फॉलोअर

माझ्या माहेरीचे सुख भाग : १

 माझ्या माहेरीचे सुख भाग : १


रात्रीची जेवणाची तयारी चालू होती. शितल सर्वांची ताट वाढत होती. ताट वाढता वाढता तीने आवाज दिला,


 "अहो चला जेवायला. ताटं वाढली आहेत. स्वरा, स्वप्निल चलारे पोरांनो, बास झाले खेळणे."


 "हो आलोच." असं म्हणत राजन डायनिंग टेबल जवळील खुर्चीत येऊन बसला.


 मग त्यानेही मुलांना आवाज दिला,"अरे चला पटकन. कोणाच्या तरी आवडीची मी गंमत आणली आहे." असं त्यांनी म्हटल्याबरोबर दोघेही लगेच धावत आली.


 कोणाच्या आवडीचे आणले आहे पप्पा?"स्वप्निल ने विचारले.


"असं नाही दाखवणार. आधी हात पाय स्वच्छ धुऊन या." राजनने दोघांनाही सूचना दिली. तसे दोघेही बाथरूम कडे गेले.


 शितलही, सर्व टेबलावर घेऊन जेवायला येऊन बसली.


"पप्पा, मी हात पाय धुऊन आलो." असं म्हणत स्वप्निल येऊन बसला.


 त्याच्या पाठोपाठ स्वराही येऊन बसली. "दाखवाना पप्पा. काय गंमत आणली आहे. मी तीच खाणार आहे." स्वरा लाडीक सुरात म्हणाली.


"नाही. जो व्यवस्थित जेवण करेल, त्यालाच ती मिळणार आहे. जेव्हा दोघेही व्यवस्थित." शितल थोडीशी रागाने म्हणाली.


असा आईचे ऐकून दोघेही हिरमुसली. आणि ताटाकडे बघून जेऊ लागली.


असं बघून मग राजन म्हणाला. "अरे ती जेवणानंतरच खायची आहे सर्वांना. त्यामुळे पटापट जेव्हा बरं." हे ऐकून दोघांच्याही कळ्या खुल्या आणि ती हसऱ्या चेहऱ्याने जेवु लागली.


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


जेवता जेवता शितल म्हणाली,"अहो मी काय म्हणते, पोरांना सुट्ट्या लागल्या आहेत. म्हणून जरा चार दिवस चला ना बाहेर कुठेतरी जाऊन येऊ.तेवढेच थोडंसं एन्जॉय."


"नाही शितल, यावेळी मला, तुम्हाला कुठेही बाहेर न्यायला जमणार नाही. ऑफिसमध्ये कामे खूप वाढलेली आहेत. आणि अशा परिस्थितीत रजा घेणे शक्यच नाही." राजन नकारार्थी मान हलवत म्हणाला.


 याच दिवसात तर आपण प्रत्येक वेळी जातो ना. मग यावर्षी का नको? चार नसेल तर दोन दिवस जाऊन येऊ." असे शितलने सोल्युशन काढले.


 "नाही बाई एवढं वर्ष नको जायला, पुढच्या वर्षी नक्की जाऊ. बरं का स्वरा बेबी." असं म्हणत त्याने स्वराच्या गालावरून हात फिरवला.


म्हणून तिनेही मान हलवून पप्पांच्या हो मध्ये हो मिळवलं.


आपण 'नाही म्हणालो' पण राजनला हे वेगळच वाटू लागले. म्हणून त्यानेच मग,

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

 "शितल, नाहीतर तू असं कर. तुझ्या माहेरी जाऊन ये, बरेच दिवस झाले आहेत, तुला तिकडे जाऊन. मुलांनाही मामाच्या, आजीच्या गावाला जाऊन आल्याचे समाधान मिळेल. त्यांच्या सहवासात, राहून मुलांना ही छान वाटेल.आणि त्यांना ही बरे वाटेल."


"हो. पण तुम्हाला नाही ना आवडत. तिकडे गावाकडे गेलेले. त्यामुळे मग मी पण टाळते." शितल म्हणाली.


