फॉलोअर

बंध प्रेमाचे..भाग दोन.

 बंध प्रेमाचे..भाग दोन.


राघवचे गाव हे शिल्पाच्या गावापेक्षा लहान होते. कॉलेजच्या वातावरणात लावलेले हे प्रेमाचे रोपटे आता गावातील वातावरणात, म्हणजेच सिमेंटच्या घरातुन मातीच्या घरात वाढु लागले. शिल्पाचे सुरुवातीचे काही दिवस खूप छान नवलाईत गेले.
 
घरात गॅस होता, पण जास्तीत जास्त स्वयंपाक हा चुलीवरच करावा लागत होता. नळाला पाणी आठ ते दहा दिवसानंतर यायचे. आणि ते भरलेले पाणी मग तीन ते चार दिवस पुरत होते. नंतर मात्र घरापासून दूर हात पंप होता. तिथून पाणी आणावे लागायचे. दररोज अंगणामध्ये शेण पाण्यात कालवून सडा घालावा लागत होता.

राघव ची आई म्हणजे शिल्पाची सासू, स्वतःचे आवरून दुसऱ्याच्या शेतात काम करायला जात होती.काही दिवसानंतर त्यांना वाटे की शिल्पाने पण माझ्यासोबत यावे.

राघव हा नोकरी नसल्यामुळे घरच्या शेतातील कामे पाहात होता. कोरडवाहू शेती असल्यामुळे ती पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून होती. पाऊस पडला तर भरपूर पीक यायचे नाही तर काहीच नाही.
 राघव च्या वडिलांना आता काम होत नव्हते. म्हणून त्यांनी थोडं लक्ष काढून घेतलं होतं. 
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

 म्हणून सगळी जबाबदारी याच्या वरच पडली होती. दुसरा ट्रेनिंग साठी बाहेर गावी गेला होता.तरीही राघवचे मात्र नोकरीचे प्रयत्न सुरूच होते. 

 नोकरी साठी एके ठिकाणी पैसे भरण्यासाठी काही जमीन विकून त्याने पैसे भरले. 
‘काही दिवसात ऑर्डर येईल, मग आपले दिवस पालटतील.’ असे घरातील सर्वांना वाटत होते.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
ऐन वेळी कळाले त्या जागेवर दुसराच कोणीतरी घेतला आहे. ज्याने जास्त पैसे भरलेआहे.

झाले! राघवचा मनात उडणारी फुलपाखरे चक्कर येऊन खाली पडली.
त्यानंतर मग शिल्पाने राघवला सुचवले “येथे काही होत नाहीये,तर आपण शहरात जाऊन काही करू.असं शेतीवर अवलंबून नाही राहु शकत.प्रत्येक गोष्टीत कोंडमारा,अन् स्वप्नांचा चुराडा”
पण तीचे त्याने ऐकले नाही.
काही दिवसातच ती अशा परिस्थितीला फार वैतागली.त्यामुळे साहजिकच तिची चिडचिड होऊ लागली.कोंडमाराही होऊ लागला.

घरात चहापावडर, साखर असली की दूध नसायचे. दूध असले की चहा पावडर नसायची. गॅस सिलेंडर संपले की ते महिनाभर येत नसे, म्हणून मग सर्व काही म्हणजेच आंघोळीचे पाणी तापवण्या पासुन चुलीवरच, फुंकून फुंकून धुरातच डोळे चुरचुरतच करावे लागत होते.
 आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

तीने तीच्या साठी काही राघवला आणायला सांगितले की त्याची आई किरकिर करायची.म्हणायची “हातात नाही पैसा आणि कशाला हव्या जीनसा.”
सासुबाई असं म्हणाल्यावर शिल्पाचा पारा अधिकच चढायचा.यामुळे दोघींचे भाडणेही होत होती.याच भांडणात एक दिवस राघवची आई बोलुन गेली”एवढाच त्रास होतो तर जा की सोडुन, कोणी तुला धरले आहे.”

राघव ज्या अवस्थेतुन जात होता त्यामुळे त्यांचे मन त्याला खात होते. याच कारणामुळे साहजिकच शिल्पाकडेही म्हणावं तेवढं लक्ष देता येत नव्हते.
काहीतरी कामा चे निमित्त करून शिल्पा माहेरी निघून गेली.
महिना झाला. दोन महिने झाले. तरी शिल्पा माहेराहुन परतली नाही.
 
राघव तिला आणण्यासाठी दोन वेळेस गेला. पण ती त्याच्यासोबत आली नाही.
येताना मग तो तिला सांगुन आला,”आता तुला यायचे तेव्हा ये.नसेल यायचे तर मग…”
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

 राघवने पुढचे वाक्य बोलण्याचे टाळले.तीच्या शिवाय राहणे त्यालाही फार ..
पण..त्याच्या सांगण्याचा तिच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. तिने जणू मनाची कवाड बंदच करून घेतली होती.
 आई वडिलांनी तिची समजूत घातली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

******

हळूहळू दिवस जात होते वर्ष दीड वर्ष या गोष्टीला उलटून गेलं. म्हणून मग वडिलांनी सांगितले,” तुला जायचे नसेल तर मग घटस्फोट घेऊन टाक.”
 हे ऐकून,”नाही बाबा मी हा विचार पण नाही करू शकत. मी योग्य वेळेची वाट बघणार आहे.” तिनं असं सांगितल्यावर तीचे बाबा काहिच बोलले नाही.

