फॉलोअर

" ती"चे स्वागत.

        "ती" चे स्वागत...

सुमाताई घरातील सर्व कामं आवरून पेपर वाचत बसल्या. सकाळी दोन्ही मुलांची डबे करून दिल्यावर स्वतःचे आवरून म्हणजे देवपूजा आणि त्यानंतर नाश्ता कम जेवण,त्या करत होत्या. कामवाली येऊन तिचे सगळे काम करून गेली होती. म्हणजे कपडे, भांडी घरातील सर्व पसारा आवरून फरशी पुसून घेऊन, घर आरशासारखं लख्ख करून गेली होती.

सुमाताईने थोडा वेळ पेपर वाचून नंतर टीव्ही पहावा, असे म्हणून त्या पेपर वाचत होत्या. त्यामधील दररोज येणारे शब्दकोडे त्यांना भरायला फारच आवडत होते.


इतक्यात दाराची बेल वाजली‌. सुमाताईने दार उघडले. तर दारात, 

सायली उभी होती.. चेहरा मलुल झाला होता. असे पाहून सुमाताईच्या

 काळजाचा ठोका चुकला.


"काय झाले ग?.". अशा काळजीच्या स्वरात त्यांनी विचारलं.

"काही नाही." असं म्हणत सायली घरात आली.

"आणि मला थोडा आराम करायचा आहे." असं म्हणून कॉटवर आडवी झाली.

"अगं तु अशी शाळेतून घरी आली, म्हणजे तुला बरं नाही का? काय होतंय, मला सांग ना."

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

सायलीला आईला सांगू की नको. काय करू, असं तळ्यात मळ्यात झालं. पण, मम्मी घरी नाही आईला तर सांगितलेच पाहिजे.

 "आई माझे ना पोट खूप दुखत आहे.

 "डब्बा खाल्लास का?की पोळी भाजी देऊ?"

"नको, मी डबा खाल्लेला आहे."

"मग, पोट कशाने दुखते आहे. लिंबू पाणी देऊ का? की ओवा खातेस थोडा."

"नाही ग आई. मला शांत पडू दे, थोडा वेळ. असं सायली चिडून म्हणाली.


तसं मग सुमाताई सोफ्यावर येऊन बसल्या. पण त्यांच्या मनाची तगमग काही कमी

 होईना.


सायलीचे मम्मी-पप्पा दहा-बारा दिवसांच्या टूर साठी गेले होते. हे म्हणजे सुमाताईचे मुलगा आणि सून.

अशोक आणि अनिता . ऑफिसची ही ट्रीप कप्पल साठीच होती.पण,

घरात दोन मुले सायली आणि समीर.यांना एकटे ठेवून जाण्यास अनिता तयार नव्हती. पण, सुमाताईंनी सांगितलं," तु जा ट्रीपला. मी मुलांजवळ राहते."

आणि म्हणून अनिता ट्रीप ला गेली होती.

यजमानांना गावाकडेच ठेवून एकट्याच सुमाताई या मुलाकडे आल्या होत्या. सायली ही इयत्ता दहावीत शिकत होती, तर समीर हा सातवीत होता.

ही कथा आपण kusumanjali.com var वाचत आहात 

सुमाताई उठून परत सायलीकडे गेल्या.

"सायली, ए तुला गोळी आणून देऊ का?" 

"नाही ग आई, तू मला झोपू दे ना… तू तिकडे जाऊन बस ."


"अगं तुला इकडे त्रास होत असताना मी तिकडे शांत कसे बसु."

आईला नेमकं काय आणि कोणत्या शब्दात सांगायचे हे तिला कळेना.

"तुला कसं सांगू तेच मला कळेना."

मग सुमाताईंनी तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला आणि प्रेमाने हळुच विचारले.

"तुला काय होतंय ते मला सांग ना."

आई असं म्हणाल्यावर सायलीनं आईच्या कानात सांगीतले, "आई, माझा कीनईऽऽ पिरियड.. कळतो का तुला."