"या फ्लॅट सिस्टीम शिवाय, वेगळंही जग असतं. हे कळू दे मुलांना. स्वरा एक वर्षाची होती. स्वप्निल चार वर्षाचा होता. तेव्हा आपण गेलो होतो. त्यानंतर नाही. आता मुलांना चांगलेच कळायला लागले आहे. काही संस्कार हे लहानपणी झाले, की मुलं आयुष्यभर विसरत नाहीत." राजन.


 राजनचे हे विचार ऐकून, त्याच्यातला पिता कसा जागृत झाला. हे तिने ताडले. एरवी तिने काही म्हटले की 'नाही' म्हणायचा. 'बरोबरच आहे म्हणा ही दोन मुलं घडवायचे आहेत ना.'


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


पहिल्या मुलाच्या जन्मापासून, फ्लॅटमध्ये राहणारं हे कुटुंब. वेळोवेळी काही कार्यक्रमाची सुरुवात आता या फ्लॅटमध्ये ही सुरू झाली होती. त्यामध्ये रामनवमी उत्सव, गुढीपाडवा उत्सव आणि त्याचे महत्त्व विशद केले जाई. 


हे सण, आपण का साजरी करतो? हेही सांगितलं जायचं. यामुळे मुलांना सण आणि उत्सव यांची आवश्यकता आणि त्यांची महती कळु लागली आहे. गोकुळाष्टमी, कोजागिरी पौर्णिमा या दिवशी रात्रीचे खेळाचे आयोजन करून रात्र जागवली जाते.


 उद्देश हाच की येणाऱ्या नवीन पिढीला या सर्व गोष्टींचा परिचय व्हावा.


***


"चाऽय, चाऽय"  


अशा आवाजाने शीतल ला जाग आली. तशी ती पटकन, डोळे उघडून उठून बसली. खिडकीतून तिने बाहेर बघितले. छान उजाडले होते. घड्याळ बघितले तर सहा वाजले होते. "चला आता आपला स्टॉप येईल लवकरच." 


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


म्हणून तिने दोन्ही मुलांना उठवले. आणि थोडे फ्रेश केले. "चला आता उतरायचं आहे आपल्याला." असे तिने दोघांनाही सांगितले. तसेच तिनेही सर्व आवरून व्यवस्थित करून घेतले. ब्यागा व्यवस्थित काढून घेतल्या. उतरताना घाई गडबड होऊ नये यासाठी. इतक्यात गाडीचा वेग मंदावला. "आले, आपले गाव." असे आई म्हणताच मुलं उभी राहून नाचायला लागली. "ए, असं काही करू नका, शांत बसा." शीतलने तंबी दिली.




 तशी ती दोघेही परत आपापल्या जागी बसली. थोड्या वेळानंतर गाडी थांबली. 


"चला, एकमेकांचे हात धरून, हळूहळू माझ्या मागे या." गाडीतून उतरल्या बरोबर समोरच मामा उभा होता. त्याला पाहून लगेच बच्चे मंडळी खुश.




 रिक्षातून उतरून शितल स्वराला घेऊन पुढे आली. स्वप्निल मामासोबत यायचे म्हणाला.


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात 


 दारात आई वाटच पाहत थांबली होती.


 ही दिसताच आई म्हणाली,"थांब बाई तिथेच. आत नको जाऊ."


 घरात गेली भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या तिने आणला. पाणी आणि भाकरीचा तुकडा तिच्यावरून ओवाळून टाकला. आणि नकळत तिच्या तोंडातून निघाले," किती दिवसांनी लेक माहेराला आली! ही पोरगी कडेवरच बसत होती, तेव्हा."


 हातातला तांब्या ठेवून, तिने शीतलच्या चेहऱ्यावरून हात फिरवून, ते हात स्वतःच्या डोक्याला उलटे लावत बोटे मोडली. असेच मग स्वरालाही करावे लागले. एवढ्या वेळात, मामा आणि स्वप्निल घरातही जाऊन बसले होते. 


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


ती घरात येऊन आधी सगळ्यांना कडकडून भेटली. वहिनी, मुलं, वडील,


  नंतर आई-वडिलांच्या पाया पडली. खूप दिवसानंतर माहेरी आली होती. म्हणून तिला खूप भरून आले होते. हे आनंदाचे भरते होते.




पहिला दिवस तर, 'हे कसे? ते कसे?' असे विचारण्यात आणि झोपण्यात गेला.