तीचं उदास उदास राहणे राहणे आईला खटकत होतं.यावर उपाय म्हणून आईनेच तिला घरातच शॉप टाकायचे सुचवले.
“तुझा वेळही जाईल आणि दोन पैसेही तुला मिळतील.”
झालं मग तेव्हा पासुन हिचे शॉप सुरू झाले.
जवळ जवळ गेली पाच वर्षे तीचं हेच चालु होतं.

******
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.


राघव निघुन गेला होता.पण हिच्या मनाला एक न्यारीच हुरहूर लावुन गेला होता.कमीत कमी त्यांचा फोन नंबर घ्यावा. हेही तिला सुचले नव्हते.
मनाच्या त्या कप्प्यावर जमलेली पानगळ हलक्याशा वार्याच्या झोताने पांगल्या सारखी
झाली होती.


दुसऱ्या दिवशी राघव त्याच्या आईला घेऊन शॉप मध्ये हजर.
त्याला पाहून तीला बरेच वाटले.पण आई सोबत आहे म्हणजे नक्कीच साड्या बदलुन पाहिजे असणार आहे.असा तिने मनाशी अंदाज लावला.
तीने हसुन दोघांचंही स्वागत केले.
आणि बसल्यावर आईंचा चरणस्पर्श तीने केला.आणि हलकेच राघव च्या पायाला ही स्पर्श केला.
 त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.राघवचे वडिल गेले हे कालच तिला कळले होते.
त्यामुळे या विषयाला बगल देत ती त्यांच्याशी गप्पा मारत होती.
काही वेळा नंतर आई शिल्पाला म्हणाल्या,
“शिल्पा माझं तुझ्याकडं एक काम आहे, करशील?”
“करेन ना, होण्यासारखे असेल तर नक्की करेन.” 
थोडे थांबून परत तीच म्हणाली,”काय साड्या आणखी भारीच्या घ्यायच्या आहेत का? तर घ्या.दाखवते कोणतीही घ्या.”
“नको बाई गं साडीचा काय घेऊन बसलीस.
मला वेगळंच काही पाहिजे आहे.”

“???”

“आपल्या घरी परत चल पोरी. तु नाही तर घरातलं घरपण हरवलं आहे.धाकला त्याच्या बायकोला घेऊन नोकरीच्या गावी राहत आहे.आमी दोघंच इथं आहोत. म्हणुन शिवानीला ठेवून घेतली आहे.अगं चिमणे तुझं माझं काही झालं असलं तर विसरून जा बाई. पण त्याची शिक्षा राघवला नको देऊ. असा संसार मोडुन नकोस बाई.”

हे ऐकुन तीच्या बंद कवाडं उघडण्यासाठी कुणी  घणाचे घाव घालत आहे असे तीला वाटले.

“चल, पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात कर.नाही म्हणु नकोस.”असं त्या विनवणी च्या सुरात म्हणाल्या.

“पण आई…माझा इथे हा एवढा व्याप वाढला आहे,तो सोडुन नाही येऊ शकत मी.”असे तीने सांगितले. 

खरं तर तीला ही बर्याच वेळा असं वाटलं होतं की आपण राघव कडे परत जावं पण.. तीने मनाला आवरलं होतं.

असेच एके दिवशी तीची मैत्रीण, गुबगुबीत गोर्या पान इवल्याशा परीला घेऊन म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ड्रेस घ्यायला आली होती.त्यावेळी हीची मातृत्वाची आस तीव्रतेने जागी झाली होती.

”ते तु मला काही सांगु नकोस,राघवचे भरलेले घर मला पाहायचे आहे.म्हणजे मी माझ्या मालकांकडे (पति) जायला मोकळी होईन. आता तुच त्याच्या जन्माची सोबतीन हायेस.माझं काय पिकलं पान, कवा गळुन पडल काही सांगता येत नाही.”
शिल्पाचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या.
आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

शिल्पा पुढे हा पेच उभा राहिला होता.उभा केलेला हा डोलारा, शिवाय दोन जणींची चुलही यावरच अवलंबुन होती.
तीच्या मनात चाललेली उलघाल आईंनी ओळखली.
“अगं दोन पावलं तु मागं घे, तो दोन पावलं माघार घेईन.पर ही नवी सुरुवात होऊ द्या.”

असं म्हणत तीने राघव ला जवळ बोलावले.आणि त्याचा हात तिच्या हातात देत त्या म्हणाल्या,”सुखाने संसार करा.तो बाळकृष्ण केव्हाची तुमची वाट बघतो आहे.चला.”
असं म्हणत त्यांच्या डोळ्यातुन गंगा यमुना जणु आशिर्वादा साठीच खळाळत गालावरून खाली ओघळल्या.तेथील पोरींनी पटकन जाऊन थोडी फुले आणली. आणि त्या दोघांच्या डोईवर टाकली.
(ही कथा पुर्ण पुणे काल्पनिक आहे.)


@सौ.शुभांगी सुहास जुजगर.
 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या