 सुमाताईंनी मानेनेच होकार दिला.

"तर माझा पिरीयड आलेला आहे."

असं तिने सांगितल्यावर सुमाताई तिच्याजवळ बसल्या प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, आणि दोन्ही हात स्वतः च्या डोक्याला लावून कडाकडा बोटे मोडली. (याचा हेतू तिची अलाबला निघून जाऊ.)

"हे कधीपासून?."

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

"उन्हाळ्यातील सुट्टी पासुन."


"समजा चार सहा महिने झाले. अनुने मला काहीच सांगितलं नाही याबद्दल.


"मला, मम्मी डॉक्टर कडे घेऊन जाते. नंतर मग मला बरे वाटते."

"मग जायचे का दवाखान्यात?"

"आत्ता नको. संध्याकाळी जाऊ ठीक."

"बरं तू झोप.आराम कर तुला मी गरम पाण्याची पिशवी देते त्यांनी तू पोट शेक."


तिला होणारा त्रास बघून सुमाताईंचे घालमेल होऊ लागली. 


पण ही गोष्ट चांगली आहे. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतच असतो. बालपण संपुन तारुण्याची पहाट आहे हा क्षण.तर या घडीचा सोहळा हा व्हायला हवा. आपल्या संस्कृतीचे एक मोठेपण आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट पूजनीय आहे. त्या त्या वेळेला तिला महत्त्व देऊन तिची महानता किंवा तिचा सृष्टीला म्हणा किंवा मानवाला म्हणा होणारा उपयोग, फायदा त्यासाठी आधी हे पूजन होय.


गावाकडे सुमाताईंनी या वयातील कितीतरी मुलींचे मनापासून गोड कौतुक केले होते. आवर्जून एखादा गोड पदार्थ करून तिला खायला घातला होता. हिरवी साडी किंवा कपडे नाही तरी बांगड्या वगैरे असे काहीतरी प्रत्येकीला दिलेलेच होते. आणि आता तर स्वतःची नात या उंबरठ्यावर उभी आहे तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते. पहिल्यांदाच हे असते पण मला ते आता कळले आहे. दोन-चार महिने तर झाले म्हणजे जास्त नाही. मग ठरलं तर.. चार दिवस सायलीचे खूप लाड करायचे, चांगले गोड पदार्थ तिला खायला द्यायचे आणि नंतर सुंदर असा ड्रेस तिला घ्यायचा पाच सवाष्णी बोलावून तिची ओटी भरायची. पण लगेच, येथे असे जमेल का? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. कारण ही शहरातील अपार्टमेंट संस्कृती आहे. ही कल्पनाच येथे आवडते की नाही कोण जाणे. असे एक नव्हे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये डोकावु लागले.


मग त्यांनी फोन करून यजमानांनाही कल्पना दिली. तेही ऐकून सुखावले. पण ती वेळ निघून गेली आहे, आता कशाला हे?" असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. पण 

"अहो, जाऊ द्या ना. आपल्याला आज कळाले आहे ना म्हणून मग आपण आताच करूया. त्यासाठीचा मुहूर्त तुम्ही आपल्या जोशी सरांकडे जाऊन काढून घ्या. पाच एक दिवसानंतरचा बघा." असं त्यांनी सायलीच्या आजोबांना सांगितले.

अनुला म्हणजे सायलीच्या मम्मीला हे सरप्राईज द्यायचे होते.


दोन-तीन दिवस सायलीच्या आवडीचे गोड ही आणि पौष्टिकही असे पदार्थ तिला करून खाऊ घातले. जास्तीत जास्त तिला आरामच करायला सांगितला. आणि अगदी समोर बसवून पोटभर जेवू घातले.

जेवताना समीर म्हणायचा, "आता दिवाळी तर नाही. मग, आई तू रोज असे पदार्थ का करते आहे?"

"अरे, दिवाळी पेक्षाही मोठा हा सण आहे, दिवाळी दरवर्षी येते पण हा क्षण स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येतो."

