फॉलोअर

केवड्याचे पान तू…

केवड्याचे पान तू…




खिडकीतून कोवळ्या उन्हाचा कवडसा तिच्या चेहऱ्यावर येऊन थांबला.त्याच बरोबर मंद हवेची झुळुक ही तिच्या तनुला हळुवार स्पर्शुन गेली.यामुळे तिला जाग आली.

म्हणून ती उठली. आणि सगळे घर व्यवस्थित तिने आवरून ठेवले. मग बाहेर रूमच्या आली.. तर आई आणि आजीचे आवरणे चालू होते. आई काहीतरी कामात बिझी होती. आणि आजी देवपूजेत मग्न होती. मग तिने हॉलमध्ये बघितले पप्पाही उठलेले होते. शिवाय त्यांनी हॉल मधले ही सगळे व्यवस्थित आवरलेले होते. कालच आईने हॉलचे पडदे बदललेले होते. सोफा कव्हरही बदलले होते. त्यामुळे हालचा लुक एकदमच छान दिसत होता.

सोनुला येताना पाहून आईने विचारले,"उठलीस का?

बरं झालं दारात मस्त रांगोळी काढ बरे संस्कार भारती ची."

"बरं काढते."सोनुने सांगितले.

आजच हे का?? तर सोनुला पाहायला पाहुणे येणार होते.


सोनूची तर मुळी एवढ्यात लग्न करायची इच्छाच नव्हती.तिचे शिक्षण तिला पूर्ण करायचे होते.

काही महिन्यापूर्वी तिला पप्पांनी हॉस्टेल वरून घरी आणले होते. ती सेकंड सेमिस्टरला होती. पहिलं सेमिस्टर तिचं छान निघालं होतं. थोडा अभ्यास अवघड चालला होता. पण, तिने सगळे विषय काढले होते. सेकंड सेमिस्टरला मात्र तिला काही विघ्नसंतोषी मुलांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे

अभ्यासावरचे लक्ष विचलित झाले. ती जास्त बोलकी नसल्यामुळे, तिने कोणाला हे सांगितलेही नाही.फक्त आईला फोनवर ती याविषयी बोलली होती. हे मग आईने पप्पांना सांगितले. म्हणून पप्पा तिकडे आले. त्यांनी काही चौकशी केली. कोण त्रास देते? आणि कशामुळे? 

त्यांना काय कळाले माहित नाही.. पण!!

"सोनु, तुझे सामान पॅक कर. आपल्याला निघायचे आहे." असं त्यांनी तिला सांगितले. 

"का बरे पप्पा?" सोनुने विचारले.

"चल, घरी गेल्यावर सांगतो." पप्पा म्हणाले.

' नको नको.' म्हणालेली पण तीचे त्यानी काहिच एकले नाही.

तिला घरी घेऊन आले.

 म्हणाले," घरी बसून अभ्यास कर. नसेल होत तर इथेच बीएससी ला ऍडमिशन घे. पण!! मी तुला परत पाठवणार नाही." असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. 

त्यांना 'का?' असे विचारण्याची हिंमत कोणातही नव्हती. आई ही त्यांच्यासमोर काहीच बोलू शकत नव्हती.

ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.

 असेच वर्षही नसेल झाले. तर हिला लग्नासाठी , बघण्यासाठी पाहुणे यायला लागले. आणि घरातूनही लग्नाची तयारी सुरू झाली. असेच एक दोन ठिकाणची मुले येऊन पाहूनही गेली. पण तिच्यासहित ते कोणालाच आवडले नाही. तसेच आजही पाहुणे येणार होते. तिला वाटले आजही असेच व्हावे. कोणालाच ते पसंत पडू नये, म्हणजे लग्न आपोआपच लांबले जाईल.



सोनूला साडीही नीट नेसता येत नव्हती अजून. म्हणून तिने आपल्या मैत्रिणीला बोलावले होते. साडी व्यवस्थित नेसून हलकासा मेकअप आणि हेअर स्टाईल असं त्या करून देणार होत्या.

