फॉलोअर

सुख हे कळले मला..भाग १

सुख हे कळले मला..भाग १

 आरतीची घरातली सगळी कामे झाली. आवरा आवर करून सगळं तिने व्यवस्थित झाकून ठेवलं. फरशी, भांडी, कपडे, धुऊन झाली. 

ती एकत्र कुटुंबामधुन इकडे राहायला आल्यापासून, काहीच दिवसानंतर शेजारी दोन कॉलेजला जाणाऱ्या मुली राहायला आल्या होत्या. त्यांना मेस लावायची होती. म्हणून मग आरतीने सांगितले की, "मीच तुम्हा दोघीना जेवायचं डबा देते. चालेल का?"

हिने असे विचारल्यावर त्याही "हो" म्हणाल्या. "बघू काही दिवस. ठीक वाटले तर.."

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

सकाळी आधी म्हणजे, नवऱ्याचा डबा देऊन, मग या दोघींचा स्वयंपाक ती करायची. पोळ्या सगळ्या एकदमच करून घेऊन, वरण भात नंतर करत असे.

 हे सर्व झाल्यावर घरातील राहिलेली कामे, आणि सर्व कामे झाल्यावरच मग जेवण. आजही असेच तीने सर्व आवरा आवर करून, जेवायला वाढून घेतले.  

पहिला घास घेतला, बळजबरीने खाल्ल्यासारखाच तीने तो खाल्ला.तिला अचानकपणे असे खावेसेच वाटेना.अन्नाचा वास तिला सहन होईना. 'असं का होत आहे, मला आज?' तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. आणि भरल्या ताटावरून उठू नये म्हणून अर्धी चपाती भाजीसोबत तिने खाल्ली. आणि उरलेले तसेच झाकून ठेवले. आणि हात धुतला. 

त्यानंतर थोडसं मळमळत असल्याचीही तिला जाणीव झाली. मग तिच्या लक्षात आले की 'आपली यामहिन्याची मासिक पाळी आलेलीच नाही. मग कदाचित ही प्रेग्नेंसी असू शकेल का'? असा प्रश्न तिच्या मनात डोकावला. पण इतक्यातच हे तिला नको होतो. अजून संसारात, काहीच स्थैर्य आलेलं नव्हतं. आणि एका वेगळ्याच परिस्थितीत तीचे हे लग्न झालेले होते. ही परिस्थिती वडिलांच्या इच्छेनुसार तिच्यावर लादली होती. ही पतिपत्नी फक्त शरीरानेच जवळ होती. पण, मनाने अजुनही जवळ आलेली नव्हती.यांचं नातं जन्माला तर आलं होतं, पण पुष्ट झालेले नव्हते.ते अंगापिंडाने भरलेले नव्हते.म्हणुन काही दिवसांचा कालावधी तिला हवा होता.पण निसर्गाला त्याचे काम करायचे होते त्याने ते केले होते. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

असा विचार तिच्या मनात डोकावल्यानंतर, 

आई वडिलांविषयी तिच्या मनात रागच होता. कारण हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालेलं होतं.

म्हणुन, मोठ्या बहिणीला तिने याविषयी विचारले. 'काय होत?''कसे होते?' म्हणून. बहिणीने सांगितलेली लक्षणे ती हळूहळू चेक करत होती.

 मग तिने शामला फोन केला, "की थोडे लवकर येता आले तर या."

"काय झालं?अगं काय झालं?" त्याने विचारले. 

"नाही नाही. असं घाबरण्यासारखं काही नाही सहजच विचारलं."

"ठीक आहे पाहिल विचारून बॉसला.. तसा फोन करतो मग." श्याम म्हणाला.

"हो ठेवते मग." असं म्हणून तिने फोन ठेवला.


संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. तरीपण श्याम आलेला नव्हता. की त्याचा त्याचा फोनही नाही आला. मग ही उठली, आणि किचन मध्ये गेली. स्वयंपाक करावा लागणार होता. कारण सातला त्या मुलींचे डबे द्यावे लागत होते. पण, आधी चहा घ्यावा त्याने जरा तरतरी येईल.असे तिला वाटले. म्हणून तिने चहा ठेवला. साखर पत्ती टाकली. तो उकळे पर्यंत डाळ तांदूळ खिचडी साठी,आणि बटाटे भाजीसाठी किचन ओट्यावर काढून ठेवले. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

तिने कपात चहा गाळून घेतला. आणि पंख्याखाली येऊन खुर्चीत बसली. चहा घेऊन कप खाली ठेवला तोच श्याम आला.

