फॉलोअर

सुख हे कळले मला.. अंतिम भाग

 सुख हे कळले मला.. अंतिम भाग आरती बेडवर आडवी पडली. आणि सहजच तिला डोळा लागला. थोड्या वेळानंतर तिला जाग आली. तर तिच्या पोटात थोडं थोडं दुखत आहे. असं तिला वाटलं. 

म्हणून ती हळूच उठली. आणि शेजारच्या काकूंना तिने हाक मारली. तर त्या कपडे धुत होत्या.

"काकू, दोन मिनिटे येऊन जा ना." तिने विनंतीच्या सुरात हाक मारली.

त्या आल्यावर त्यांना सांगितले.

"अगं, तू आता दवाखान्यात जा. आणि चेकअप करून घे. आणि डॉक्टर सांगतील काय करायचे." काकु म्हणाल्या.

 "मग चला बरं माझ्याबरोबर." आरती म्हणाली.

 "मीच का?" काकूंनी विचारले. 

"हो, चला ना प्लीज, हे कामावर गेलेले आहेत." आरती

तिची अवस्था बघून काकूंना नाही म्हणता येईना,शेवटी दोन जीवाचा निवाडा होता तो. "माझे एवढे कपडे धुऊन झाले, की मग जाऊ. तू काही खाल्ले नसले तर खाऊन घे." असं म्हणून त्या निघून गेल्या.

सासूबाईंना फोन करून सांगावं का? असे तिला वाटलं. पण जसं घर सोडलं होतं तसं त्या एक शब्द काही तिच्याशी बोलल्या नव्हत्या. किंवा ही त्यांना बोलली नव्हती. निशब्द असं नातं झालं होतं त्यांचं. सासरे कधीतरी खुशाली विचारायला यायचे. 'दिवस आहे' म्हटल्यावर काही आवडीचे (डोहाळे) खायला आणूनही देत होते. आणि जाताना आवर्जून विचारतही होते की, "पुढच्या वेळी येताना, काय आणू बाई तुला?"

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

तसे त्यांचे घर ही लांबच होते. पण 'जाऊ दे साधा चेकअप तर करायचा आहे, जाऊन येते.' असं म्हणून ती दवाखान्यात जाण्यासाठी तयार झाली.

आरती, काकूंना घेऊन दवाखान्यात आली. काही वेळानंतर चेकअप ही झाले. नेहमीच्याच डॉक्टर होत्या त्यामुळे काही वेगळे सांगायला नाही लागले. डॉक्टर मॅडम ने "ऍडमिट होऊन जा." असे सांगितले. मग तिने शामला फोन केला. तर त्याने "यायला वेळ लागेल. तू ऍडमिट होऊन जा." असे सांगितले. 

"काकू तुम्ही हे येईपर्यंत थांबाल का?" असे तिने काकूंना विचारले. तर काकू "हो थांबते." म्हणाल्या.

नववा महिना लागण्या आधी, आरतीने तिच्या आईला सांगितले होते. की, 

"मला बाळंतपणाला माहेरी यायचे आहे. पहिले बाळंतपण हे माहेरीच असते."

 पण आईने सांगितले की, "बाई, मी तुझ्या तीनही बहिणींची दोन दोन बाळंतपण केली आहेत. पण आता मला वयोमानाप्रमाणे, माझेच काम होईना.त्यामुळे तू काही इकडे येऊ नको."

असं आईने सांगितल्यावर तिला थोडा राग आला होता. 'मोठ्या दोन, तीन बहिणींची बाळंतपण तिने आनंदाने केले होते. पण आता माझ्याच वेळी असं का? त्यांच्या वेळी मीही सर्व काही केले होते. अगदी बाळाला रात्र रात्र जागून झोका दिला होता. कारण की बहिणीला पुरेपूर आरामाची गरज होती म्हणून. घरातही, आई एकटीच कुठे कुठे करेल. म्हणून तिलाही कामात मदत करायची. पाणी आणणे, कपडे धुणे, हे माझ्याकडेच होते.' शिवाय येणारे पाहुणेही (बहिणीच्या सासरचे बाळाला बघण्यासाठी यायची) यांचंही सारखं आरतीलाच कराव लागायचं. त्यांची उठ बस, हवा नको, हीच सगळ बघत होती.

मग तिने बहिणींला फोन केला. तर त्या म्हणाल्या, "अगं यायला काही नाही. पण इकडे यांची खाण्याची आभाळ होते. आणि मुलांच्या शाळाही आहेत त्यांनाही सोडून येता येत नाही." दुसरीही तेच म्हणाली, "तू मोकळी झाल्यावर हवा तर दोन-तीन दिवस येऊन जाईल. वर असेही म्हणाली.

