तर अंगणात उजव्या बाजूला असलेला प्राजक्त, याच्याकडे तिची नजर गेली. तर झाडाखाली सुंदर टपोऱ्या प्राजक्त फुलांचा सडा पडलेला तिला दिसला. पांढरीशुभ्र फुले आणि त्यांची ती गर्द केशरी पुंगळी सारखी असणारी देठे. 


हा सडा पाहून तिने वरती म्हणजे झाडाकडे बघितले, आणि मनातच म्हणाली, 'तुझं आपलं बरं आहे, की हे दान या धरणीच्या ओटीत टाकून तू रिक्त होतो.'

 असं म्हणून तिने आपल्या कामाला सुरुवात केली.

ही कथा आपण kuaumanjali.com वर वाचत आहात.

 पण तो गंध, तिच्या श्वासात तसाच भरलेला होता काठोकाठ,आणि नजरेत प्राजक्तांच्या फुलांची देठे त्यांचा तो केशरी रंग.


ती देवपूजा करत असताना, तिचा मुलगा निखिल, तिच्यासमोर येऊन म्हणाला,

" ये आई, आवरना लवकर, मला नाश्ता करून दे. आज मला इंटरव्यू ला जायचे आहे. थोड्या वेळात."

हे ऐकून ती म्हणाली, बरं देते करून तुझी अंघोळ वगैरे आटो तोपर्यंत देते करून."

असं म्हणून ती परत आपल्या पूजेत रमली.आज देव हे पानावर ठेवायचे होते.त्या नंतर घटस्थापना करायची होती.म्हणुन मग पुजा थांबवुन तीला मध्येच उठावे लागले.


निखिलला पोहे खूप आवडत होते म्हणून मग तीने पोहेच करायचे ठरवले आणि पोह्याची तयारी करायला घेतली.


सुषमा ही एक मध्यमवयीन स्त्री. ती आणि तिचे कुटुंब हेच तिचे विश्व. तिचे कुटुंब म्हणजे ती आणि तिचे पती मोठा मुलगा निखिल आणि लहान मुलगी सुदिक्षा. आणि सासूबाई म्हणजेच नितीन रावांची आई. असं हे कुटुंब. 


त्यात निखिलचे शिक्षण पूर्ण झाले होते. आणि त्याचे नोकरीसाठीचे प्रयत्न चालू होते.

त्यासाठीच्या इंटरव्यूकरीता तो वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. पण यश मात्र हुलकावणी देत होते.सुदिक्षा ही डिग्रीचे शिक्षण घेत होती. 

ही कथा आपण kuaumanjali.com वर वाचत आहात.

तसेच आजही निखिल इंटरव्यू देण्यासाठी जाणार होता.

थोड्याच वेळात तो सर्व आवरून डायनिंग टेबल जवळील खुर्चीत येऊन बसला.

 आणि म्हणाला,"आई दे लवकर झाले असेल तर."

 "हो, देते." असं म्हणून तीनी पोह्याची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवली. आणि त्याला देव घराकडे जात म्हणाली," निखिल, जरा इकडे ये." 

हे ऐकुन निखिल उठला. आणि त्याने देवाला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सुषमाने त्याच्या कपाळी केशरी गंध लावला.

त्यानंतर त्याला नाष्टा करायला सांगितले.

एका फुलपात्रात केशर घालुन दुध दिले.

सर्व व्यवस्थित तयार होऊन तो आजींच्या पाया पडला.आजीने"यशस्वी भव:"असा आशिर्वाद दिला.

त्यानंतर वडिलांच्याही पायावर डोके ठेवले.

आणि मग आईच्या पाया पडला.तर आईने असा आशिर्वाद दिला,"आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. मातेच्या चरणी वंदन करून,तुझ्या कपाळाच्या केशरी गंधाची सकारात्मक उर्जा तुझ्या सोबत नक्कीच राहणार आहे.आजच्या या इंटरव्यू मध्ये तुझे प्रेझेंटेशन छान होईल, आणि तुझे सलेक्शन होईल."

या सर्व आशीर्वादाचे कवच कुंडले घेऊन निखिल ईप्सित साध्य करण्यासाठी निघाला.


@ सौ.शुभांगी सुहास जुजगर. फुलांची परडी.


परडी भरून, पांढरी फुले तोडली.आणि ती फुलांची परडी सानिकानी पुनम जवळ म्हणजे तिच्या आईजवळ दिली.

 आज घटस्थापनेचा दुसरा दिवस होता, म्हणून पांढऱ्या शुभ्र फुलांची माळ घटाला ती घालणार होती. तो हार करायचा धागा घेऊनती परडी जवळ येऊन बसली.

 फुलांनी भरलेल्या परडी कडे पाहता पाहता काहीतरी तिला आठवले, अगदी काहीच दिवसापूर्वीची ती घटना..

