फॉलोअर

देवकीचा कृष्ण ...

     देवकीचा कृष्ण ...


     "ज्योतीऽऽ चल गं जेवायला."

 हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलेल्या ज्योतीला, आईने आवाज दिला.
आईने दिलेला आवाज ज्योती ने ऐकला.पण तीने आईला सांगितले,
 "तुम्ही सगळे जेवून घ्या, मला आत्ताच भूक नाही. जरा वेळाने जेवते."
 ज्योतीने घड्याळ पाहत आईला सांगितले. रात्रीचे आठ वाजले होते.

 "तुझे ताट करू नको का मग?" आईने विचारले. 
"नाही" असे तिने सांगितले.
 "अशी कशी भूक नाही लागली आज तुला?" आईचा प्रश्न "बाहेर काही खाल्लेस का?"
यावर ती म्हणाली," नाही ग, जेवते ना थोड्या वेळाने, तुम्ही सगळे जेवा."

 असं तिचंहे तुटक उत्तर ऐकून, आईला जरा काळजी लागली.म्हणुन त्या लेकी जवळ आल्या,
 "तुला बरं नाही का ग?" असं काळजीपूर्वक विचारू लागल्या.
"तसं नाही काही नाही.माझं काहीही दुखत वगैरे नाहीये. तु जेव गं. जेवते मी नंतर काही वेळाने." तिच्या डोळ्यांमधली अस्वस्थता त्यांना जाणवली त्या डोळ्यांत एक आस होती. पण विचारण्याचा मोह त्यांनी आवरला होता.
 "काय झाले आहे?सांगशील का मला थोडं काही तू."आईने न राहवुन विचारले.
 "काही नाही ग आई. मला आज तीन चार वेळा उचक्या लागल्या होत्या. म्हणून थोडं अस्वस्थ वाटत आहे."
 असे म्हणताना, तिच्या नेत्र कडा पानावल्या होत्या. पण त्या आईला दिसू नये. याची तिने काळजी घेतली होती.
"एखाद्या तासाने जेव मग."
 हो ग, जेवते मी तु जा जेव."

 असं म्हटल्यावर जड पावलाने, त्या किचनकडे वळल्या. आणि सर्वान सोबत म्हणजे मुलगा सून नातवंड यांच्यासोबत जेवायला बसल्या.
पण त्यांचे लक्ष जेवणात नव्हते.
या पोरींची काळजी त्यांचे 
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 
ज्योती नाही. हे पाहून भावानेही मग तिला आवाज दिला. पण तिला जेवायचं नव्हतं. ती गेली नाही.

 आई किचन कडे निघून गेल्यानंतर, मात्र तिचं टीव्ही पाहण्यातले लक्ष पार उडाले. आणि हे मनाचे फुलपाखरू, भूतकाळातील या फुलावरून त्या फुलावर उडू लागले.ज्योती एक घटस्फोटीता. सात आठ वर्षांपूर्वी तिचा दीपक सोबत घटस्फोट झालेला, म्हणून ती माहेरीच राहत होती. अकरा बारा वर्षाचा एक मुलगा होता. त्याची जबाबदारी ही नवऱ्यानेच घेतली होती. पर्यायाने तो त्यांच्याकडेच होता. हिचा लळा त्याला जास्त नव्हताच. तो सर्रास घरात आजी आजोबा, आणि त्याच्या पप्पांचा जास्त लाडका होता. हिचाही वेळ जास्त घरातील कामात जात होता.

 घरात एकत्र कुटुंब होते. दीर, जाऊ अशी मोठी फॅमिली असल्यामुळे, असं कधी तिच्या लक्षातही नाही आले. पुढे काही कारणास्तव दोघांची सतत भांडण होऊ लागली. ही सहन करत राहिली. आणि एक दिवस माहेरी निघून आली. ती आली ती आलीच. परत तिला न्यायला कोणी आलेच नाही. आणि मुलालाही कोणी येऊ दिले नाही.

 काही दिवसांनी घटस्फोटाची नोटीस हिला पाठवली. तेव्हापासून माहेरीच राहत होती. स्वतःचा वेळ घालवण्यासाठी काहीतरी काम करत होती. असं हे वाळू सारखं हातातून निसटून गेलेलं तिचं संसाराचं चित्र होत.आणि आयुष्याचंही..


काही वेळाने सर्वांची जेवणं झाली. सगळे आपापल्या कामाला लागले.कोणी मोबाईल घेऊन बसले, कोणी टीव्ही समोर बसले, कोणी अभ्यास, तर कोणी काही वाचन करत बसले. आई ही थोडं वाचन करत बसली. ही मात्र टीव्ही पाहण्यातच गुंग होती. की स्वतःला गुंतवून ठेवत होती.
हे कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

 बराच वेळ झाला होता. सगळी आता झोपण्याच्या तयारीत होती. इतक्यात दाराची बेल वाजली.विलासने, म्हणजे ज्योतीच्या भावाने दार उघडले, तर दारात एक नव तरुण उभा होता.