सर्वात मोठी तर म्हणाली की," बाई माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नसते. तेव्हा मी काही त्यांना सोडुन येणार नाही." झालं, एकूणच सगळे मायेची माणसे हात वर करून मोकळी झाली.

आता आपलं कसं होईल?" हाच मोठा प्रश्न आरतीला सतावु लागला. पण आलेल्या या प्रसंगाला तोंड देणे भागच होते. 

तिचा चिंताक्रांत चेहरा पाहून शेजारीच बसलेल्या काकू म्हणाल्या, "होईल गं सगळे नीट, काळजी करू नको." 

"हो." असं म्हणताना तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर अलगद ओघळले.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

आरती ही मंगल आणि कांतीलाल यांची चौथ्या नंबरची मुलगी. मुलाची वाट पाहत, पाहत चारही मुलीच झाल्या. घरातील परिस्थिती जेमतेमच होती. म्हणून मुलींना कामापुरते शिक्षण दिले गेले. 'जास्त शिकवून परत त्यांच्यासाठी शिकलेला नवरा शोधणं कठीण होईल?' असं म्हणून. 

मोठ्या दोघींची लग्न झाली. त्यामुळे घरातील दोन माणसे कमी झाली. पण तीन नंबरची मुलगी मात्र दिसायला जरा डावीच होती. तिला बघायला पाहुणे यायचे, खाऊन पिऊन जायचे.

पण कोणीही पसंती दिली नाही. त्यामुळे आई वडील दिवसेंदिवस खचत चालले होते.


 एके दिवशी नात्यातील एक व्यक्ती घरी आली. त्याने आई-वडिलांना पैशाचे आमिष दाखवून लग्नासाठी तयार केलं. एकाच महिन्यात तीन नंबर च्या बहिणीचे, गावातील देवीच्या मंदिरात पन्नास,साठ लोकांच्या उपस्थितीत लग्न लावले गेले. मुलगा चांगला होता. पण वयाने जास्त होता. घरातील मंडळी बरी आणि व्यवस्थित वाटली. लग्न झाल्यावर नवीन नवीन त्रास झाला पण नंतर सगळं सुरळीत झाले. पोटी एक मूल झाल्यावर, ती त्यात रंमली. 

इकडे कांतीलाल यांना, मोठी घसघशीत रक्कम मिळाली, म्हणून ते खूपच खुश होते. याच कारणामुळे आता 'लहानीसाठी असेच स्थळ मिळवायचे.' असेच मनाशी त्यांनी ठरवले होते.

काही दिवसांनंतर परत तीच व्यक्ती श्यामचे स्थळ घेऊन आली आरतीसाठी. यावेळी आईने नकार दिला. कारण आताही तसेच. म्हणजे श्यामचेही वय जास्त होते. आणि कमाईही साधारण होती. आरतीने ही नकारच दिला. पण वडिलांच्या इच्छापुढे कोणाचेच काही चालले नाही.


####


इकडे श्यामच्या घरी ही, त्यांच्या साठी मुलगी शोधणे सुरू होते. दूर दूर आणि नातेवाईक

याकडेही शोधली, पण कोठूनच होकार.. येत नव्हता!

 दिवसा मागून दिवस जात होते. लग्नाचे वयही निघून चालले होते. पण योग येत नव्हता. शाम पेक्षा मोठ्या दोन बहिणी गावातच दिलेल्या होत्या. त्याच्यापेक्षा लहान होत्या त्या दोघीही बाहेरगावी दिल्या होत्या. तिघीजणीही आपापल्या संसारात व्यस्त होत्या, लहान बहिण विधवा झाली होती. म्हणून ती आई वडिलां जवळच राहत होती. आई वडील आणि या तिघी बहिणी भावासाठी मुलगी शोधत होत्या, पण..!

"नवसाने झालेला हा पोरगा आहे. आणि आता लग्नासाठी ही नवसच बोलावं लागणार आहे, का असं?" आई चिडून म्हणत होती.


 एके दिवशी आरतीचे स्थळ आले. मुलीचा फोटो बघुन ती सर्वांना पसंत पडली. पण त्यासाठी अट होती. काही झाले तरी 'हो'च म्हणायचे, 'नाही' म्हणायचे नाही. असं ठरवून त्यांनी होकार दिला.कसंही करून पैसे जमा करायचे.आणि…

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

#####


झालं एकदाचे लग्न.श्यामच्या आईवडिलांचा जीव भांड्यात पडला.अखेर श्यामचा संसार सुरू झाला म्हणुन.पण पैशाचे कर्ज झाले आहे.तेफिटेलच आता हळुहळु. 