स्वप्नीलला समवयस्क असा मामाचा मुलगा होता. त्यामुळे त्याचे खेळणे सुरू होते. 


स्वराला मात्र कोणी नव्हते. म्हणून ती आजीच्या आणि आईच्या मध्ये मध्ये करत होती.मामीकडे जास्त जात नव्हती.या लाडोबाचे लाड आजी करत होती ना म्हणुन..


****


शीतलला सकाळी जाग आली.बघते तर बाहेर चांगलेच ऊन पडले होते. स्वरा ही तिच्याजवळ नव्हती.


 म्हणून ती लगेच उठली." स्वराऽ स्वराऽ." करत ती बेडरूमच्या बाहेर आली.


 वहिनी म्हणाल्या, "ताई, स्वरा देवपूजा करते आहे." 


"काऽय?" असं म्हणत ती देव घराकडे आली. "वा, वा, वा, काय चाललंय तुझं. उठ तिथून, आजीला पूजा करू दे. उगाच मधी मधी नको करू," असं ती स्वराला रागवत म्हणाली.


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


"ऐऽ तू तिकडेच थांब, इकडे येऊ नको. तू आंघोळ केली नाही ना.मी बघ,आंघोळ करून, मग पूजा करते आहे. म्हणजे मी बाप्पाला कपडे घालते आहे. त्यांना गंध पण लावणार आहे." असे ती शीतलला हात करून म्हणाली.


आणि परत आपल्या पूजेमध्ये रमली.




"आजी तू मला सांगायचं ना, मी नवे नवे कपडे


आणले असते बाप्पाला. माझ्याकडे बाहुलीचे छान छान कपडे आहेत ना, तसे."


स्वराचे हे बोलणे ऐकून, तिघीही हसु लागल्या.


"अगं आई, तुला त्रास होतो आहे ना? तिच्या कला कलाने पूजा करायला."


 असं काळजीने शीतल म्हणाली.


 "ऐ असू दे गं, आज सगळे देव 'बाळ गोकुळात' आले आहेत, इवल्याशा हाताने लाड करून घ्यायला.जा, तू तुझे आवर."


 असं म्हणून आई देवाला आंघोळ घालू लागली.


"आजी, तु ते गाणं म्हण नाऽ, काय म्हणत होती ते." स्वरा म्हणाली.


" हो म्हणते हा बाळा.


 " नमो गजानन, नमो हनु


मंता।


  दोघांमध्ये सांगा कोण बलवंता?।। 


*****

शीतलचा वेळ, गप्पा करण्यात कसा निघून जात होता? हे तीचे तिलाच कळत नव्हते. 



आईशी, वडिलांशी, दादा आणि वहिनी या सर्व बरोबर बरेच बोलणे व्हायचे. तसेच वहिनींना कामात मदतही ती करत होती.


 मुलांचे तेच होत होते, स्वराला खेळण्यासाठी घरासमोर मोकळे अंगण होते. आणि आजूबाजूला असलेली तिच्या वयाची मुलं, मुली स्वरा आली म्हणून खेळायला यायची. त्यामुळे स्वारी अगदी खुशीत होती. आणि स्वप्निल ला तर, मामाचा मुलगा राऊ हा होताच खेळण्यासाठी.




दुपारी सगळे अंगत पंगत करून जेवायला बसले.वहिनींनी बनवलेले सर्व पदार्थ खाली ठेवले. मग आईने पानं वाढली.फक्त मामा ऑफिसला गेला होता.बाकी सगळे बसले.पण आजीने सांगितले की,


 "मी म्हटल्याशिवाय, कोणीही जेवायला सुरूवात करायची नाही."


काही वेळाने, "हं चला, आपापल्या पानांना पाणी फीरवा.आणि हात जोडुन घ्या."असे 


शीतलची आई म्हणाली.


तसे सगळ्यांनी करायला सुरुवात केली.सर्वाना ही रोजची सवयच होती. या तिघांना मात्र हे नवीन होते.मुलांना नेमके कळाले नाही काय करायचंय. शीतलने त्यांना हळुच सांगितले "हे काय करतात, ते पाहु. मग तसेच करू.