 

तो श्रावण महिना होता. त्यामुळे हिचे देव देव जरा जास्तच होत होते. म्हणून फुले ही भरपूरच लागत होती.

पण चार दिवस झाले..पाच दिवस झाले.. झाडावरची अर्धीच्या वर फुले गायब व्हायची.. मग हीने पाळतच ठेवली, की कोण आपल्या झाडाची फुले तोडून नेते..

ही कथा आपण kuaumanjali.com वर वाचत आहात.

 मग एक वयस्कर ताई फुलं तोडताना तिला दिसली. मग काय.. लगेच हीने तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.

 ती म्हणत होती,"अहो मी..

"अहो मी..

 पूनम बाई तिला एकही शब्द बोलू द्यायला तयार नव्हती.. तीने म्हणजे त्या ताईने नक्की सांगायचा प्रयत्न केला.. पण छेऽऽ

 तेवढ्यातच सानिकाचे पप्पा मॉर्निंग वॉक करून परतले, आणि त्यांनी हे पूनमचे बोलणे ऐकले. 

ते म्हणाले,"अगं शांत हो बाई. गप्प बस जरा.. त्यांनी मला विचारले होते, फुल घ्यायच्या आधी.. त्या ताई श्रावण महिना असल्यामुळे, दररोज शिवपिंडीवर 108 पांढरी फुले वाहतात. 'सुनेला मुल नाही' म्हणाल्या, त्यासाठीच मी हा नवस केलेला आहे.' वर असेही म्हणाल्या." 

हे ऐकून पूनमची बोलतीच बंद झाली. आणि तिने मग त्या ताईंना," क्षमा करा मला, मला यातले काहीच माहित नव्हते." असेही म्हणाली.

 त्या ताईं म्हणाल्या,"असु द्या, माहित नव्हते ना."असे म्हणुन त्या पुन्हा फुले तोडण्यात मग्न झाल्या. 

पुनमला मात्र हा विचार सारखा मनाला कउर्तडतच राहिला. पण तिने जाणून-बुजून हे केले नव्हते. हे मनाला समजावून तिने विसरण्याचा प्रयत्न केला.


 त्या ताई म्हणजेच, शेजारच्या दोन-तीन घर सोडून पुढच्या घरात किरायाने राहण्यास आलेल्या लोखंडे साहेबाच्या आई होत्या. लोखंडे साहेबांचे लग्न होऊन सात-आठ वर्षे झाली होती. पण घरात पाळणा हलला नव्हता. म्हणून त्यांची आई नेहमीच असे काहीतरी देवाचे करायची. तेवढेच मनाचे समाधान होत होते. पण गुण काही येत नव्हता.

 असंच त्या ताई मग अधुन मधुन गप्पा मारण्यासाठी येऊ लागल्या. गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासाठी कापसाची खुपच मस्त, सुंदर असे वस्त्र त्यांनी पूनमला करून दिली.आणि करायला ही शिकवले.

ही कथा आपण kuaumanjali.com वर वाचत आहात.

काही दिवसानंतर त्या ताई गेट उघडून आत आल्या.

आणि म्हणाल्या," तुमचे कसे आभार मानून मला कळत नाही मला! मला शब्दच नाही सापडत आहेत." 

असं ऐकून पुनमने त्यांना वर यायचे सांगितले, "तुम्ही आधी वर घरात या. आणि सविस्तर सांगा."

ऐकून त्या मग वर, घरात सोफ्यावर येऊन बसल्या,आणि म्हणाल्या,"तुमच्या झाडाची फुले मला पावली गं बाई, माझ्या सुनेची देवाने ओटी भरली आहे. काल तिला दिवसभर उलट्या होत होत्या.संध्याकाळी दवाखान्यात नेले. तर डॉक्टर म्हणाले की ह्यांना दिवस आहेत म्हणुन.. खुप खुप धन्यवाद तुम्हां लक्ष्मी -नारायणाच्या जोडीचे."

असं म्हणत त्या पुन्हा पुन्हा हात जोडीत होत्या.

"असू द्या ताई, तसे काही नसते तुमचे पुण्य फळाला आले आहे. आम्ही निमित्त मात्र ठरलो." असं म्हणून पुनम त्यांना समजावू लागली.

त्यानंतर "सानिका जरा चहा कर गंऽ ताईंचे तोंड गोड करूया."

"नको,अहो नको, मी तुमचे तोंड गोड करायचे तर तुम्हीच .."

"एवढी गोड बातमी दिली आहे तुम्ही,

आई -बाबा होणे,यासारखे दुसरे सुख नाही."

ही कथा आपण kuaumanjali.com वर वाचत आहात.

समोरची परडी पाहुन पुनमला ही सर्व घटना आठव

ली,आणि नकळत तिच्या नेत्रकडा ओलावल्या.

@ सौ.शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या