नवीन नवीन आरती खूप चांगलं वागली. खूप चांगलं राहिली त्यामुळे ती सगळ्यांना आवडू लागली. 'तू मला माझ्या मुलीसारखीच आहेस.' असे सासूबाईनी सांगितले. 'तू मला आईच म्हण.' असेही त्या म्हणाल्या. पण तरीही एक ऑकवर्ड पणा तिच्या वागण्यात येतच होता. माहेरच्या सवयी विसरून येथील, म्हणजे सासरच्या वातावरणाशी जुळवून घेताना, थोडं अवघडले पण तिला येत होतं. शिवाय शाम दिवसभर घरी नसायचा, फॅक्टरी च्या कामासाठी तो सकाळी बाहेर पडायचा, तर रात्री सातला घरी येत होता. डोक्यावर कर्ज आहे म्हणून सासुबाई ही फॅक्टरीत काही कामासाठी जात होत्या.

#####

जवळ जवळ शाम चार वाजता दवाखान्यात आला. "घाबरू नकोस रिलॅक्स राहा. सगळं व्यवस्थित होईल." असे त्यांनी सांगितल्यावर आरतीच्या जीवाची तगमग शांत झाली.आणि मग ती रिलॅक्स होऊन डोळे मिटुन पडुन राहीली.

रात्री डिलिव्हरी टेबल वर घेतले पण पॉझिटिव्ह

 रिझल्ट नव्हता. त्यामुळे आणखी वेळ घ्यावा लागणार होता. म्हणून काही इंजेक्शन दिले, आणि सलाईन चालू ठेवले.

"सकाळी पाहु."असं डॉ.म्हणाल्या.

म्हणून शाम मग घरी आला.त्याने तिच्या साठी उपमा बनवला. आणि स्वतःही जेवण केले. शामने मग बाबांना फोन केला. आणि सांगितले की,"आरतीला दवाखान्यात ऍडमिट केले आहे."

बाबांनी विचारले,"येऊ का मग तिकडे?"

"नाही, नको आत्ताच सकाळी या ना." श्यामने सांगितले. 

"बरं, सकाळी येतो."बाबा.

#######


सकाळी परत आरतीला चेकअप साठी नेले.तिला आता बराच त्रास होत होता.थोड्याच वेळात "सीझर करावे लागेल."

असे सांगितले.दरम्यान आई बाबा दोघेही दवाखान्यात आलेली होती.त्यामुळे शामला आणि आरतीलाही खुप आनंद झाला होता.आणि धीरही आला होता.

आईशी तिने बोलायचा प्रयत्न केला.पण आईने "बोलु नको." असे हातानेच खुणावले.

"आई बाबा, सीझर करायचे सांगितले आहे.काय करु मला समजेना?"शाम म्हणाला.

"काय करू म्हणजे?"असे जरा दरडावुनच बाबांनी विचारलं.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

आरतीला त्रास होत होता, पण.. तरीही विचारांचे तरंग उठतच होते.

'आपण सासरी असताना किती सगळ्यांशी वाईट वागलो.'याचे चित्र तिला डोळ्यासमोर दिसत होते.या तिच्या वागण्याचा,त्यांना झालेला त्रास.हा आत्ता होणाऱ्या तिच्या त्रासापेक्षा जास्तच होता.असं तिला या क्षणी वाटु लागले होते.विधवा नणंदेलाही नेहमीच या ना त्या कारणावरून ही बोलतच होती.आणि प्रत्येक वेळी 'याच कारणाने नवरा गेला असेल.'अशी जखमेवर ची खपली काढायची.मग सुरेखा तासभर रडत बसायची.

पण त्यांचे हिला काहीच वाटत नसायचे.हिच्या मनात केवळ एकच भुंगा भुणभुण करत होता.'की मला यांच्या सोबत राहायचे नाही.


रोज रोज घरी गेल्यावर,काहीतरी कटकट चालुच असायची.नाहितर आरती फुगुन बसलेली असायची.पण तरीही आरती त्याला मनापासून आवडु लागली होती.तिलाही दुखउन चालनार नव्हते.'ती आल्यापासुन आयुष्यात परिपूर्णता आली आहे.'असंच त्याला वाटत होतं.


