फॉलोअर

दैव जाणिले कोणी...

 दैव जाणिले कोणी... 





संध्याकाळची वेळ होती.

 लहान, मोठी अशी सर्वच मुले एकत्र खेळत होती. त्यात मोठी मुले, जरा क्रिकेटच्या मागे होती. म्हणजेच ती क्रिकेट खेळत होती.

 आणि थोडी लहान म्हणजे, पहिली दुसरीची. ही आपापल्या मित्रांसोबत. आवडीचे खेळ खेळत होती.

 जवळच्याच ओट्यावर या मुलांच्या आया ही गप्पा मारत बसल्या होत्या.त्याच्यही गप्पा चांगल्याच रंगात होत्या.

 पण मध्येच.. 

छोटा करन रडत, रडत आईकडे म्हणजेच मनीषा कडे आला, आणि म्हणाला, 

"आईऽऽ बघ ना मला त्या आर्यनने चापट मारली."

" का बरं रे." मनीषा ने विचारले.

"माहित नाही. आम्ही खेळत होतो. तर त्याने मला मारले." करन म्हणाला.


 हे ऐकून मनीषा तावातवाने उठली. आणि 'कुठे तो आर्यन' असं म्हणत त्याच्याकडे गेली. 


आणि त्याला म्हणजे आर्यनला, जोराने विचारू लागली," का रे, का मारलस माझ्या करनला?"

"कुठे? मी नाही मारलं काकु करनला. माझं मी इथेच खेळतो आहे. त्याचाच इथे पाय घसरला, आणि तो पडला." असे आर्यनने स्पष्टीकरण दिले.

 हा सगळा गोंधळ ऐकून आर्यन ची आई म्हणजे आशा.तीही आली आणि,

"का? काय झालं?" असं विचारू लागली. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

"बघनाऽऽ लेकराला मारून, तुझं पोरगं नाही म्हणतय." असं जरा तोऱ्यातच मनीषा आशाला म्हणाली. 

 "नाही मारूनही, तुझं पोरगं 'मारलं' म्हणते गं" असं आशानेही सांगितलं.

पण ऐकुन कोण घेतो..?


 झालं या एकमेकींच भांडण सुरु झालं. पैशावरून, परिस्थितीवरून, साड्या, खाणं अगदी अंगण झाडणे, कचरा लावणे, अबब!! सगळे विषय या भांडणात होते. सगळी मुलं खेळायचे थांबवून यांची भांडणच ऐकत बसली.


"हो ना तुझं पोरगं हुशार नाही मुळीच. काहीच येत नाही त्याला.आणि तुझी कुठे ऐपत आहे गं पोराला चांगल्या शाळेत घालायची." मनीषा म्हणाली.

" तुला काय करायचे गं? मी माझ्या पोराला साध्या शाळेत घालीन, नाहीतर आणखी कुठे. तू घातलस ना, तुझ्या पोराला चांगल्या इंग्रजी शाळेत. बघूया ना काय दिवे लावतो ते." आशाने उत्तर दिले.


" होऽ होऽ बघशीलच. तुझं पोरगंही काय दिवे लावीन, ते मीही बघेनच."जरा गुरमीतच मनीषा म्हणाली.


 

"आम्ही फक्त शिकून त्यांना शहाणे करणार आहोत.माझा पोरगा हुशार आहे की नाही हे ठरेलच वेळ आल्यावर." 

आशाने समजून घेत सांगितले.


 असं म्हणून ती पोराला घेऊन घरात निघून गेली. या भांडणांचा ताण चांगलाच तिच्या मनावर झाला. ' पण संयम ठेव,आशा संयम ठेव.' असे तीचे मन तिला बजावून सांगत होतं.



तर अशा या मनीषा आणि आशा.


 सख्या चुलत जावा. एकाच जागेत राहायच्या. यांची ही तिसरी पिढी म्हणू हवं तर..

 पहिल्या पिढीत भाऊ भाऊ वेगळे..

