फॉलोअर

माझी ओटी..

 माझी ओटी...



दाराची बेल वाजली म्हणून विमलाबाईंनी दार उघडले. तर दारात एक मध्यम वयाची अनोळखी स्त्री, हातात पर्स घेऊन उभी होती. असं पाहून विमल बाईंनी तिला विचारले,
“कोण हवंय?”
“शैला माने येथेच राहतात का?” त्या स्त्रीने प्रश्न विचारला.
“हो, माझी सुनबाई आहे ती.” विमला बाई म्हणाल्या .
“जरा भेटायचे होते त्यांना. बोलावता का..” त्या बाईंनी सांगितले.
“ती ऑफिस मधून आलेली नाही. पण येईल इतक्यात. तुम्ही थांबू शकत असाल तर थांबा, आणि आत येऊन बसा.”विमलबाई.
 विमला बाई असं म्हणाल्यावर त्या बाईंनी घड्याळ बघितले.
“हो थांबते.” असं ती म्हणाली.
 आणि पायातील चप्पल एका बाजूला काढून ठेवुन, ती आत येऊन सोफ्यावर बसली.आत येऊन बसल्यावर विमलाबाईंनी त्यांना पाणी दिले.त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर.
 “तुम्ही कुठे राहता? आणि शैलाशी तुमची कशी ओळख?” विमला बाईंनी त्यांना विचारले.

“मी हरी नगर येथे राहते, माझे नाव सुनंदा. माझी आणि शैला ताईंची ओळख नाही. पण मी करून घ्यायला आले आहे.” सुनंदा.
“हो का येईलच ती आता पाच मिनिटांत, तुम्ही बसा मी आलेच.” असं म्हणून विमला बाई किचनमध्ये आल्या.आणि त्यांनी दोघींना चहा ठेवला.
थोड्याच वेळात त्या चहा चे कप घेऊन हॉलमध्ये आल्या.
“घ्या चहा घ्या. विमलाबाई म्हणाल्या.
“अहो कशाला?”असं सुनंदा बाई म्हणाल्या.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

चहा पीत असतानाच शैलाने घरात प्रवेश केला. आणि तिने पाहिले की, कोणी स्त्री सोफ्यावर बसलेली आहे तिच्या आईशी गप्पा ही चालू आहेत त्यामुळे ती काहीही न बोलता सरळ बेडरूम मध्ये गेली. तर विमलाबाईंनी तिला आवाज दिला.
 “अग शैला या बाई, म्हणजे सुनंदा बाई तुला भेटायला आल्या आहेत.”
“हो का.. मी आलेच दोन तीन मिनिटात.” तिने मधूनच सांगितले.आणि ती फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसली. ती येऊन बसल्यावर..
“नमस्कार मी सुनंदा.”
“मी तुम्हाला ओळखत असल्याचे मला आठवत नाही, पण तुम्ही मला कशा ओळखता?” असा शैलाने त्यांना प्रश्न विचारला.
“मी सुनंदा हरिनगरमध्ये राहते.त्या दिवशी दवाखान्यात आपली भेट झालेली.”
त्या असं म्हणाल्यावर… 
शैलाला तो दिवस आठवला…

त्या दिवशी म्हणजे नवरात्रीची सातवी माळ होती.दररोजच्या ऑफीसला जाण्यामुळे देवीच्या दर्शनासाठी जाणेच होत नव्हते.म्हणुन मग विमलाबाईंनी तीला सांगितले की, “सकाळच्या स्वयंपाकाचे मी बघते,तु जा आणि देवीचे दर्शन घेऊन ये.ओटीचे आणि पुजेचे सामान मी काढून ठेवले आहे.” त्या असं म्हणाल्यावर हिला नाही म्हणताच आले नाही.