म्हणुन मग शामने वेगळे घर केले.घर वेगळे झाल्यावर एका एका समस्येला, हिलाच तोंड द्यावे लागत होते.घरात लागणारी संसार उपयोगी वस्तु आणने हिच्याकडेच होते.गॅस सिलेंडर आणने,किराणा भरणे,बाजार, भाजीपाला आणने,सगळे हिलाच पाहावे लागत होते. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव ही तिलाच करावी लागत होती. "काय कटकट आहे? ही संसार म्हणजे? यापेक्षा तिथेच बरे होते, निदान 'हे संपले आणा' 'ते संपले आणा' असे तरी नव्हते. संपायच्या आधी ती वस्तू घरात असायची. 

सासरे बाहेरून घरी येताना काहीतरी घेऊनच घरी येत होते.अन् सासुबाई घरी येताना भाजीपाला आणिफळं वगैरे, स्वयंपाक घरातील काही आवश्यक, असे सामानही त्याच आणत असायच्या.  

याच कारणाने मग तिने त्या दोन मुलींसाठी डब्बे करायचे ठरवले होते. तेवढाच संसाराला आधार होत होता. 'खरंच मी इतकी वाईट आहे का? इतरांच्या भावना मी समजून घेऊ शकत नाही का? श्यामला मी खरंच यांच्यापासून तोडले आहे का?' असाच तिच्या डोक्यात गोंधळ सुरू होता. त्यानंतर एक जोरात कळ आली अन् ती मोठ्याने ओरडली.

त्यानंतर डॉक्टरांनी तिला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. सिजेरियन साठी.


 बाहेर बसून श्याम त्याचे आई वडील आणि बहिणही आली होती. भावाचा येणाऱ्या बाळाचे स्वागत करायला.


श्याम उठत होता. बसत होता.घडीतच इकडे, तिकडे करत होता. त्याचे मन कुठेच स्थिरावत नव्हते. त्याला फक्त आरतीचीच काळजी वाटत होती. कारण.. तिचे मोठ्याने ओरडणे त्याने ऐकले होते. आणि तो कासावीस झाला होता. त्याची अशीही चाललेली घालमेल बघून, आई त्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.

"सोपं नसतं ना बाप होणे.आणि आई होणंही. बाई कळा सोसुन सोसुन बाळाला जन्म देते, आणि बाप हा पदोपदी मनाला कळा देऊन, परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असतो. तुझ्या मनाला जशा आज कळा.. "

पुढे त्याने बोलूच दिले नाही. कारण त्याच्या डोळ्याचे काठ पाण्याने डबडबले होते नव्हे ओसंडून वाहू लागले होते. 

आईचे दोन्ही हात धरून त्याने आपल्या गालाला लावले. आणि म्हणाला,

"खरंच आहे आई, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याचे महत्त्वच कळत नाही.

तुमच्या मनाची अस्वस्थता माझ्या कधीच लक्षात नाही आली."

तो असं म्हणत असताना आईने त्यांचे डोळे पुसले . आणि म्हणाली,"वाईट वाटुन घेऊ नकोस,'चांगले होईल' या आशेवर तर जग चालत असते ना?"


काही वेळानंतर सीस्टरने येऊन सांगितले की,"तुम्हा सर्वांचे अभिनंदन.मुलगी झाली आहे.बाळ व्यवस्थित आहे आणि आईही."

हे ऐकल्यावर सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले,जणु गुलाब पाण्याचा अंगावर शिडकावा झाला असे वाटले.

हे ऐकल्यावर आईने वर बघुन हात जोडले. आणि म्हणाल्या,

" देवा,आभार. चला तोंड गोड करा.शामराव अभिनंदन " 

"तुही आजी झालीस ना?"

असं म्हणुन शामने बाबांना मिठी मारली. 

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

बऱ्याच वेळानंतर आरतीची भुल उतरली. ती शुद्धीवर आली तेव्हा, आई म्हणजे सासुबाई तिच्याजवळ बसलेल्या होत्या.

"माझं बाळ कुठंय आई?"

"ते बघ, आत्याबाईच्य मांडीवर आहे."आई म्हणाली.

हे बघुन तिला हुंदका अनावर झाला, डोळे भरून आले होते.

"नको रडु आता.बघ ना छानसी परी आपल्या साठी देवाने पाठवली आहे.तेव्हा हसुन तीचे स्वागत केले पाहिजे ना! आत्याबाईऽऽ इकडे आण गं बाळाला." 

आत्याबाईने बाळाला तिच्याजवळ ठेवले.तीचा तो मऊ मऊ स्पर्श, गोरा गोरा रंग,डोक्यावर छोटे छोटे पण काळेभोर केस बघुन तिला परतही भरून आले होते.बाळाचा हात हातात घेऊन ती आईकडे आणि नणंदेकडे पाहात म्हणाली," खरेच सुख हे कळले मला,कळले मला."


भाग १


@ शुभांगी सुहास जुजगर.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या