फॉलोअर

बहरला हा मधुमास : भाग २

 बहरला हा मधुमास : भाग २



तिने स्वतःच्या शिक्षणाला महत्त्व दिले नाही. नव्हे तिने तो विचारही केला नाही. आपले नाही पण भावाचे शिक्षण मात्र, व्यवस्थित कम्प्लीट करायचं हे तिने मनाशी पक्क ठरवलं होतं.

पुढे..

काही दिवसानंतर तिला लग्नाची मागणीही आली, पण तिने,'सध्या नाही, मला लग्न करायचे' असे आईला बजावून सांगितले. 


त्यामुळे मग कोणीही फिरकत नव्हते.मामा, मावशी हे यायचे, आत्या कधीतरी फिरकायची.

त्यातच तीचा ट्युशनचा व्याप आणखीन वाढवला होता. आता संध्याकाळी देखील दोन तास तिचे ट्युशन मध्ये जाऊ लागले.


हळूहळू जयचे शिक्षण पूर्ण झाले. तोइंजिनियर झाला. आणि पुण्यामध्ये चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. आता आपली जबाबदारी पूर्ण झाल्यासारखे सईला वाटू लागले.


"ताईला ट्युशनला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. आणि शेतीची कामेही या दिवसात नाहीत. म्हणून तुम्ही दोघी पण या इकडे, काही दिवस पुण्याला." असा जयचा फोन आला. म्हणून मग दोघेही पुण्यासाठी निघाल्या. 


आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

जय ची वाट पहात,या दोघीही बस स्टॉप समोर थांबल्या होत्या. इतक्यात एक गाडी येऊन त्यांच्याजवळ थांबली. या दोघींना वाटले जयच आला आहे म्हणून.

आई म्हणाली,"बरे झाले बाबा, लवकर आला."

तोच गाडीतून एक गोरा गोमटा, हसऱ्या चेहऱ्याचा आणि बोलक्या डोळ्यांचा तरुण खाली उतरला. आणि या दोघींकडे पाहू लागला. पाहता पाहता म्हणाला,"तू सई आहेस ना?"

" अंऽहो हो." सई अडकत अडकत म्हणाली.  

"मला ओळखलस का?" त्या तरुणाने विचारले. 

"ओळखले,अभय ना तुम्ही? ईशाच्या शेजारी राहत होता." सईने सांगितले.

"छान वाटले ऐकून, ओळख ठेवल्याबद्दल." अभय म्हणाला.

 "होऽ, हा, ही माझी आई." आईकडे हात करून ती म्हणाली.

"नमस्ते आई." आईकडे पाहत अभयने हात जोडले.

थोडे थांबून परत अभय म्हणाला,"इकडे कुठे जायचे? कोणा नातेवाईकाकडे आलात का? कुठे राहतात ते?" असे प्रश्न त्याने विचारले. त्यावर सईने उत्तर दिले,"भाऊ राहतो आहे इथे, अन् तोच आता न्यायला येतो आहे."

"बरं किती दिवस राहणार आहात इथे?"त्याने परत प्रश्न केला.

"राहू कि चार आठ दिवस." आईने सांगितले. आईला तो रुबाबदार तरूण आवडला होता. "ठीक आहे, येतो मी. भेटूच परत. मी आता ऑफिसला जात आहे.तुझा नंबर दे मला. तो गाडीचे दार उघडत म्हणाला.


तो गाडीत बसला.आणि ऑफिस पर्यंत येताना तिच्याबरोबरचे मोजकेच प्रसंग होते. ते तो आठवू लागला.

तिच्याकडे पाहिल्यावर त्याला असेही जाणवले, की तिचे लग्न झालेले नाही. नसावे. पण खात्री नव्हती. जर नसेल तर?या विचाराने, त्याच्या मनातला तिच्याविषयीचा प्रीतगंध, पुन्हा दरवळू लागला.मन हे प्रीत हिंदोळ्यावर बसुन झुलायला लागले.

गाडीतील गणपती बाप्पाच्या मुर्ती कडे बघुन, डोळ्यांनीच बाप्पांला नमस्कार केला.आणि आज त्याने गाडीत त्याच्या आवडीचे गीत प्ले केले.

   'मेरे सपनोकी राणी कब आयेगी तू,

  बीती जाए जिंदगानी कब आयेगी तू,

   चली आऽ तू चली आऽ.