 तिने स्वतःचे आवरले, ड्रेस ऐवजी साडी घातली. कपाळी कुंकू लावले. 
ओटीचे आणि पूजेचे सामान घेऊन ती निघाली. 
मंदिर घरापासून लांबच होते. पण तिच्याकडे स्कुटी असल्याने तिला ऑफिसच्या वेळेपर्यंत परत येता येणार होते.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

 मंदिरात गेल्यावर गर्दी बरीच होती. मोठीच म्हणजे लांब अशी रांग होती.
 तिला पण रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागणार होते. म्हणून ती पण रांगेत उभी राहिली.
 पण काही वेळाने तिला फोन आला की,
 “मॅडम ताबडतोब हॉस्पिटल ला या.इथे एक जणा साठी तुमच्या म्हणजे ‘ओ पॉझिटिव्ह’ या ग्रुप चे ब्लड अर्जंट पाहिजे आहे.
नक्की या.”
 असं ऐकल्यावर तिला काय करावे कळेना.
“हो येते.”असे सागुन तीने फोन ठेवला. दर्शनाला आणखीन दहा ते पंधरा मिनिट लागले असते पण.. 
आलेला फोनही महत्वाचाच होता.म्हणुन मग तिने तीथुनच देवीला नमस्कार केला.आणि आणलेली ओटी ही पुढच्या ताईं कडे देत म्हणाली, “मला जरा अर्जंट जावे लागते आहे, तरी ही माझी ओटी देवीच्या चरणी अर्पण करा.”
“ठीक आहे, मी करेन अर्पण, तुम्ही बिनधास्त जा.” असं तीने सांगितले. पुन्हा एकदा हात जोडून नमस्कार केला.
 
आणि ती लगेच हॉस्पिटल कडे निघाली. 

तिथे पोहोचल्यानंतर ज्या डॉक्टरांचा फोन आला होता त्यांना जाऊन ते भेटली.
डॉक्टर म्हणाले,”खुप खुप धन्यवाद मॅम, एका पेशंटला अर्जंट ब्लडची गरज आहे.”

“ठीक आहे मी तयार आहे.”
असं म्हणून ती उठली.

ब्लड डोनेट करत असताना, ज्या पेशंटला अर्जंट या ब्लडची गरज होती, त्याची आई तिथे आली.आणि शैला कडे बघुन म्हणाली,
“खुप खुप धन्यवाद ताई तुमचे.अगदी तुमच्या रूपाने आई अंबाबाईच धावुन आली आहे, माझ्या लेकराचे प्राण वाचवायला.”
असं म्हणताना तीचे डोळे ही खुप काही सांगत होते, अन् झरतही होते. तीचे हे बोलने ऐकुन शैलाला ही भावुक झाले. आणि तिच्याही डोळ्यात पाणी आले. मग तिने हातानेच त्यानां गप्प राहायला सांगितले. 
“ तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा मुलगा लवकरच बरा होईल.” हे ऐकल्यावर त्या म्हणाल्या, “तुमच्या तोंडात साखर पडो.”
ब्लड दिल्या नंतर… 
एक समाधान तिच्या मनाला वाटले, चला आजची पुजा ही भवानी मातेच्या चरणी पावन झाली.म्हणुन तीने मनोमन मातेला नमस्कार केला.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

ती घरी येईपर्यंत ऑफिसची वेळ होऊन गेली होती. त्यामुळे तिने ऑफिसमध्ये लगेच फोन करून सांगितले की,
”मला यायला उशीर होईल,आल्यानंतर सांगेन सर्व काही. ठीक.”
 
ती घरी येईपर्यंत मुलं शाळेत गेलेले होते, आणि मिस्टर पण ऑफिसला गेले होते. आल्यावर तिने बघितले की, आईचा सगळा स्वयंपाक झालेला होता.आणि त्या किचनमध्ये आवरा आवर करत होत्या.असं पाहुन मग तिने आईला म्हणजे सासुबाईंना सांगितले,
“ की मी थोडा आराम करते, नंतर ऑफिसला जाईन.”
 तीने असं सांगितल्यावर त्यांनी म्हणजेच सासुबाईंनी जरा घाबरतच विचारलं,
“काय झालं बाई? बरं नाही का तुला? चुकलंच माझंऽऽ. एवढ्या घाईत तुला दर्शनाला जायला सांगितले मी.” असं म्हणून त्या स्वतःला दोष देऊ लागल्या.
“अहो असं काही नाही. माझं छान दर्शन झालं. आणि मला समाधानही वाटले तिथे गेल्यावर, तुम्ही नका काळजी करू असं समजावल्यावर मग त्यांना बरे वाटले.