"कोणता?" असे त्याने उत्सुकतेने विचारले.

"तू लहान आहेस बाळा अजून." असे सांगून सुमाताईंनी त्याची समजूत घातली.


अंजूच्या (लेक) या वेळेच्या प्रसंगाची त्यांना तीव्रतेने आठवण झाली. तेव्हा सासूबाई होत्या. त्यांनी अंजूचे लाड करून खूप गोड कौतुक केले होते. आणि साडी घेतली होती. सुमाताईंनी तिला सोन्याची कानातली केली होती.

अंजू ची आठवण आल्यामुळे त्यांनी लगेच तिला फोन केला.आणि तिला हे सर्व सांगितले. पण ती म्हणाली, "आई मी आत्ताच दिवाळीसाठी येऊन गेले. लगेच परत रजा मला मिळणार नाही. यावे तर मलाही वाटत आहे."

"बरे ठीक आहे जाऊ दे."



सायलीचे मम्मी पप्पा येणार त्या दिवसाचा मुहूर्त सुमाताईने काढला. यजमानांनाही यायला सांगितले. त्यांच्या सोबत ननंद बाई(सुमाताईच्या) ही येते म्हणाल्या. एकीला दुसरी सोबत झाली. म्हणून त्यांनाही बरे वाटले. सायलीने "मला घागरा चोली घ्यायची." असे सांगितले.


 म्हणून आजोबांनी तिच्या पसंतीचा पांढरा त्यावर पोपटी, गुलाबी म्हणजे राणी कलरचे सुंदर पॅच आणि त्यावर सुंदर टिकली वर्क असा घागरा तिने घेतला. खूपच छान दिसत होता.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 


सुमाताईंनी त्यादिवशी पाट ठेवून त्या भोवती सुंदर रांगोळी, सायलीच्या मम्मीला काढायला सांगितली. ताटामध्ये ओटीचे सर्व सामान काढून ठेवले. भरपूर फळे आणायला सांगितली.


 सायलीच्या मैत्रिणी आल्या होत्या. त्यांनी सायलीला छान तयार केले वेणी घालून त्यावर गजरेही माळले. अनुनेही तिच्या दोन-तीन मैत्रिणीला यायला सांगितले होते.


हॉल अगदी भरून गेला होता देवा समोर दिवा लावून सुगंधी अगरबत्ती लावल्या. म्हणून छान घरभर सुगंध पसरला होता.


सायलीला पाटावर बसवण्यात आले. कुंकू लावून तिचे औक्षण करून ओवाळले. ओटी भरून तिला पेढा भरवला. त्यानंतर अनिताचे डोळे पाण्याने भरले ती स्वतःची अश्रू रोखू शकली नाही ती सासूबाईंना म्हणाली," मला हे असं काहीच माहित नाही. हे असं काही असते. आजच मला कळाले आहे."


आलेल्या सर्व जणी ही हेच म्हणत होत्या की, आम्हाला असे काही काहीच माहित नाही."


नंतर प्रत्येकीने सायलीला औक्षण करून ओवाळले आणि पेढा भरवला.


मुलीचे हे उमलणारे रूप पाहून सायलीच्या मम्मी-पप्पांना खूप भरून आल्यासारखे झाले होते..


या सर्वांना मग सुमताईंनी सांगितले,

" हे स्त्रीच्या जीवन वेलीवर उमललेलं फुल आहे, त्याचेच पुढे फळ होते."मातृत्व" हे स्त्रीचे वरदान आहे, येणारी पिढी ही तिच्या कुशीतून जन्म घेणार आहे . म्हणून हा तिचा सन्मान सोहळा."


हे सर्व पाहून अनुच्या मैत्रिणी ही खूप खुश झाल्या होत्या. आम्हीपण ,"वेळ आल्यावर हे करणार." असे त्या ठाम म्हणाल्या.


आपली संस्कृती आपणच जपायला हवी आणि ती हस्तांतरितही व्हायला हवी.


सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या