फॉलोअर

बाळा होऊ कशी मी उतराई?

 बाळा होऊ कशी मी उतराई? 

सायंकाळचे साडेपाच वाजले होते. सुषमा सहा वाजण्याची वाट पाहत बसली होती. संजयचे ऑफिस सहाला सुटते म्हणून. ती स्वतःची सर्व आवरून बसली होती. संजय आला की, फ्रेश होऊन, चहा पिऊन, लगेच निघता येईल! असे ठरवून. 
'आज 14 फेब्रुवारी'
 म्हणजे संजय आणि सुषमाच्या लग्नाचा वाढदिवस. प्लस व्हॅलेंटाईन डे. म्हणूनच दोघांनी मस्त बाहेर फिरायला जाण्याचा बेत केला होता.
 सुषमाच्या लग्नाला आज सात वर्षे पूर्ण झाली होती. पण!! तिच्या घरी अजूनही पाळणा हल्ला नव्हता. प्रयत्न चालूच होते. रिझल्ट मात्र येत नव्हता.

 एकदा ती, नातेवाईकाच्या गावी लग्नाला गेली असता, तेथील प्रसिद्ध असलेल्या देवस्थानी ती दर्शनाला गेली होती. तेव्हा तेथील महाराजांनी ईच्याकडे बघून सांगितले होते की, 
"तू नक्की आई होणार, आणि दोन अपत्ये तुला असणार आहेत."

 हेच एक वाक्य तिने पक्के लक्षात ठेवले होते. आणि 'आपण भविष्यात केव्हातरी आई नक्कीच होणार आहोत.' या कल्पनेतच ती नेहमी आनंदी असायची.

 इकडे तिकडे गेल्यावर तिला' पोटी मुल नाही' 'वांझ आहे' अशी टोमणे ऐकावी लागत असे. म्हणून तिने बाहेर जाणे आताशा टाळणेच पसंत केले होते.
 उलट संजयचे होते. त्याचे दिवसभर ऑफिस असे. ऑफिस नंतर मोबाईल आणि टीव्ही पाहणे. तो पसंत करीत असे. शिवाय डेली वर्तमानपत्र ही होतेच.

 दाराची बेल वाजली म्हणून सुषमानी दार उघडले. संजय आलेला होता.
 त्याला पाहून सुषमा गोड हसली. आणि "या" म्हणाली.
" आलोच" संजय.नंतर त्याने हातातील बॅग आणि पिशवी सुषमा कडे दिली. 
ते पाहून तिने विचारले.
"यात तर साडी दिसते आहे."
" हो गं, मॅरेज एनिवर्सरी आहे, म्हणून आणली आहे. बघ ना. कशी आहे ते?" संजय म्हणाला.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 
 असं म्हणून तिने हळूच साडीची घडी उकलली.आणि तिला साडी खूपच आवडली. "छान आहे साडी, कुठून घेतली आहे." "आवडली नाऽऽ. मग आज. आत्ता ती तु घालणार आहेस. मी तिला फॉल वगैरे लावून आणलेला आहे." संजयने सांगितले.
"जो आज्ञा सरकार."असे
त्याच्याकडे पाहून ती म्हणाली.


 दोघे निघाली.'गावाबाहेरील राणीच्या बागेत जायचे.' असे ठरले. येताना बाहेरच जेवूनही यायचे. असा हा गुलाबी बेत करून दोघेही बाहेर पडले.

 संध्याकाळची वेळ असल्याने सूर्य मावळ तिला झुकला होता. त्याचे ते सोनेरी किरणे आभाळभर पसरले होते. हवेमध्ये किंचितसा गारवा जाणवत होता. अशा या अल्हाददायक वातावरणात आनंदात असणाऱ्या युगुलाला अधिकच उल्हासीत करत होते.

अत्यंत स्लो वेगात गाडी गावाच्या बाहेर पडली होती. त्यांना काहीच घाई नव्हती.

