फॉलोअर

अधिक मास: माहिती आणि कथा...

 अधिक मास: माहिती आणि कथा...


उद्या, दि.१८जुलै २०२३.

म्हणजेच मंगळवार.

 या दिवसा पासुन 'अधिक मास' चालु होत आहे.

अत्यंत पवित्र असा हा महिना आहे.


पौराणिक कथे प्रमाणे या महिन्याला पुरूषोत्तम मास असेही नाव दिले आहे.ते कसे?

जाणुन घेऊया..


अधिक मास हा दुःखी होऊन श्री. विष्णू कडे गेला. भगवंताने त्याचे सर्व गाऱ्हाणे ऐकून घेतले.आणि त्याचे दुःख जाणले.

 "मला काहीतरी आधार द्या." असं तो म्हणाला. 

"मला कुठल्याच देवतेचा आधार नाही."

हे ऐकल्यावर भगवंत त्याला घेऊन गेले. आणि समोरील दृश्य दाखवले.

व म्हणाले,"हे पूरूषोत्त भगवानआहेत हेच

तुझे दैवत."

भगवान विष्णूंचे हे बोल ऐकून, अधिक मास म्हणजेच मलमास खुप आनंदी आणि प्रसन्न झाला.

श्री.विष्णूंनी त्याचे दुःख ऐकुन त्याला स्वतः चे नाव दिले.म्हणुनच या महिन्याला 'पुरूषोत्तम मास' असे नाव आहे.

या महिन्यात भगवान विष्णूंची आराधना, भक्ती केल्यास तीचे विशेष असे फळ मिळते.


हिंदू धर्माच्या कालगणनेप्रमाणे प्रत्येक महिना हा, कोणत्या न कोणत्या देवतेचा प्रिय महिना आहे.ती देवता त्या महिन्याची स्वामी असते.

परंतु या अधिक मासात, कोणत्याही देवतेला किंवा ईश्वरराला स्वतःची पूजा करण्याची इच्छा नव्हती. 

यामागे सुद्धा एक कारण आहे. ते म्हणजे? 

हा अधिक महिना दर तीन वर्षांनी येत असतो. आणि तीन वर्षापर्यंत कोणतीही देवता, आपल्या पूजेपासून वंचित राहू शकत नव्हती. म्हणजेच या तीन वर्षापर्यंत देवतेला आपल्या पूजेसाठी वाट पहावी लागणार होती.म्हणूनच त्या महिन्याचा कोणीही स्वीकार न केल्यामुळेच, त्याला मलमास असेही म्हटले जाते.


सर्वसामान्यपणे तीन वर्षांनी हा अधिक मास येतो .

हिंदू कालगणनेनुसार, चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिने होतात. या बाराही महिन्याचे साधारण ३५५ दिवस होतात. आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे ३६५ दिवस असतात. हे दहा दिवस तीन वर्षांनी, तीस दिवस झाल्यावर एक महिना अधिक करून ही कालगणना बरोबर केली जाते.


दर 33 महिन्यांनी अधिक मास येतो. सूर्य वर्षातील बारा राशीपैकी प्रत्येक महिन्यात, एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. अशा मेष राशी पासून मीन राशि पर्यंत एका वर्षात बारा संक्रांति होतात. चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यांतील प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. तीस महिन्यांनी असा महिना येतो की त्यात संक्रांत नसते. 

अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते. तर पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते.

 याच बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना असे म्हणतात. या महिन्याला तो ज्या महिन्याच्या जागेवर असतो, त्या महिन्याचे नाव दिले जाते. जसे श्रावणाच्या जागी असल्यावर त्याला 'अधिक श्रावण' आणि त्यानंतर येणारा श्रावण म्हणजे 'निज श्रावण' असे होय.

या अधिक महिन्यात संक्रांत नसल्याने चंद्र सूर्याच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये, म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे माणसाच्या शरीरावर या बदललेल्या वातावरणाचा परिणाम जाणवणार नाही.आणि आरोग्यच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.


हे केल्यास मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते. त्याची इच्छित मनोरथ पूर्ण होतात. 

