फॉलोअर

‘सल’ परकेपणाचा..

 ‘सल’ परकेपणाचा..

संध्याकाळचे म्हणजे चारचे चहापाणी आवरले, आणि राधाबाईंच्या मिस्टरांनी म्हणजेच मोहनरावांनी कपडे घातले. त्यांचे दररोजचेच होते हे.
 संध्याकाळी साडेचार पाच च्या दरम्यान फिरायला जाणे. मग या फिरण्यानंतर घरातील काही वस्तू ज्या संपलेल्या. येताना दुकानातुन घेऊन येणे, फिरणे होते आणि कामही होते. जसे की किराणा वगैरे, तसेच आणखी काही किरकोळ वस्तू असतील तर त्याही अशाच ते घेऊन येत असत.
 आजही त्यांनी तीन-चार वस्तूंची लिस्ट केली आणि आठवणीने जाताना खिशात ठेवली.
 ते गेल्यानंतर मग राधाबाई पण स्वतःचे आवरून जवळच्याच पार्कमध्ये जात होत्या. तिथे गेल्यानंतर काही वेळ फिरायचे, आणि नंतर मैत्रिणी सोबत गप्पा होत असत.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
 मोहनराव आणि राधाबाई असेहे जोडपे. गेल्या पाच वर्षापासून येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वी मोहनराव रिटायर झाले होते. मोहनरावांनी रिटायर होण्याच्या आधी, तीन वर्ष अगोदर हे घर त्यांनी तयारच घेतले होते. सगळ्या सुविधा इथून हाकेच्या अंतरावरच होत्या.शिवाय दवाखाना, मेडिकल हेही जवळच होते.म्हणून रिटायर झाल्यानंतर जास्त दगदग नको त्यामुळे.
आयुष्यभर नोकरीच्या निमित्ताने बदलीच्या गावीच राहणे झाले होते. गावीही विशेष अशी प्रॉपर्टी नसल्यामुळे तिकडेही जाण्यात अर्थ नव्हता. मायेचं, हक्काचंही असं कोणीच तिकडे नव्हतं. आदित्य होता पण तोही लांब नोकरीच्या गावी राहत होता.

मोहनराव फिरायला गेल्यानंतर मग राधाबाई उठल्या. स्वतःचे आवरण्यासाठी.
 मात्र त्यांचा गेल्या पंधरा दिवसापासून या दररोजच्या फिरण्यात खंड पडला होता. त्याचे कारण म्हणजे आदित्य. 
तर आदित्य हा त्याच्या फॅमिलीला, म्हणजे पत्नी आणि त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन येणार होता. म्हणून मग यांनी सगळे घर आधी व्यवस्थित आवरले होते. काही फराळाचे पदार्थही बनवून ठेवले.त्याच्या आवडीच्या बाखर वड्या ही त्यांनी बनवलेल्या होत्या.आल्यावर मग घाई नको व्हायला म्हणून.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
आदित्य म्हणजे राधाबाई आणि मोहनराव यांचा पुतण्या..

पार्कमध्ये गेल्यावर आवडत्या काही मैत्रिणी होत्या, जसे की शिवेकर ताई, शिंदे ताई, आणि शेतांबरी ही म्हणजे वयाने बरीच लहान होती. पण छान जमत असे तिच्यासोबत राधाबाईंचे. तीचे मिस्टर मोहनरावांच्या ऑफिसमध्ये होते. त्यामुळे ओळख झालेली. तिचे कधी कधी घरीही येणे व्हायचे. पार्कमध्ये ती मुलांना घेऊन येत असे. कारण लहान मुलांसाठी तेथे खेळणी होती. आणि झोका, घसरगुंडी ही होती.
यामध्ये जास्त जवळच्या म्हणजे शिवेकर ताई या होत्या. खूपच जीवाभावाच्या अगदी सगळेच एकमेकींसोबत बोलत होत्या. मनातील काही गोष्टी बोलून मनाला हलकंही करायच्या. या पार्कमध्ये असल्या की त्यांना खूपच बरे वाटायचे. 