 इतक्यात, दोघांनाही खूप मोठा आवाज ऐकू आला. म्हणून संजयने गाडीचा वेग वाढवला. तर पुढे… एका टू व्हीलर गाडीचा अँक्सीडेंट झालेला होता. एकेक माणसे तिथे जमा होऊ लागली होती. गाडीवरचे दोघेही जण लांब पडले होते पटकन कुणीतरी ॲम्बुलन्स बोलावली होती.
 असे सर्व पाहून सुषमा गोंधळून गेली. तिचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. समोरचे दृश्य पाहून!!
 इतक्यात लहान मुलांच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. त्या आवाजाच्या दिशेने तिची पावलं आपोआप वळलीव त्याचा शोध ती घेऊ लागली. एका छोट्या खड्ड्यात तिला ते गोंडस असे मुल दिसले. तिने पटकन त्याला उचलून घेतले. आणि त्याला कुठे लागले आहे का? हे ती बघू लागली. त्याचे रडणे चालूच होते. त्याला मग तिने पाणी पाजले. पाणीही ते पेईना.कारण ते खुपच घाबरले होते. त्याच्या अंगात स्वेटर, पॅन्ट आणि डोक्यात टोपी, असल्यामुळे त्याला मार लागलेला नव्हता. तर ते अलगद उडून पडले होते. तिने त्याला घट्ट छातीशी धरले म्हणून कुठे ते जरा शांत झाले. समोरचे दृश्य पहावत नव्हते. म्हणून ती त्या मुलाला घेऊन गाडीत बसली. पाच सात मिनिटात ॲम्बुलन्स आली.आणि दोघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. म्हणून या दोघांनी पण हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्या दोघांवर उपचार सुरू झाले. या बाळालाही काहीतरी खाऊ घालाणे किंवा दूध पाजणे गरजेचे होते. त्याचे रडणे मधुन मधुन चालुच होते.सुषमाची चांगलीच कसरत चालु होती. म्हणून दोघांनी त्याला नादी लावून दूध पाजले बिस्कीटही खाऊ घातली मग तेथोडे शांत होऊन खेळू लागले. 'त्याच्या निरागस चेहऱ्यावर दुःखाची छटा देखील नव्हती. खरंच बालपण किती निरागस असते. कसलीही चिंता नाही, की कसली काळजी नाही की टेन्शन नाही. अनोळखी व्यक्तीजवळ देखील ते किती आनंदाने खेळत होते.'
ही कथा आपण  kusumanjali.com वर वाचत आहात 
 रात्रीचे दहा वाजले होते. मुलाचे आई-वडील दोघेही अजून शुद्धीवर आलेली नव्हती. म्हणून मग या दोघांनी घरी येण्याचे ठरवले. त्या वेळेपर्यंत बाळ मस्त झोपले होते.

 आता पर्यंत, त्या दोघांचेही कोणी नातेवाईक यायला पाहिजे होते पण!! कोणीही आलेले नव्हते. 
म्हणून मग "बाळाला घरी घेऊन जातो. आणि रात्री मला केव्हाही फोन करा. मी या बाळाला घेऊन हजर होईल."
 या अटीवर ते दोघेही मुलाला घरी घेऊनआले. भुक प्रचंड लागलेली होती. पण जेवायची अजिबात इच्छा नव्हती. बाळ मात्र झोपलेले होते. यांना दोघांनाही झोप येईना.. 'कधी फोन येईल, आणि कधी आपल्याला जावं लागेल.'.
याच विवंचनेत.

 "नियतीने. एखादी वस्तू अलगद झेलावी तशी. फुलासारखं या बाळाला झेलून घेतलं होतं.

 सकाळी उठल्यावर सुषमाचे मन कशातही लागेना. पण तरीही तिने यंत्रा सारखं भरभर सर्व आवरलं. बाळही किरकिर करू लागले. पण त्यालाही जरा नादी लावून दूध पाजलं होतं.मग ते जरा शांत झाले. आपली आई नाही हे त्याला जानवतही असेल..

 दोघेही हॉस्पिटलमध्ये आली. पण!!

 आल्यावर कळाले की,"दोघेही पहाटे चार च्या दरम्यान गेले होते. हे ऐकून, दोघांनाही खूप खूप वाईट वाटले, पण काय करणार? विलाज नव्हता काही."
  त्या दोघांचे कोणीच नातेवाईक आलेली नव्हती. पोलिसांनी तपास केला. नातेवाईकां कडे.आणि जिथे राहत होते तिथे जाऊन. त्यांच्या ऑफिसमध्येही चौकशी केली.
 तर "त्यांनी आंतरजातीय विवाह केलेला होता, आणि म्हणून घरच्यांनी संबंध तोडले होते, लेकराची ही जबाबदारी कोणीही घेणार नव्हते." आणि कोणी तयार होईल असेही कुठे जाणवले नाही. म्हणून मुलाला अनाथ आश्रमात ठेवायचे ठरवले.

 हे सर्व पाहून सुषमाच्या मनाची उलघाल होऊ लागली. हातातलं मुल कुठेतरी अनाथ आश्रमात ठेवायचे? हे तिच्या मनाला पटेना. पंधरा-सोळा। तासापासून ते मुल तिच्या हातामध्ये होतं. आणि तिची माया ममता जागी झाल्यासारखे तिला वाटले. त्या मुलाविषयी खूपच आपुलकी आणि प्रेम, तिला वाटू लागल, आणि त्या मुलाचा चांगलाच लळा हिला लागला होता.

 म्हणून तिच्या मनात एक विचार चमकून गेला. 'की आपणच जर या मुलाला दत्तक घेतले तर? काय हरकत आहे.'
 आणि तिने क्षणाचाही विलंब न करता लगेच संजयला हे सांगितले. तो "नाही" म्हणाला. "नसते झंझट मागे लागेल आपल्या."
"प्लीज माझ्यासाठी हे करा.आणि हो म्हणा." हे म्हणताना तिचे डोळे भरून आलेले त्यानी पाहिले. आणि तो विरघळला. "बरे बघतो मी, काय करता येते ते." असे म्हणाला.
 