 नंतर दुसऱ्या पिढीत भावांची मुलं वेगळी वेगळी.. आणि या तिसऱ्या पिढीत मुलांची मुलं वेगळी वेगळी.. असे असो.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

  कोणी परिस्थितीने वेल होते. तर कोणी साधारण. जीच्या नवऱ्याची कमाई चांगली. ती वेल स्थितीत. आणि जिच्या नवऱ्याची साधारण, ती साधारणच. तर अशाच या दोघी एक वेल आणि दुसरी साधारण. अशी यांच्या कुटुंबाची स्थिती होती. यांची मुलं पहिली इयत्तेत शिकत होती.

या एका प्रसंगातून तिने.. म्हणजेच आशाने मनावर तर संयम ठेवला होताच. पण..

 नुसता संयम ठेवून चालणार नव्हतेच मुळी. 'काहीही झाले तरी, पोराला व्यवस्थित शिक्षण द्यायचेच' असे तिने मनात पक्के केले होते. चाहे कुछ भी हो जाये.


 आर्यनच्या बाबांची जेमतेम कमाई घरात येत होती. शिवाय आर्यनला लहान बहिणही होती. असं हे कुटुंब होतं. आता मलाही काहीतरी करून, थोडाफार घराच्या खर्चात हातभार लावायलाच पाहिजे. असे तिने ठरवले.


आणि कामही घरात राहूनच तिला हवे होते. काही दिवसानंतर दोन व्यक्तींच्या जेवणाच्या डंब्यांचे काम तिने स्वीकारले. हे व्यवस्थित ती करू लागली. त्यामुळे दोन पैसे हातात येऊ लागले.


 असे करत करत आर्यन आता चौथी तुन पाचवीत गेला होता. मग तो ट्युशन साठी हट्ट करू लागला. म्हणून त्याला पाचवीपासून ट्युशन चालू केले त्यामुळे खर्चात ही भर पडली. मग आशाने मैत्रिणीचा बचत गट होता. त्यातही पैसे भरायला सुरुवात केली. यामुळे एक फायदा झाला.


 'पाहिजे तेव्हा एक छोटेशे कर्ज तिच्या हाताशी उपलब्ध होऊ लागले.' याद्वारे कर्ज घेऊन तिने पिको करायची मशीन घेतली आणि दररोज तिच्याकडे पिको करण्यासाठी साड्या येऊ लागल्या. डबेही पूर्ववतच होती. त्यानंतरच्या वेळात हे साडी पिको चे काम वाढले होते. छोटी सलोनी पण आता शाळेत जात होती. तीही अभ्यासात हुशारच होती.


 एक दिवस आर्यन म्हणाला,

"आई बाबा तुम्हा दोघांनाही आमच्या शाळेत बोलावले आहे. तुम्हा दोघांचाही सत्कार करणार आहेत."

 नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला होता.आर्यन ने, पहिला नंबर सोडलेला नव्हता. तो 90% पेक्षा जास्त मार्क घेऊन पहिला आला होता. अजूनही बरेच मुले होती 90% च्या वर. त्या सर्वांचे आई-बाबा पण या कार्यक्रमासाठी येणार होते. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 

"असंऽऽ सगळ्यांचेच आई-बाबा येणार आहेत? किती जण आहेत?" बाबांनी आर्यनला विचारले.


 "15 जण 90% च्या वर आहोत बाबा, बाकी माहित नाही, मॅडमनी आवर्जून सांगितले आहे. दोघांनी पण चलायचे आहे बाबा. तुमचा कोणताही बहाना चालणार नाही. या वेळेला. आणि हो. सलोनीऽ तुला पण यायचे आहे. तुझी नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तुलाही त्यांनी बोलावले आहे." आर्यन ने सांगितले.

" होका. कधी आहे हा कार्यक्रम?" सलोनीने विचारले.

"उद्या सकाळी ठीक साडेदहाला कार्यक्रम सुरू होणार आहे." आर्यनने सांगितले.


 मुलाने असं सांगितल्यावर दोघांनाही. म्हणजे आशा आणि तिचे पती यांना अंगावर मुठभर मास चढल्यासारखे झाले होते.


शाळेत कार्यक्रम चालू होता. आशा आणि तिचे पति स्टेजवर खुर्चीत बसले होते. टॉप आलेल्या इतर मुला मुलींचे आई बाबा पण होते. 