"अहो किती उशीर?"आरती नाराजीच्या सुरात म्हणाली.

"अगं ते आज बॉस चा.. श्यामचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच आरती उठून बेसिन कडे गेली. नुसतीच कोरडी ओकारी तिला आलेली होती. उलटी झालीच नाही. तिची अशी ही अवस्था पाहून श्याम खुप घाबरला.

"अगं काय होतंय तुला?" श्यामने विचारले. त्याचे हे बोलणे ऐकून तिचे डोळे भरून आले. तिचे भरलेले डोळे पाहून तर याला काहीच सूचेना.

तरीही तिला जवळ घेऊन आधी त्याने शांत केले. "माझ्या प्रेमाला असं रडताना पहावत नाही मला." तो म्हणाला.

आता याविषयी यांना सांगायलाच हवे. असे तिला वाटले आणि तिने श्यामचा हात हातात घेऊन विचारले,"तुमचे खरेच माझ्यावर प्रेम आहे का?"

"हे काय विचारणं झालं का?"असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतले आणि "जेव्हा पासून तु माझ्या आयुष्यात आलीस ना राणी, तेव्हापासून मला सगळे खुप छान, सुंदर आणि हवेहवेसे वाटते आहे.कधी एकदा कामावरून घरी येतो असं झालेलं असतं मला. घरी येऊन तुला पाहुन तुझ्या शी बोललल्यावर खुपच बरे वाटते." 

त्यांच्या तोंडून हे प्रेमाचे शब्द ऐकुन तिला खुपच छान वाटत होते."या प्रेमात कोणी वाटेदार झाले तर..?"आरतीने विचारले.

"बिलकुल सहन नाही करणार मी. पण कोण आहेती व्यक्ती?" त्याने लगेच तिला बाजूला करत विचारले.

"अहो मिस्टर शांत व्हा. दुसरे तिसरे कोणी नसून, म्हणजे मला बाळ होणार आहे.आपलं बाळ येणार आहे."

"काय??तुला बाळ होणार आहे? म्हणजेच आपले बाळ."

तिने मानेनेच हो हो म्हटले.

हे ऐकल्यावर त्याने तिला उचलुन घेतले आणि गोल फिरवत फिरवत म्हणाला,"आज माझे प्रेम परिपुर्ण झाल्याचा मला खुपच आनंद झाला आहे.खुप खुप धन्यवाद राणी तुझे. 

 ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

#####


"आरती, आरती अगं आण लवकर, मला कामावर जायला उशीर करू नको. माझी ही बस गेली तर दुसरी लवकर मिळत नाही." असं जवळजवळ ओरडूनच श्यामने आरतीला सांगितले.

"हो हो, झालं आलेच." असं आरती श्यामचा टिफिन पिशवीत ठेवत ठेवत म्हणाली. व ती तो घेऊन शाम कडे आली.

श्यामने तिच्या हातातून पिशवी घेतली. आणि तिच्या चेहऱ्याकडे त्यांने पाहिले. 

म्हणाला,"आज तुझा चेहरा, असा का सुकल्यासारखा दिसतोय?"

"काही नाही हो, आता हे होईपर्यंत असंच होत राहील. तुम्ही जा बिनधास्त." आरतीने पोटावर हात फिरवत फिरवत शामला सांगितले.

का मी थांबू घरी." श्याम म्हणाला.

"नाही माझी डेट अजून तीन आठवडे तरी लांब आहे."आरतीने असं म्हटल्यावर शाम निघून गेला. कारण त्यालाही बस चुकवायची नव्हती.

आरतीनं किचनमध्ये येऊन सगळं नीट आवरलं. तिने दोन पोळ्या स्वतः साठी लगेच टाकून घेतलेल्या होत्या.सातव्यामहिन्यापासून मुलींचे डबे तिने बंद केले होते. 