पाणी फिरवुन सगळे हात जोडुन बसले.अन् श्लोक म्हणू लागले"



 "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे,


सहज हवन होते नाम घेता फुकाचे।


जीवन करी जीवित्वा अन्न हे पुर्णब्रम्ह,


उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।



जय जय रघुवीर समर्थ।।



"आता सर्वांनी जेवा."आई.


"आई हे केव्हापासून असं करायला सुरुवात केली आहे?"शीतलने प्रश्न विचारला.


तर आईने सुनेकडे बोट करत म्हटले,


"ही अंजलीची म्हणजे तुझ्या वहिनीची कृपा. तिनेच आम्हाला ही सवय लावली आहे.आता श्लोक म्हटल्याशिवाय बरं नाही वाटत."


"छानच आहे हं वहिनी हे."शीतलने वहिनीचे कौतुक करत म्हटले.


लगेच स्वप्निल म्हणाला,"आई आपण आपल्या घरीही म्हणुया ना हा श्लोक."


लगेच त्याच्या सुरात सुर मळवुन स्वराही म्हणाली, 


"हो ग आई, घरी आता मी पण हे म्हणणार आहे. मामी मला तूम्ही शिकवा बर."


 "चला आता जेवा पटपट सगळे." आई


आई म्हणाली.



 थोड्या वेळानंतर शीतल म्हणाली,


"आई मला आपल्या जुन्या घरी जायचे आहे. मुलांनाही दाखवायचे आहे, आपले घर, वाडा."


"बरंबरं जाऊया चार-पाच वाजता. मनु वहिनींनी बऱ्याच वेळा निरोप पाठवला आहे. या म्हणून, पण कसंच जाणं होतं?" आई म्हणाली.



जुने घर म्हणजे गल्लीत होते. आता नवीन घर कॉलनीत घेतले होते.


 त्यामुळे शीतलचे बालपण ज्या घरात, वाड्यात गेले ते सर्व तिला नजरे खालून घालायचे होते. आणि मुलांनाही दाखवायचे होते



****

गल्लीत प्रवेश केल्याबरोबर आधी त्यांनी श्री. वीरभद्राचे दर्शन घेतले.( महादेवाचे रूप) नंतर वाड्यात, या वाड्यामध्ये अनेक कुटुंबे राहतात. ती सर्व एकाच घरातली पण वेगळी वेगळी झालेली.म्हणजे भावकी.वाड्यात जाताना दरवाज्याच्या उजव्या बाजूला फलाट आहे. हा फलाट म्हणजे एक लोखंडी पलंग. म्हणूयात. पण बिना पायाचा. याची लांबी जवळजवळ सात फूट असेल. रुंदी चार फुट आणि जाडी एक ते दीड इंच असेल.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

तर या फलटावर बच्चे मंडळी तासंतास बसून खेळत असे. मोठी मुले ही त्यावर बसून काहीतरी खेळत असे.


मोठी माणसे वाड्यातील, ती बसायची, गप्पा करणे किंवा एखाद्या विषयावर चर्चा करणे, किंवा सगळ्यांचा मिळून एक विषय असेल, तर तिथे बसून त्यावर विचारविनिमय करून निर्णय घेणे. इत्यादी इत्यादी.



 संध्याकाळी सर्व महिला मंडळ यांची यावर गप्पांची मैफिल रंगत असे.तेवढाच क्षणभर मनाला विरंगुळा होत होता.समोर लहान मुलं खेळत होते.त्यांच्याकडे लक्षही ठेवले जात होते.



जुनी लोकं असं सांगतात. हा फलाट म्हणजे निळीच्या हौदा वरचे झाकण आहे. कारण इथून काहीच अंतरावर सिंदफना नदीचे पात्र आहे. आणि तिकडे म्हणजे त्या पात्रात, मोठे मोठे हौद बांधलेले होते. ज्यामध्ये नीळ तयार करत असत. आणि त्या हौदावरचे हे

 झाकण आहे. कालांतराने निळीचा व्यवसाय बंद पडला. मग हे झाकण, काही लोकांनी येथे आणून ठेवले. किती पिढ्या त्याने पाहिल्या माहित नाही. कारण या वाड्याला दोनशे ते अडीचशे वर्षे झालेली आह.

          

भाग २

सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या