तरी पण काही वेळाने त्या म्हणाल्या,” अगं नाष्टा तर कर ना आधी, नंतर जरा आराम कर.”
“हो करते.” असं म्हणत ती बेडरूम मध्ये आली.
काहीवेळाने थोडेसे खाऊन, 
ती नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली.

आणि आज म्हणजे त्या घटने नंतर काहीच दिवसांनी…
परत सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून सरकला. 
“मग कशी आहे, आता तुमच्या मुलाची तब्येत?”शैला ने विचारले.
“हो आता ठणठणीत बरा झाला आहे.जखम भरली आहे पुर्ण. आणि म्हणुन मग शाळेत पण जायला लागला आहे.”सुनंदा बाईने खुषीने सांगितले.
“बरं झालं, हे ऐकुन खुपच आनंदी फील होत आहे.शैलाही त्यांच्या खुषीत सामील होत म्हणाली.
“ताई, खरंच तुमची खुपच मदत झाली आहे.तुमच्या रूपातल्या देवीला मी आज नमस्कार करते.नमस्कार करून मी तुमची ओटीही भरणार आहे, खण, नारळ आणि साडीने.”सुनंदा बाई म्हणाल्या.
“अहो कशाला?” शैला म्हणाली.
“नाही तुम्ही काहीच बोलू नका.मला तुमची ओटी भरू द्या.तिचं हे ऐकुन शैलाला काही शब्दच सुचले नाही.
हे समोर जे घडत आहे ते विमलाबाई यांना सगळे सगळंच नवीन होतं. त्यांना यातलं काहीही माहिती नव्हतं.
 म्हणून त्यांना काही समजेच ना नेमकं काय चालू आहे…
 तरीही येकुन त्यांच्या संभाषणावरून त्यांना बरंच आकलन झालं होतं. त्यांची होणारी घालमेल बघून शैला समोर बसून त्यांना सगळं व्यवस्थित सांगु लागली.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

हे सांगत असतानाच सुनंदा बाई म्हणाल्या,”
 “माझा मुलगा शाळेला जात होता.आणि रोड ओलांडताना त्याला मागुन येणाऱ्या वाहनानी धक्का दिला.पटकन आजुबाजुच्या लोकांनी त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी लगेच त्याला ब्लड देण्याची तयारी केली. कारण ब्लड लॉस झाला होता.माझ्या लेकरासाठी ही माऊली दर्शन अर्धंवट सोडुन दवाखान्यात आली.”हे सांगत असताना त्यांना हुंदका दाटून आला होता.
 हे सगळं ऐकून त्यांना म्हणजे विमल बाईंना त्या दिवशी सुनेला यायला झालेला उशीर, आणि तिचा ऑफिसला जायला झालेला उशीर, याचे सारे गुपित आता कळाले होते. शैलाने आधी त्यांना याविषयी काही सांगितले नव्हते.
“तु मला हे आधीच का नाही सांगितले गं?”
असा प्रश्न त्यांनी सुनेला विचारला.
“अहो मी योग्य वेळ आल्यावर सांगणारच होते.” शैला ने सांगितले.
हे सर्व ऐकल्यावर.. 
तिच्याविषयी म्हणजे सुनेविषयी त्यांच्या मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. आणि त्या आपल्या सुनेविषयी प्रौढ फील करू लागल्या. आपल्या सुनेने माणसांमध्ये देव शोधला होता, वेळेवर मदत करून.ही भावनाच त्यांच्यासाठी खूप खूप समाधानकारक होती.
“वाऽ सुनबाई! खूप अभिमान वाटला तुझा आम्हाला.” असं म्हणत त्यांनी सुनेच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. आणि खूप खूप तिचे कौतुक केले.
हे पाहुन सुनंदा बाईंना ही या दोघी सासु सुनेचा हेवाच वाटला.
(कथा पुर्ण पुणे काल्पनिक आहे.)


@सौ.शुभांगी सुहास जुजगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या