आज तिला अचानकच असं जडजड वाटत होतं. सकाळी उठावसंही वाटत नव्हतं. पण श्यामचा डबा करणे ही गरजेचे होते. नाहीतर तो तसाच कामावर गेला असता. 'चहा घेऊन थोडसं पडावं नंतर बरं वाटल्यावर राहिलेली कामे करावी.' असा तीनं विचार केला.


  ती बेडवर आडवी झाली तर तिला जरा बरे वाटले.

 लग्न झाले होते तेव्हा आरती आणि शाम सर्वां कुटुंबा सोबत राहिले.म्हणजे आई, बाबा,एक विधवा नणंद.त्यात पुन्हा आले गेलेले ही. श्यामला आणखी तीन बहिणी होत्या.त्यापैकी दोन बहिणी गावातच दिलेल्या होत्या. म्हणून मग दररोज कोणी कोणी पाहुणे असायचे ही घरात नवीन सून होती. त्यामुळे सगळ्यांचे ती आवडीने करायची. म्हणुन घरात सगळ्यांची ही लाडकी झाली होती.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

लग्नानंतर नवीन संसार कसा चालला आहे? हे बघण्यासाठी तिची बहीण आणि आई या दोघी जणी आल्या. दोन-तीन दिवस राहून मस्त खरेदी करून गेल्या. कारण या गावचे मार्केट खूपच नावाजलेले होते. त्यानंतर मात्र आरतीच्या वागण्यामध्ये खूप फरक पडला. बदल झाला. कामात तिची कुचराई सुरू झाली. म्हणजे काम चुकारपणा वाढला. कारण काय तर मला या घरात राहायचं नाही.

प्रत्येक गोष्टीचा येथे कोंडमारा होतो.अशीच कारणं सांगुन ती भांडणं करु लागली. नणंदेला नेहमीच खालीवर बोलून तिलाही त्रास द्यायला लागली.तिची चुक नसताना ही तीच्याशी भांडू लागली.

"आई बाबा आपण हे, दादाला सांगूया ना. की वहिनी नीट वागत नाही घरात." सुरेखा म्हणजे श्यामची बहीण त्रासून म्हणाली.

 "नको. तो कामावरून दमून घरी येतो. तर त्याला घरी आल्यावर परत हा त्रास नको. होईल हळूहळू व्यवस्थित. आपणच तिला समजून घ्यायला हवं."आई म्हणाली.

"नको, काही काही गोष्टी या घरातल्या घरातच राहायला हव्यात. तेव्हा काळजी घे."बाबा.

"सुवर्णा आणि सुनंदा ही किरकिरत होत्या. असेच की वहिनी नीट बोलतही नाही.आम्हि यावं की नाही माहेरी?"आई.


मध्येच आईची आणि आरतीची किरकिर होऊन जरा जास्तच तुमी झाले.आई म्हणाली. "हिला समजुन सांगितले तरी कळत नाहीय." 


पण एक दिवस हे सर्व शाम पर्यंत गेलेच. कारण त्यानेही पाहिले की, आपली बायको घरात काही म्हणजे काहीही काम करत नाही. सगळी काम आई आणि सुरेखाच करत आहेत. 

एक दिवस आरती घरात नसताना आई-बाबांना त्याने विचारले. आई बाबांनी त्याला सगळे सांगितले. मग त्यांनीही आरतीची तक्रार आई-बाबांकडे केली. की "तिला आपले हे घर आवडत नाही. आपण आवडत नाहीत. "या छोट्याशा घरात माझी घुसमट होते" असं ती म्हणते. म्हणून श्यामही त्रासून गेला होता. यावर आता काहीतरी उपाय काढावाच लागेल. "ही रोज रोजची भांडणे नको, त्यामुळे कोणीच सुखी राहणार नाही. असे बाबांचे म्हणणे आले.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

"काय करतो? माहेरी नेऊन सोडतो का? एवढे पैसे दिलेले फुकटच का?" आईने चिडून विचारले.

"एवढे नको ग चिडू. जरा सबुरीनं घे." बाबांनी आईला समजावले.

"आपली गरज होती, म्हणूनच आपण पैसे देऊन तिला आणले आहे. कारण आपल्या पोराला किती दिवस बिना लग्नाचा ठेवणार..?बाबा म्हणाले.

दोघेही बापलेक फॅक्टरीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

पुढे काय??

पाहुया पुढील भागात..

अंतीम भाग 

सौ. शुभांगी सुहास जुजगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या