फॉलोअर

बंध प्रेमाचे…भाग एक

बंध प्रेमाचे…भाग एक

मोबाईलचा ट्रिंग ट्रिंग असा अलार्म झाला. तो ऐकून शिल्पाला जाग आली. म्हणून तिने हाताने तो अलार्म बंद केला, आणि हात पांघरूणात घेऊन परत डोळे मिटून पडून राहिली. पण पाच मिनिटात ती परत उठली. मग तिने घरातील सगळी काम एकेक करत उरकली. 
जायचं म्हणून स्वतःचं सगळं आवरायला लागली.
छान छान राणी कलरची साडी आणि त्या साडीवर बेबी पिंक कलरच्या बारीक फ्लॉवरची डिझाईन होती. आणि पोपटी कलरची पाने. त्यावर वेलवेट चा नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज तीने घातला. केसांना क्लच लावले. नंतर डोळ्यांना नकळत असे आय लायनर लावले. ओठावर हलकीशी पिंक लिपस्टिक लावली. आणि ती शॉप वर जाण्यासाठी निघाली. निघताना तिने आईला,”आई येते गंऽऽ.”
असं सांगितलं.
“अगं शिल्पे नाष्टा केला नाही आज तु.”
असं आईने पुजा करता करता ओरडुन सांगितले.
पण हिच्या ते कानात शिरलेच नाही.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 
******

शिल्पाचे या शहरातील मार्केट मध्ये साड्यांचे शॉप होते. बरोबरच ड्रेस मटेरियल सुद्धा तिने ठेवले होते. आणि रेडीमेड ड्रेसेसही होते. तिच्या हाताखाली काम करण्यासाठी दोन लेडीज वर्करही होत्या. शॉप मध्ये दोन मोठे काउंटर होते. दिवसभराच्या वेळेमध्ये, सकाळी आणि संध्याकाळी भरपूर कस्टमर ची गर्दी असायची.

सुरुवातीला तिने खूप छोटेसे म्हणजे घरगुती शॉप ओपन केले होते. नंतर हळूहळू पण थोड्याच दिवसात तिने मार्केटमध्ये रेंट वर गाळा घेऊन शॉप मोठे केले होते. आणि शॉप ला लागूनच मागे गोडाऊन देखील तिने घेतले होते.
लग्नसराई, दिवाळी सण, संक्रांत, दसरा वगैरे अशा दिवसांमध्ये तिला तर बिलकुल वेळ नसायचा. दिवसभर शॉप वर कस्टमर असायचे.
गेल्या पाच वर्षांमध्ये तिचा चांगलाच जम बसला होता. या व्यवसायामध्ये.
आता म्हणजे दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला होता. याच हिशोबाने काल पार्सल्स आलेले होते.
आणि हे आलेले पार्सल्स चेक करण्यासाठी
ती एकीला घेऊन मागे गोडाऊन मध्ये गेली होती.

राघव हा आठ वर्षाच्या बहिणीच्या मुलीला घेऊन शहरात आला होता. बहिणीच्या या मुलीसाठी त्याला ड्रेस घ्यायचा होता आणि आईसाठी दोन साड्या. 
राघव, आई, आणि बहिणीची मुलगी. ही त्याने शिकायला म्हणून येथेच ठेवून घेतली होती. कारण बहिणीचे गाव हे फार छोटे होते. तिथे चौथीपर्यंत शाळा होती. तिच्या रूपाने घरामध्ये चिवचिवाट असायचा,आणि चैतन्य ही.
तर राघव भाची सोबत म्हणजे शिवानी बरोबर या शॉप मध्ये आला.म्हणजे शिल्पाच्या.