पण असं हे सर्व मंडळी समोर, स्टेजवर, मान्यंवरा सोबत बसणं. हे आर्यनच्या आई-बाबांना प्रौढ फील करून देत होतं. त्या क्षणी आशाच मनात " जीवनात ही घडी अशीच राहू दे"हे गीत रुंजी घालत होतं.


बारा वर्षानंतर…


"करनऽऽ अरे हे पेढे आणलेत तुझ्या बाबांनी. बघ बरं देवाला ठेव. आणि हात जोडून त्यांना नमस्कार कर. आणि 'अशीच माझी प्रगती होऊ दे' असे देवाला सांग. नंतर बाहेर सर्वांना वाटुन ये" असं आशाने आर्यनला सांगितलं.


 आर्यन चा बारावीनंतरच्या शिक्षणासाठी, चांगल्या कॉलेजला नंबर लागला होता.


"हे पेढे घ्या काकू." असं म्हणून आर्यन मनीषा काकूच्या पाया पडला.

 "कशाचे रे हे?" असं मनीषाने उत्सुकतेनं विचारले.

"माझा नंबर लागला, पुण्याच्या कॉलेजला काकू". असं आर्यनने सांगितलं.


"वाऽ वाऽ वाऽ अभिनंदन बर का." मनीषा म्हणाली.


" काकू करन कुठे आहे?" आर्यन ने विचारले. "आहे ना हॉलमध्ये." असं म्हणून त्यांनीच करनला आवाज दिला.


"आलो" असं म्हणत करन किचनमध्ये आला. "माझा नंबर पुण्याच्या कॉलेजला लागला आहे." असं म्हणत आर्यनने करनला पेढा दिला.

"अरे मी पण वाट बघतोय ना!! माझा कधी लागतो काय माहित?"असा प्रश्नार्थक भाव आर्यनचा.

 

"तुझा बराच चांगल्याच कॉलेजला नंबर लागला रे. चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय." असे जरा खोचकपणेच मनीषा म्हणाली.

"हो काकू, अभ्यास करूनच नंबर लागला माझा." आर्यन असं म्हणून घरी आला.

आणि आईला म्हणाला, "ए मी नाही वाटत गं"



पहिला, दुसरा, तिसरा राऊंड झाला तरी करन चा नंबर मात्र कुठेच लागला नव्हता.


 हे पाहून मनीषाने," कितीही पैसे लागू द्या, पण माझ्या पोराचा नंबर पुण्याच्या कॉलेजला लावा." असं नवऱ्याला सांगितलं.

"अग पण राहू दे. एखादे वर्ष करू दे त्याला अभ्यास. रिपीट करू दे त्याला." असं करनचे बाबा म्हणाले.

"ते काही नाही, माझ्या पोराचा नंबर याच वर्षी लागला पाहिजे." असे त्यांनी बजावून पती राजांना सांगितले.


 मग काय.. ह्यांना काहीतरी खटपट करावीच लागली.

 पुण्याला जा. याला भेट. त्याला भेट. ओळखीच्या माणसाकडून काही होते का ते पहा.

ही कथा आपण kusumanjali.com var वाचत आहात 

हुश्श!!

एकंदरीतच त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आणि करन चाही नंबर पुण्यातील चांगल्या कॉलेजला लागला. अर्थातच त्यासाठी करनच्या बाबांना भरपूर असे.. (समजुन घ्या)


इकडे मात्र आर्यनने..

त्यादिवशी. भांडणात झालेला 'आपल्या आईचा अपमान' त्याने चांगलाच लक्षात ठेवला. हुशार तर तो होताच! साधी शाळा का असेना, पण शिकवलेले तो व्यवस्थित लक्षात ठेवून अभ्यास करत होता. ट्युशनही त्याला लावलेली होतीच. खेळण्यातले लक्षही त्यांनी काढून घेतले. फक्त अभ्यास अभ्यास.यावरच लक्ष केंद्रित करून वर्गातला पहिला नंबर त्यांनी सोडला नाही. नेहमीच शिक्षकाचे मार्गदर्शन ही त्याला लाभत होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे आज त्याचा चांगल्या कॉलेजला. पुढच्या शिक्षणासाठी लागलेला हा नंबर होता.