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


हा महिना मोठ्या पर्वा प्रमाणे असतो. या महिन्यांमध्ये धार्मिक व्रते करतात.

काही व्रत आणि नियम..

*रोज एकदाच फलाहार करावा.

*नक्त भोजन करावे दिवसा न जेवता फक्त रात्री पहिल्या प्रहरात एकदा जेवावे.

*रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवापुढे सतत तेवत ठेवावा.

*गाईला दररोज नैवेद्य किंवा गोग्रास द्यावा खाऊ घालावा.

*'अधिक मास महात्म्य' हेही दररोज वाचु शकता.

*33 अनारसे किंवा तेहतीस बत्तासे खारका सुपाऱ्या याचेही तुम्ही दान करू शकता.

यापैकी जे जमेल त्याचे पालन करावे. 

*तुम्ही या महिन्यात दिप दानही करू शकता.

*तसेच तुम्ही 'ओम नमो भगवते वासुदेवाय'

हा भगवान विष्णू चा मंत्र. याचा जप करावा.


आणखी,

या पवित्र पुरूषोत्तम मासात तीर्थ यात्रा, तीर्थस्नान, धार्मिक उपासना, पूजा आणि जप, तप वगैरे धर्माचरण केल्याने पुण्य लाभ होऊन, जीवनाचे सार्थक होते. पुरुषोत्तम व्रताने जीवन सुखमय शांतीमय आणि समृद्धीने भरते.

या महिन्यात विष्णूंचे षोडशोपचारे पुजन करावे. श्रीमद्भगवत गीतेतील 'पुरुषोत्तम अध्यायाचे' वाचन, श्रीराम कथेचे पठण, विष्णुसहस्रनाम या स्तोत्राचे पठण, तसेच भगवद्गीतेचे ही वाचन तुम्ही करू शकता.


ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात.


कहाणी अधिकमासाची ( पुरुषोत्तम मास कथा )

 पुरुषोत्तमदेवा तुमची ही कहाणी. सर्वांनी वाचावी, श्रद्धेने श्रवण करावी.


 आटपाट नगरात ,अवंतीपूर नावाचं एक शहर होतं. तिथे दोघे भाऊ राहात होते. 

ते स्वभावने खुप चांगले होते. गरीबीत ते आनंदाने राहत होते.

मोठ्या भावाच्या बायकोचं नांव होतं रूपवती, लहान भावाच्या बायकोचं 

होतं मुग्धा. 

एकदां ते दोघेही भाऊ व्यापारासाठी परगांवी गेले. तेव्हांपासून मोठी जाऊबाई राणीसारखी बसून राहत होती.


धाकट्या जावेला तर तीने नोकरानीच केले. तीच्याकडुन सगळीच कामं करवून घेऊ लागली.तरीही तिच्यावर सारखी रागवु लागली. ओरडुन लागली.

एकदां तर रूपवती एवढी संतापली कीं तिनं या लहान जावेला घराबाहेर काढलं. बिचारी गरीब गाय.एका शेजारणीच्या ओसरीवर राहूं लागली.


काही दिवसातच..

त्या वर्षी अधिकमास आला. रूपवतीनं पुरुषोत्तमव्रताची तयारी केली.मुग्धाला वाटलं आपणही तें व्रत करावं. 


म्हणून ती जावेच्या घरीं गेली, 

म्हणाली, "जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तमव्रत करायची माझी पण इच्छा आहे. परंतु मला त्या व्रताची कांहीच माहिती नाहीं. तुम्ही मला सगळा व्रतविधि सांगाल का?"

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात


ती कपटी आणि दुष्ट. ती मुग्धाला म्हणाली, "तूं आहेस बावळट,आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते."

मुग्धा नाराज झाली आहे.असं बघुन ती परत म्हणाली,

"पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन तें दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाहीं." तीनं हे कबूल केलं. मोठीने कपट भावाने आणि दुष्टपणानं उगीच खोटंनाटं रचून तिला सांगितलं. 