आधी त्याने आईसाठी दोन साड्या पसंत केल्या. नंतर त्या मुलीसाठी म्हणजे शिवानी साठी ड्रेस पसंत केला. पण या पोरीला दोन ड्रेस आवडले होते. 
आणि ते दोन्हीही ती घ्यायचेच असं सांगत होती. यावर राघवने तिला समजावले, पण ती ऐकेचना.
मग त्यानेही घ्यायचे ठरवले, आणि काउंटर वर घेऊन आला. तेथील वर्कर ने दोन साड्या आणि दोन ड्रेसचे बिल बनवले आणि राघवच्या हातात ठेवले. ते बिल पाहून राघव चा चेहरा उतरला. 
यावर तो म्हणाला,” ताई यात जरा काही कमी करा ना.”
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 
“आधीच दहा टक्के डिस्काउंट दिलाय तुम्हाला, आता काही कमी होणार नाही.”
“सगळ्यांची थोडी थोडी कमी करा ना अजून. नाही तर मग ड्रेस काढून ठेवा पोरीचा.”
असे मामाचे शब्द ऐकून लगेच शिवानी आपले तोंड फुगवुन म्हणाली,”जा मी येत नाही आता तुझ्यासोबत मी येथैच राहते.”
तिचे असे बोलणे ऐकून राघव पुन्हा तिची समजूत काढू लागला, पण ती ऐकायच्या मूडमध्ये नव्हतीच.
राघव चा चाललेला असा प्रयत्न पाहून ती लेडी वर्कर म्हणाली,” थांबा मी मालकिन बाईला बोलवते त्या काय करायचं ते कमी करतील मग.” त्यावर राघव बरं म्हणाला.
असं म्हणत राघव शॉप मधील आणखी साड्यांचे निरीक्षण करण्यात मग्न झाला. आणि
शिवानी तेथील छोट्या खेळण्यासोबत खेळू लागली.

इतक्यात शिल्पा तिथे आली. तिने बिल बघितले आणि नवीन बिल बनवायला घेतले.
नाव लिहायचे म्हणून तिने नाव वाचले, अन् ते नाव वाचून ती कावरी बावरी झाली. आणि तिची नजर राघवला शोधू लागली. पण तो पाठमोरा असल्याचा तिला दिसला.
“ हे बिल कोणाचे आहे?”
 हे ऐकून राघव काउंटर कडे आला आणि म्हणाला,”अहो मॅडम पैसे काही कमी करा ना.”
 एवढे तो बोलला त्याचे हे ऐकताना शिल्पाने आपले तोंड पाठीमागे फिरवले,म्हणजे खुर्ची फिरवली.
अन् ती म्हणाली,”तुम्ही किती देता?
“आता ते मी कसं सांगू? तुम्हीच व्यवस्थित भाव लावा.आईसाठी दोन साड्या आणि या पोरी साठी ड्रेस.एकच घ्यायचा होता. पण ती ऐकतच नाही. दोन घ्यायचे म्हणते आहे.”
“हो का,ही पोरगी कोणाची आहे?”
शिल्पाचा प्रश्न.
“कोणाची म्हणजे! भाची आहे माझी. बहिणीची मुलगी.”
“बरं बरं, या सर्वांचे अकरा रुपये द्या.” शिल्पा.
“काय गरीबाची चेष्टा करता का हो मॅडम?”
राघव जरा चिडक्या स्वरात म्हणाला.
त्याला असं चिडलेला बघुन तिला राहवले नाही.
 म्हणून तिने खुर्ची फिरवली तर राघव तिच्याकडे बघून,” शिल्पाऽ तू.” असं आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 
“हो मीच, कसे आहात? घरी सगळे कसे आहेत?”शिल्पा.
“बरे आहोत.अन् तुला काय पडलंय आमचं?
दोन वर्षा पुर्वी दादा (वडिल)गेले.”
हे ऐकुन तिला वाईट वाटले.पाण्याचे ओहोळ खळखळत वाहते तसे दोघांच्या आठवणी चे ओहोळ हिच्या मनात वाहु लागले.तरी पण तीने विचारले. 
“आणि ही म्हणजे शालुताईंची मुलगी वाटतं? ही जन्मल्यानंतर पहिल्यांदा माझ्याच मांडीवर होती.काय गं? तुझं नाव काय आहे?”
शिल्पा तिच्या जवळ येऊन मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली.
“माझं नाव शिवानी आहे.” 