 ते मूल, या दोघांनी कायदेशीर दत्तक घेतले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

 सुषमाला सकाळ झाली तरी, उठावेसे वाटत नव्हते. अंगात जरा कणकण वाटत होती. थोडी चक्करही आल्यासारखे तिला होत होते.

 म्हणून मग संजयच सकाळी उठला. बाळ म्हणजे स्वयंम हाही उठून रडत होता. त्याचे सगळे कार्यक्रमही आवरून झाले. मग मात्र त्याला भूक लागली. म्हणून मग संजयनेच थोडा नाश्ता बनवला, स्वयमला खाऊ घातला. सुषमाला ही "रवा" म्हणून सांगितले. पण तिने "खावेसे नाही वाटत" असे सांगितले.
"चल उठ थोडं आवरून घे, हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण."

स्वयंम, आल्यापासून म्हणजे ,चार-पाच महिन्यापासून तुझी जरा जास्त दगदग होत आहे. विकनेस असेल कदाचित. चल जाऊन येऊ."
  हिला उठावेसेही वाटत नव्हते. तरीही ती उठली, आणि स्वयंमला जरा वेळ कुशीत घेऊन बसली. त्यानेही तिला जरा हुरूप आला, त्याचा तो रेशमी स्पर्श, डोळ्यातील निरागस भाव हे सांगत होते. "चल उठ. असं झोपून कसं चालेल? मला कोण पाहिल. बाबा तर ऑफिसला जाणार आहेत." हा भाव तिच्या मनात आला. आणि ती एकदम उठली. पटकन कसं तरी तयार झाली. तिघेही हॉस्पिटलला आली स्वयमला कड्यावर घेऊनच संजयने सर्व मॅनेज केले. 

 दोन ते सव्वादोन वर्षाचे ते मुल होते. पण अगदी दोघांचं आयुष्य त्याने बदलून टाकलं होतं. या चार महिन्यात घर खेळणीने भरून गेले होते. त्याचे कपडे!! त्याचे तर किती प्रकारचेऽऽ बापरे बाप!!

 आणि या दोघांना भेटायला येणारे. म्हणजे ,फ्रेंड्स असू दे, किंवा नात्यातलं प्रत्येक जण, स्वयमला काहीतरी गिफ्ट आणत होते. त्याने केलेला घरभर पसारा. आवरण्यात आणि त्याचे सगळे वेळेवर आणि व्यवस्थित करण्यात. तर सुषमाचा दिवस कसा जात होता. हे तर तिलाही कळत नव्हते. 

सुषमाचे चेकअप झाले. तिला सलाईन लावले. म्हणून दोन-तीन तास दवाखान्यातच थांबावे लागणार होते.
 डॉक्टर मॅडमने संजय ला बोलावले. "काँग्रॅच्युलेशन सर, तुम्हा दोघांचे." मॅडम म्हणाल्या.
"पण काय झाले आहे?" संजयने विचारले.
 "सर, तुम्ही बाबा होणार आहात. सुषमाजी प्रेग्नंट आहेत." असं ऐकल्यावर संजयचा तर कानावर विश्वासच बसेना. म्हणून पुन्हा मॅडमला विचारले. खात्री पटल्यावर त्याला खूप खूप आनंद झाला. आणि मनात म्हणू लागला. 'हे ऐकण्यासाठी गेल्या काही वर्षापासून कान किती अतुर झाले होते.त्यासाठी प्रयत्नही खूप केले होते. आणि आज. अचानक असे ऐकायला मिळाले.' 

त्याला खूप असं छान वाटत होते. आणि सहज त्यानी स्वयंमच्या डोक्यावर हात ठेवला.

 सुषमा ही हे ऐकून खूपच खुश झाली होती. तिचाही आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. ती देवाची खूप खूप आभार मानत होती.

 मी किती वेळा पासून "स्वयमला माझ्याकडे द्या, असं सांगत होती." पण तिला सलाईन चालू असल्यामुळे तिच्याकडे कोणी त्याला देत नव्हती.
 त्याला जवळ आणायला सांगितले. स्वयंमला जवळ घेऊन त्याचे पटापटा मुके घेऊ लागली. कीती माया करू आणि कीती नाही. असे तिला झाले होते.
 "बाळा तुझ्यामुळेच मला आज हा दिवस दिसला, बाळा, कशी होऊ तुझी उतराई." असे म्हणून ती तिचे डोळे भरून वाहू लागले.

पुढे..
 सुषमाला कन्यारत्न प्राप्त झाले. याबरोबरच तिचे अपूर्ण मातृत्व पूर्ण झाले. आणि घर आनंदाने आणि सौख्याने भरले. आई, बाबा, बहीण, भाऊ अशी सगळी नाती, या घरात सुखाने नांदू लागली.आणि सोन्याचा हा संसार अधिकच उजळला. आणि म्हणूनच या मुलीचे नाव "सौख्या" असेच ठेवण्यात आले.

सौ. शुभांगी सुहास जुजगर. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या