पण गेल्या काही म्हणजे पंधरा दिवसापासून पार्क मध्ये राधाबाई गेल्याच नव्हत्या. पुतण्या येणार होता म्हणून..
आज पंधरा दिवसानंतर त्या निघाल्या होत्या पार्कमध्ये.
राधाबाई पार्कमध्ये पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर प्रथम त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. तर त्यांना शिवेकर ताई दिसल्या, आणि शेतांबरीही दिसली तिच्या मुलीला घसरगुंडी खेळवत होती. या आपल्या राऊंड मारण्यासाठी निघाल्या. एक राऊंड पूर्ण झाल्यावर लगेच शिवेकर ताई यांच्याकडे आल्या.
 म्हणाल्या,”नातीने चांगलंच घट्ट धरून ठेवलं होतं तर तुम्हाला.’
त्यांचे असे बोलणे ऐकून राधाबाईंना भरून आले. आणि त्या जवळच्याच बाकावर बसल्या. अन् डोळ्यातील आसवं टिपु लागल्या. असं पाहून शिवेकर ताईंना वेगळेच वाटले.”मी काही चुकीच म्हणाले का?” असे लगेच त्यांनी राधाबाईंना विचारले.
 पण हातानेच राधाबाईंने नाही असे म्हणत सांगितले. त्या म्हणाल्या,” कसचं काय? आपलं ते आपलं आणि परकं ते परकंच 
असतं.”
“असं का म्हणता? काय काही झाले का?”
असं म्हटल्यानंतर राधाबाईंच्या काही दिवसांपासुन मनात दाबलेला मायेचा हुंदका आसवांच्या रूपाने बाहेर आला.काहि वेळाने त्या शांत झाल्या. शिवेकर ताईंनी त्यांना पाण्याची बाटली दिली.राधाबाईंनी एक घोट पाणी पिले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
आणि नंतर त्या सांगु लागल्या..
“तो दिवस मला आजही आठवतो आहे.
आमच्या लग्नाला वर्ष झालं होतं. यांना म्हणजे मोहनरावांना नुकतीच एका ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लागलेली. जवळच्याच गावी हे ऑफिस होते. म्हणुन ते दररोज जाणे येणे करत होते. घरात सासूबाई मोठे दिर, जाऊ बाई आणि त्यांचा लहान मुलगा चार वर्षाचा. असे हे माझे कुटुंब होते. जाऊ बाईना मुलाच्या पाठीवर नुकतेच दिवस होते. म्हणून मग दोघे नवरा बायको टू व्हीलर वर दवाखान्यात गेले होते शेजारच्या गावी. पण येताना त्यांच्या गाडीला एक्सीडेंट झाला, आणि ते दोघेही त्यात गेले. त्यामुळे त्यांचा लहान मुलगा आदित्य हा पोरका झाला. मी आणि सासुबाई आम्ही घरात होतो. मग त्याचे म्हणजे मुलाचे सगळे मलाच करावे लागत होते. हळूहळू मलाही त्याचा लळा लागला. नंतर मी आवडीने करू लागले. दिराचे एक छोटीशे किराणा दुकान होते. ते दुकान आता सासूबाई बघत होत्या. वयोमानाने त्यांनाही ते होईना. त्यात यांची बदली झाली त्यामुळे मलाही त्यांच्यासोबत जाणे भाग होते. मग मी आदित्यला घेऊन बदलीच्या गावी आली. आता आदित्य हळूहळू मोठा होऊ लागला. शाळेतही जाऊ लागला एकूण त्याच्या असण्याने घर भरलेली लागत होते. मोहनरावा नाही त्याचा लळा होताच.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
असेच दिवस जात होते. त्याचं खेळणं, खाणं, आजारपण, आजारपणात औषध पाणी वेळेवर करणे, एकदा त्याला टायफाईड झाला होता, त्या साठी यांनी दोन दिवसांची रजा घेतली होती.या तापामध्ये कितीतरी वेळा त्याच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या मी ठेवलेल्या. 
त्याच्या आवडी जपणे, शाळेत वेळेवर जावे म्हणून लवकर उठून डब्बा करून देणे, शाळेचे दोन युनिफॉर्म होते ते दोन्ही वेळेवर धुवुन इस्त्री करून व्यवस्थित ठेवणे, सगळं त्याला वेळेवर करून देणे, हे माझ्या कडेच होते.
सासुबाई या गावीच होत्या. त्या काही दिवसांनी गेल्या. त्यानंतर आदित्यचे सुट्टीतही गावी जाणे बंद झाले.