म्हणाली,"अधिकमास म्हणजे मलमास. या महिन्यांत आपणही मलिन राहायचं. गढूळ पाण्यांत स्नान करायचं. मळलेली वस्त्रं वापरायचीं, शिळेपाके, पदार्थ खायचे.घाणेरडे शब्द बोलायचे.न उजवलेला अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, 'पिंपळा पिंपळा, माझ्या घरी जेवायला ये.'असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल."


मुग्धाला हे खरं वाटलं. ती रोज अस्वछं राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरीं जेवायला बोलावू लागली. होतां होतां उद्यापनाचा दिवस आला. रूपवंतीनं १०८ ब्राह्मणांना 'जेवायला या' असं सांगितलं.

 

तिचं ऐकून मुग्धानंही ब्राह्मणांना 'जेवायला या' असं सांगितलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तीला आपल्या गरिबीची जणीवच राहिली नाही. रोजच्या प्रमाणं ती पिंपळाला म्हणाली, "देवा देवा, माझ्या घरीं आज उद्यापन आहे. 

तूं जेवायला ये."

तेव्हां पिंपळातून श्रीविष्णु प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून,

 ते तिला म्हणाले.

"ठीक आहे. मी जेवायला येतो. कोणी विचारलंच, तर 'आपला भाऊ जेवायला येणार आहे' असं सांग."


हिचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरांत काय होतं नव्हतं तें गोळा करून, कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यांत श्रीविष्णु जेवायला आले.

 ते तिला म्हणाले,"ताई, बाहेर १०८ ब्राह्मण जेवायला आले आहेत."

हे ऐकून ती विचार करू लागली.'धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नाही, मग १०८ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार?' 

घरांत अन्नाचा तुटवडा होता. आतां काय करायचं?


श्री.विष्णूना तिची चिंता कळली. आणि ती दुर करायची असं ठरवलं.

ते मुग्धा ला म्हणाले,"अगं बाई आतां असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण." 

मुग्धानंही विष्णूच्या सांगण्याप्रमाणं केलं. मग विष्णूनं त्या पानाचे १०८ तुकडे केले. द्रोणाचे १०८ तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले.


मग मुगधेनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हां श्रीविष्णूच्या कृपेनें १०८ पात्रं पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले जेवले, तृप्त झाले आणि मुग्धाला अनंत आशीर्वाद देऊन गेले.


तिकडे मोठ्या जावेच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहींसे झाले. १०८ ब्राह्मण उपाशी राहिले. त्या सर्वां ब्राह्मणांना हीचा खुपच राग आला.आणि रागानं तिला शाप देऊन निघून गेले. 


परंतु लहान जाऊ अगदी गरीब आहे. तशांत आपण तिला खोटंनाटं सांगितलं आणि तरीही तिनं १०८ ब्राह्मणांना कसं जेऊ घातले?

 याचं मोठीला नवल वाटलं. 

ती तशीच लगबगीनं लहान्या जावेकडे गेली. लहान जावेनी मोठ्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला. 

म्हणाली,"जाऊबाई बघा,तुम्हीं सांगितल्या प्रमाणं मी अधिकमासाचं व्रत केलं. म्हणूनच भगवान श्रीविष्णु प्रसन्न झाले. आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं." 

लहानीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तीभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णु प्रसन्न झाले, हे मोठीने. 

 मनोमन जाणलं. ती खजील झाली.

 तिनं लहान जावेचे पाय धरले. तिची क्षमा मागितली. तेव्हां आकाशवाणी झाली.

ही कथा आपण kusumanjali.com वर वाचत आहात

जे कोणी श्रद्धेनें अधिकमास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन..


त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदांत राहु लागल्या. श्रीपुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या.


त्यांना भगवान श्री. पुरुषोत्तम प्रसन्न झाले. तसेच श्रध्देने व्रत करणाऱ्यांना प्रसन्न होवो हीच सदिच्छा.




सौ.शुभांगी सुहास जुजगर.



(ही पौराणिक कथा आहे. आणि ही सर्व माहिती ही पौराणिक आहे.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या