 आर्यन आणि करण हे दोघेही पुण्याला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.


 पुढे दोघापैकी कोण? चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होतो. हे वाचणे ही रंजक ठरेल.


दोघांचे व्यवस्थित कॉलेज सुरू झाली.


वेगवेगळ्या कॉलेजला दोघेही होते. पहिलं वर्ष आर्यन टॉप 20 मध्ये आला.


 मात्र करन, जेमतेम काठावर पास झाला. दुसऱ्या वर्षीही आर्यन टॉप 20 मध्ये आला.


 आणि करन मात्र, सगळे विषय काढूही शकला नाही.


 योग्य मित्र लाभणंही खूपच गरजेचे असते. आणि नेमकं हेच, करन च्या बाबतीत झाले. आर्थिक सुबत्ता होतीच. त्यामुळे कधीच 'नाही' हे ऐकायची सवयच नव्हती. आणि वेळही आली नाही.


मग असेच मित्र जवळ करू लागले. आणि जे नाही करायला पाहिजे ते तो करू लागला. पर्यायाने अभ्यासातील लक्ष उडाले.आणि तो झालाच नाही.त्याचा परिणाम परिक्षेवर झाला.


पाचव्या सेमिस्टरला तर सगळेच विषय बॅक राहीले.प्लस मागील सेमिस्टर चे राहीलेले.हे सर्व पाहून त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकु लागले. आणि

 'आपल्याला हे अवघड होत चाललंय.झेपण्याच्या पलीकडे जात आहे.' असं त्याचं मन, त्याला सांगु लागले.


म्हणून त्याने काॅलेज सोडुन घरी परत येण्याचे ठरवले. आणि तो घरी परत आला.


आई वडिलांना सरळ सांगून टाकले .

"मला येथेच राहायचे आहे. येथीलच कालेज मध्ये मी अँडमीशन घेणार आहे." 


झाल 'आई-वडिलांनी डोक्याला हात मारून घेतला' एवढा पैसा खर्च करून शेवटी पदरात काय पडले? आणि आता वर अजून टीसी काढायची. म्हणजे त्या कॉलेजलाही पैसे द्यावे लागतील.


"काय? केलेस काय तु दोन वर्षे?" असे एक नाही अनेक प्रश्न करनच्या आई-बाबांना सतावू लागले.


 आर्यन ने प्रत्येक सेमिस्टर ला टॉपच येत राहिला. कारण त्याने आपला फोकस फक्त अभ्यासावर केंद्रीत केला होता. त्याला फारसे मित्रही नव्हते. त्याचे आई-बाबा त्याला मोजकेच पैसे पाठवत होते त्यामुळे. त्यामध्येच पूर्ण महिना याला खर्च भागवावा लागत होता.म्हणुनच अवांतर आवडी याने पाळल्या नाहीत.


काही दिवसांनी…


 आर्यन परत मनीषा काकुंकडे पेढे द्यायला गेला.

 म्हणाला," काकू मी चांगल्या मार्काने पास झालो आहे. आणि माझे नोकरीसाठी सिलेक्शन ही झाले आहे. घ्या तोंड गोड करा." मनीषा काकूंनी अनिच्छेनेच पेढा घेतला आणि "अभिनंदन" असं सहज त्यांच्या तोंडातून निघून गेले.


 कारण त्यांना चांगली चपराक बसली होती. त्यांचा तोराच मुळी, मुलामुळे वाकला होता. '


'आपण विनाकारण जाऊ बाई आणि मुलांना कमी लेखत होतो. खरं तर त्यानेच खरी चिकाटी दाखवून अभ्यास केला होता. जिद्द ठेवून, ध्येय धरून, यशाचे शिखर गाठले होते. 'माझे मेलीचं चुकलंच! मलाही हे का कळाले नाही?" असा प्रश्न त्या स्वतःलाच विचारू लागल्या.


 "जाऊ दे, आता एक छानसे गिफ्ट आणुन आर्यनला द्यावी. म्हणजे तेवढेच मनाला बरे वाटेल त्याच्या आणि आशाच्याही."


 आशाचे आणि दिराचेही त्यांनी मनापासून अभिनंदन केले.

सौ. शुभांगी सुहास जुजगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या