“हे शॉप तुझे आहे? की कोणाचे चालवायला घेतले आहे?” राघव चा प्रश्न.
“हो माझेच आहे. सुरुवातीला खूप छोटे चालू केले होते घरातूनच. मग हळूहळू त्यातच वाढवत राहिले.मग काही दिवसांनी हे शॉप रेंट वर घेतले.”
हे सांगता सांगता मधेच तिने टिनूला कॉफी आणायची सांगितली सगळ्यांसाठी.
“अगं कशाला? मला नाही कॉफीची सवय. मी चहाच घेतो.तु उगाच तसदी घेत आहेस.”
“असू द्या.त्यात काय ती तसदी?”

असं म्हणत तीने राघव ला काऊंटर च्या आत येऊन बसायला सांगितले.
मध्ये येऊन बसल्यावर त्यांच्या आणखी गप्पा सुरू झाल्या.
या गप्पा करताना दोघेही जुन्या आठवणीत हरवली. 

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 
******

कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग मध्ये काव्य स्पर्धेचे बक्षीस मिळवणारा राघव शिल्पाला खूपच आवडला. नाही.. ती तर त्याच्या प्रेमातच पडली. राघव फायनलला होता. ती सेकंड इयरला होती. हळूहळू दोघांचे भेटणे वाढले. 

मात्र राघवचे फायनल झाल्यावर त्याने बी.एड. केले. आणि ते झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. ती लागेपर्यंत राघवने घरच्या शेतीत लक्ष द्यायला सुरुवात केली होती. सरकारी नोकरीचे काम होईना. म्हणून प्रायव्हेट मध्येही प्रयत्न केले. पण तिथेही टाय टाय फिश. ‘एवढे लाख द्या,तेवढे लाख द्या.’
असे सांगायचे.
 राघवचे वडील काही एवढी रक्कम भरू शकत नव्हते.
 इतरही परीक्षा तो देतच होता. पण लक्ष विचलित झाले होते त्यामुळे यश येत नव्हतं. राघवचा लहान भाऊ पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाला होता. आणि त्याची ट्रेनिंगही सुरू झाले होती.
 याच दरम्यान शिल्पाच्या वडिलांनी लग्नाची घाई केली आणि शिल्पाचे राघवशी लग्न झाले.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 
******

राघवचे गाव शिल्पाच्या गावापेक्षा लहान होते. कॉलेजच्या वातावरणात लावलेले हे प्रेमाचे रोपटे आता गावातील वातावरणात सिमेंटच्या घरातुन मातीच्या घरात वाढु लागले. शिल्पाचे सुरुवातीचे काही दिवस खूप छान नवलाईत गेले. 
घरात गॅस होता, पण जास्तीत जास्त स्वयंपाक हा चुलीवरच करावा लागत होता. नळाला पाणी आठ ते दहा दिवसानंतर यायचे. आणि ते भरलेले पाणी मग तीन ते चार दिवस पुरत होते. नंतर मात्र घरापासून दूर हात पंप होता. तिथून पाणी आणावे लागायचे. दररोज अंगणामध्ये शेण पाण्यात कालवून सडा घालावा लागत होता.
राघव ची आई म्हणजे शिल्पाची सासू, स्वतःचे आवरून दुसऱ्याच्या शेतात काम करायला जात होती.काही दिवसानंतर त्यांना वाटे की शिल्पाने पण माझ्यासोबत यावे.

कसा होईल या दोघांचा संसार??
वाचुया पुढील भागात..


@शुभांगी सुहास जुजगर.
(ही कथा संपुर्ण पणे काल्पनिक आहे.
मी स्वतः लिहीलेली आहे 🙏) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या