तशी ती दिसायला देखणी होती. बघताच तिच्या सालस आणि गोल चेहरा अगदीच मनात भरत असे.गोरा रंग, लांब नाक, स्वभाव अबोल पण डोळे मात्र बोलके.आणि काळेभोर कुरळे केस .

अंबा कलरची पैठणी तिला डार्क चॉकलेटी‌ काठ. त्यावर, वर्क केलेले ब्लाऊज..


मैत्रिणी हिला साडी नेसवण्यात मग्न झाल्या होत्या. त्या,' मेकअप छान कर' असं म्हणत होत्या. पण, हिला खूप साधा आणि हलका मेकअप पाहिजे होता. त्या तिला तयार करता करता मधूनच गॅलरीत येऊन खाली डोकावत होत्या. दोघी पण. सुषमा आणि मानसी. 

" काय चाललंय तुमचं दोघींचं?"सोनु .

 "ये तू गप गंऽ." सुषमा म्हणाली.

"गप कोणत्याही क्षणी, आता गाडी येणार आहेत." मनु म्हणाली.

गाडी येईल बघ.असे म्हणताच.. कारचा आवाज आला.. 

"सोनु कार आली बघ." सुषमा म्हणाली.

"ऐ,मला नाही बघायची. तुम्हीच बघा.." असं सोनू म्हणाली.

"अगं!! एकदा बघ तर खरं." मनु म्हणाली.

घराच्या गेट समोर मस्त पांढरी शुभ्र कार येऊन थांबली. थांबल्यावर तिच्यातून आधी एक. सुंदर गोरापान, उंच नाही आणि बुटकाही नाही, असा बांधेसुद, मध्यम अंगकाठी असलेला, अतिशय देखणा, असा तरुण उतरला. त्यानंतर दोघे वयस्कर व्यक्ती उतरले. नंतर आणखी एक पंचविशीची तरुणी आपल्या मुलासहित उतरली. असे चार पाहुणे उतरून घरात आले. पण सोनुने उठून त्यांना पाहायची तसदी घेतली नाही. मुलाचे हे राजबिंडे रूप बघून मैत्रिणी दोघीही खूपच खुश झाल्या. पण सोनू मात्र जागची उठलीच नव्हती.

"स्वारी खूपच भारी आहे गं इकडची."मनु जरा तोऱ्यातच म्हणाली.

"असू दे! मला काय त्याचे." मानेला हिसका देऊन सोनु म्हणाली.

"तु बघायलाच पाहिजे होता गंऽ. मिस केलंस पोरी तू." हळहळतच सुषमा म्हणाली.

"जरा शांत रहा गं.. तो मला बघायला आला आहे. मला नाही बघायचं.चला राहिलेली कामे करा. मला आत्ता.. कोणत्याही क्षणी, खाली बोलावतील. तेव्हा आपली पूर्ण तयारी झाली पाहिजे."

…..

ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.

हॉलमध्ये सगळ्यांसमोर सोनु बसली होती. तिने मुलाला पाहिले. त्याला ही पसंत असल्याची त्याच्या चेहऱ्यावर‌ तिला दिसत होते.

"यश, तुला मुलीशी काही बोलायचे असेल तर तुम्ही दोघे.." असे यश ची आई म्हणाली.

पण तिचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच, सोनुचे पप्पा म्हणाले, "तुम्ही दोघेही वरच्या रूममध्ये जाऊन थोडे एकमेकांशी बोला.संवाद करा.म्हणजे बरे.ठीक. उठा सोनु बेटा."

यश, त्याची बहीण माधुरी आणि सोनु हे तिघेही मग वरती येऊन बसले.पण एक अनामिक धडधड हिच्या मनात सुरू होती.हळूहळू गप्पा सुरू झाल्या.पण सोनु काही बोलत नव्हती.


बहीण माधुरी, सासरी आनंदात होती. गावातच तिचे सासर होते. म्हणून सासर- माहेर तीच्यासाठी घर-अंगण होते. तिला चार वर्षाचा मुलगा होता. सासू-सासरे नवरा आणि मुलगा, अशा भरल्या घरात ती नांदत होती.