रंगपंचमी, आणि धुळवडीला तर दरवर्षी हा संपूर्ण रंगात न्हाऊन यायचा.चांगली दोन तीन वेळा साबण लावुन आंघोळ घालावी लागायची. तेव्हा कुठे ही स्वारी पहिल्या सारखी दिसत होती.
या याच्या सरबराईत मला बाळ झाले नाही, त्याचे आम्हाला कधीच वाईट वाटले नाही.मुलाच्या मायेनेच आम्ही केले.
ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.

पुढे कॉलेजला गेल्यावर प्रत्येक वेळी जाताना डब्बा भर शिदोरी बरोबर द्यायची. लेकराला भूक लागल्यावर ऐनवेळी त्याला धावपळ करायला लागु नये म्हणून.. सुकामेवाही हे भरपूर आणून द्यायचे.. शिवाय जाताना तीन-चार ड्रेस नवीन घेऊनच द्यायचे.

कॉलेज झाल्यानंतर त्याला योग्य अशी सर्विसही मिळाली. लग्नाचे बघताना बऱ्याच मुली बघितल्या.. पण योग जुळला नाही..दरम्यान त्याला महाराष्ट्राबाहेर चांगली नोकरी मिळाली, त्या मुळे तो तिकडे गेला.

तिकडे त्याने स्वतःच मुलगी शोधून लग्न केले आणि आशीर्वाद घ्यायला आमच्याकडे आला. आम्हीही तोंड भरून आशीर्वाद दिले,
“ तू खुश आहेस. त्यात आम्हीही खुश.” असं म्हणून आम्ही समाधान मानले. त्याच्या बायकोला आणि त्याला दोघांनाही अंगठ्या केल्या. आणि तिला छान मोराची पैठणीही घेतली.
 तेव्हा गेला.. तर तो आत्ता उगवला पाच वर्षाच्या नातीला घेऊन. म्हणून म्हटलं,” चला आपले काही दिवस तरी आता आनंदात जातील, पण कसंच काय? साहेब आले तर बाहेर लॉजवर थांबले.
सकाळी ट्रेनने आला आणि सरळ लॉजवर गेला. तेथे थोडा आराम करून नंतर फ्रेश झाले. त्या नंतर जेवण करून दोन अडीच वाजता माझ्या घरी आले. आम्ही सकाळपासून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. पण ठीक आहे आला आहे ना यातच समाधान. मनाला समजावलं आणि गप्पांच्या ओघात आठवणीत रमलो. काही वेळाने केलेले फराळाचे पदार्थ खायला दिले. चहापाणी करून ते तिघेही जायला उठले. तर मी म्हणाले,”अरे आता कुठे निघालात?”
“लॉजवर थांबलो आहे काकी आम्ही, उगाच तुला कशाला त्रास म्हणून..” आदित्य म्हणाला. “त्यात कसला आहे रे त्रासऽऽ” असं जरा चिडूनच मी म्हणाले.
 तर मला ह्यांनी डोळ्यांनीच गप्प राहायला सांगितले.
“अग ते उद्या माझ्या ऑफिसची मिटींग आहे ना, आणि हिला तिची मैत्रीण राहते इथे जवळच्या गावी कुठेतरी, तिकडे जायचे आहे. दोन दिवसानंतर येतो परत.” आदित्यने सांगितले.
मग मी उठून, केलेली शंकरपाळी थोडीशी डब्यात घालून डबा छोट्याशा पियूच्या हातात दिला.”तुला खायला खाऊ म्हणून.”
 असे म्हटले तर तिने आपल्या मम्मीकडे पाहिले, मम्मी “घे” म्हणाल्यावर तिने ते घेतले. “ये परत नक्की, नाहीतर तिकडून तिकडे जाशील.”
“नाही येतो ना, आहे मी आठ दिवस.” असं म्हणून ते तिघेही निघून गेले. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.
राधिका बाईने विचार केला होता. सुनबाई कडून काही नवीन शिकता येईल. आणि आदित्यच्या आवडीचे पदार्थ आपण करू आणि तिलाही शिकवू. तिच्या हातचे काही वेगळ्याच चवीचे, आपल्यालाही खायला मिळेल.. नातीसाठी ही त्यांना काहीतरी करायचे होते पण.. सगळे मनातले मांडे मनातच राहिले स्वतःचा मुलगा असता तर कान धरून विचारले असते पण हे…
(ही कथा पुर्ण पणे काल्पनिक आहे.)
@सौ. शुभांगी सुहास जुजगर.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या