त्याने विचारले,"विलासराव येथेच राहतात का?"
"हो, मीच आहे. पण तू कोण?"
 विलासने विचारले.

"सांगतो. मी जरा आत येऊ का?"तो म्हणाला.
"ये." असं म्हणून विलास ने त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली. तो मध्ये येऊन बसला.
 मग हळूच म्हणाला."मी शुभम आहे विलास मामा, तुम्ही थांबू देणार नाही मला, पण मला फक्त आईला भेटायचे आहे.तिला भेटून, मी निघून जाईल. शुभम म्हणाला.

 त्याचे हे बोलणे संपेपर्यंत ज्योती आणि आई ही समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या.
विलास मात्र नि:शब्द झाला होता.

 पुन्हा शुभम म्हणाला."माझी आई कुठे आहे?"

 ज्योतीचा त्याला बघून स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. की हे माझे लेकरू आज एवढे मोठे झाले आहे. ती आपली याच समजात होती की, शुभम तेव्हाचा तेवढाच आहे. अकरा वर्षाचा. पण काळ, कुणासाठीही थांबत नाही. याचेच हे उदाहरण.

 तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. जणू त्याही याला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या.

विलास ने आवाज दिला, "ज्योतीऽऽ इकडे ये." "हो आले दादा." असं म्हणताना तिला, हुंदका दाटून आला होता.


"कशी आहेस आई? ओळखले का मला?" शुभम म्हणाला.

 मुलाला आपली स्वतःची ओळख, स्वतःच्याच आईला करून द्यावी लागत होती.( हे वाक्य लिहिताना मला खूप अवघडल्यासारखे वाटत आहे पण..)

"मी बरी आहे.तू कसा आहेस? कशी आठवण आली आज तुला माझी?" ज्योती म्हणाली.
"मी मोठा झालो ना आता.कळतंय मला सगळं." शुभम म्हणाला.
 असं म्हणता म्हणता, तो आईच्या, मामाच्या आणि मग आजीच्याही पाया पडला.

 एवढ्यात मामीने त्याला प्यायला पाणी दिले. "कशा आहात मामी?"
"मी बरी आहे. तू कसा आहेस?"
 "मीही ठीक आहे. कॉलेजला असतो बाहेरगावी. तीन दिवस सुट्टी आहे. म्हणून तुमच्याकडे यायचे ठरवले. आजी आणि आजोबा दोघेही गेली. बाबांचे माझ्याकडे विशेष लक्ष नसते. आणि दुसरी आई (म्हणजे सावत्र) तिला तर मी डोळ्यासमोरच नको असतो. माझी स्वतःची आई असूनही आपण तिच्या ममते पासून वंचित राहतोय. ही गोष्ट मनाला सारखी खात होती. म्हणून इथे येण्याची हे धाडस मी केले. तुम्हाला याचे
वाईट वाटो किंवा चांगले वाटू. मला काहीच फरक पडणार नाही."
ही कथा आपण kusumanjali.com var वाचत आहात 
 हे ऐकत असताना ज्योती च्या काळजावरच घाव बसत होते. आणि डोळे तर वाहतच होते. तो बोलत होता. सगळे मात्र नुसते ऐकत उभे होते. 
 "जेवलास का रे बाळा?" आजीने हळूच विचारले. शुभमने नुसतीच मान हलवली.
"उठ आधी हात पाय धुऊन घे, आणि जेवण कर. बघ तुझ्या येण्याची चाहूल, तुझ्या आईला आधीच लागली होती. म्हणूनच आज तिची जेवायची इच्छा नव्हती. आता दोघेपण जेवा सोबत.जाग पोरी, जेवू घाल लेकराला पोटभर. आणि तुही जेव आता आनंदाने."

 आई असं म्हणाल्यावर तिला काय करू, आणि काय नको. असं झालं.शुभम हात पाय धुऊन येऊन , दोघेही जेवायला बसले.

 जेवताना दोघा मायलेकरांची मन मायेच्या जिव्हाळ्याच्या ओलाव्याने भिजली होती. तिच्या मनाचे सुप तर आनंदाच्या, समाधानाच्या लाह्यांनी गच्च भरले होते, नव्हे भरून सांडलेही होते.

 ज्योतीसाठी जणू ही नव्याने पुन्हा पहाट हो ईल का??


सौ. शुभांगी सुहास जुजगर. 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या