"तुमच्या म्हणजे तुझ्या काय अपेक्षा असतील, तर सांग संकोच करू नको."

 यश नी सोनुला बोलतं करण्यासाठी विचारले. एकदा दोनदा विचारले. संकोचल्या सारखी त्यांच्यासोबत ती बसली होती. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

असं कधीच तिला कोणी विचारलं नव्हतं. 'सांगू का नको? बोलू का नको?' असं तिच्या मनात द्वंद्व चालू होतं. पण मग नाही सांगितलं तर कदाचित.. 

तिच्या मनाची घालमेल माधुरी ओळखली. म्हणून मग ती म्हणाली." श्रद्धा, बोल काहीतरी. तुझ्या मनात काय असेल ते सांग आम्हाला. तुझे मित्र समज. जे काय तुझ्या मनात अपूर्ण असेल.. ते पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. म्हणजे कायम तुझ्या पाठीशी उभी राहील. काय रे यश?"

"हो. मला काहीच प्रॉब्लेम नाही."यश म्हणाला. 

 "मस्त चार रूमचे घर आहे. म्हणजे बंगलाच. तिथे तुम्ही दोघे आणि आई-बाबा, असा चौकोनी परिवार.. बाबा रिटायर झालेले आहेत. यश दिवसभर ऑफिसला असतो. तू आणि आई पूर्ण दिवस दोघींच. या वेळेत तू तुला हवं ते करू शकतेस. तुझ राहिलेले शिक्षण पूर्ण कर. काही कला येत असेल तुला तर त्याची क्लासेस लावून द्यायला सांगते. तू फक्त आई-बाबांकडे व्यवस्थित लक्ष देऊन सगळं सांभाळून घ्यायचं."माधुरी म्हणाली.

"माझे आईवडील आणि माझे घर, हे माझ्यासाठी सर्वस्व आहे.हे तु व्यवस्थित सांभाळ. एवढे जमले तर.. तुझ्यासाठी काय पण!!" असे यश नी सांगितले.

" हो. आणि मग तुम्ही 'राणीसाहेब' घराच्या राज्याच्या.एकुनच काय आहे ना श्रध्दा, की तू यशला खूप आवडलेली आहेस." माधुरी ने यशच्या मनातले सांगुन टाकले.

असं सगळं हे माधुरीने सांगितल्यानंतर मग मात्र सोनूची कळी खुलली.

"हो काऽ मग त्यांनी मला सांगावं असं.." असं सांगताना ती स्वतः शीच लाजली. म्हणून तिने दोन्ही हाताने आपला चेहरा लपवला. मग यश तिच्याजवळ येऊन थांबला. म्हणून मग माधुरी जरा वेळ बाहेर गॅलरीत आली. दोघांचे एकमेकांशी हितगुज झाले.मनाशी मनाचे धागे जुळले.

त्यानंतर दोघेही हातात हात घेऊन खाली आले.त्यामुळे सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

त्यांना असे येताना पाहून"चला तोंड गोड करा. सगळ्यांचे."असे आजीबाई म्हटल्या.

त्या बरोबर सोनुची आई उठली आणि किचन मधुन तिने साखरीचा डबा आणला.आणि सासुबाईच्या हातात दिला.मग आधी त्यांनी या दोघांना साखर दिली.

त्यानंतर सर्वांना दिली.

मग एक विधी म्हणुन सुपारी फोडण्यात आली.

संध्याकाळी बिल्डिंगच्या टेरेसवर गावातीलच नातेवाईक बोलावुन साधे पणात साखरपुडा करण्याची तयारी सुरू झाली.

या कार्यक्रमासाठी थांबल्याने सोनु आणि यश या दोघांना बराच वेळ एकमेकांसोबत घालवताआला.

आणि पहायला म्हणुन आलेले पाहुणे  साखरपुडा करूनच परतले.

 

सौ. शुभांगी सुहास जूजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या