दुपारचे चार वाजले होते. सई ला झोपेतून जाग आली.तर आता तिला फ्रेश वाटत होते. रात्रभरच्या प्रवासाचा शीण कमी झाला होता. उठून तिने हातपाय धुतले. आईने तिला चहा घेण्यासाठी बोलावलं.चहा घेणार इतक्यातच फोनची बेल वाजली. तिने बघितले,अभय चा फोन होता. बऱ्याच गप्पा झाल्या.या गप्पांच्या ओघात अभयाने तिचे लग्न झालेले नाही हे ओळखले होते. म्हणून त्यानी तिला सांगितले, "आपण बाहेर भेटुया." 

"अगं तो चहा गार झाला. कधी घेते?"असा आईने आवाज दिला.

"कोणाशी बोलत होती गंऽ एवढा वेळ."

आईने परत विचारलं.

"आपल्याला सकाळी भेटलेला तोच होता ना." तीने सांगितले.

तिने आईला त्याची भेट झाल्यावर त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना दिली होती.म्हणुन ..

"छान वाटला गं पोरगा."आई.

 "ये पोरगा नको म्हणू त्याला. तो काय लहान नाही.एव्हाना तिशी उलटली असेल त्यांची. माझ्यापुढे होता तो दोन वर्ष." असे तिने आईला सांगितले.

"पुढे होता तर तुमची ओळख कशी झाली?" आईची शंका.

"ईशा मुळे झाली.मी तुला सांगितले ना सकाळीच.तो तिच्या शेजारी राहत होता. म्हणजे त्यांची फॅमिली. आणि तो आमच्याच कॉलेजला होता.म्हणुन कधीतरी तिथेही भेट व्हायची.पण पप्पा गेले तेव्हा पासुन मी कॉलेजचे तोंडही पाहिलेले नाही." सई ने सांगितले.

थोडे थांबून ती परत म्हणाली,"आई त्याने मला भेटायला बोलवलं आहे.सकाळी गडबडीत काहीच बोलणे झाले नाही म्हणाला."

"अगं पण तु कसं जाणार?तुला तर काहीच माहित नाही."आईने काळजी युक्त प्रश्न विचारला.

"इथे खाली घ्यायला येतो म्हणाला."  

"सई, नाही तर जय आल्यावर जा." आई म्हणाली.

"नाही. त्याला साडेसात वाजतात घरी यायला. एवढ्या उशिरा नको. मला सहाच्या आधी जायचे आहे." सईने सांगितले. 

"जा पण लवकर परत ये. जास्त वेळ नको लावू." आईची काळजी.

"हो,नक्कीच. उद्या जयला सुट्टी आहे. तर सकाळी आपण दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार आहोत."आईने सांगितले.

"हो जाऊ या ना." असं म्हणून ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कडे निघून गेली.


अभय आणि सई दोघेही आज पहिल्यांदा असे भेटले होते.त्यामुळे सई थोडी बुजल्यासारखीच होती. पण तिला 'नाही' ही म्हणता आले नव्हते. कॉलेजमधले ते अल्लड दिवस आता राहिले नव्हते.


आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.


 गाडीमध्ये दोघेही गप्पच होते. 

म्हणून मग अभयानेच तिला विचारले," तू कॉलेजला परत आलीच नाही."

"हो जमलेच नाही.आणि माझी इच्छाही नाही झाली. घरची सर्व जबाबदारी माझ्यावरच पडली होती. सई म्हणाली.

"नाही. अगं परीक्षा देऊन फायनल कंप्लिट करायचे होते. म्हणजे ग्रॅज्युएशन झाले असते." अभय म्हणाला.

"मी या गोष्टीचा विचारच नाही केला. पण आता नक्की करेन." सईने सांगितलं.

"काय करेल?" अभयचा प्रश्न. 

"ग्रॅज्युएशन पूर्ण करायचा विचार."

"ओके ओके." असं म्हणत त्याने गाडी थांबवली.

दोघेही येऊन बसली कॉफी शॉप मध्ये.तेथे बाजुला निशिगंधा ची मस्त ताटवी डोलत होती.खाली छान हिरवेगार,मऊ मऊ असे बारीक गवत होते.

प्रथम काय घ्यायचे ते ऑर्डर केले. नंतर परत गप्पा..

"मग काय करतेस तू?" अभयने सईला विचारले.

तिच्याविषयीचे सर्व त्याला जाणून घ्यायचे होते.

"माझेच विचारतो आहेस. तुझे सांग ना. तू इथे कसा?"तीने त्यालाच विचारले.

"त्यानंतर वर्षातच पप्पांची बदली झाली. म्हणून मीही इकडे, म्हणजे पुण्याला आलो. आणि मग इथेच शिफ्ट झालो. मित्रांसोबत सहज कंपनीत इंटरव्यू दिला. तर माझे सलेक्शन झाले.पद आणि पेमेंट दोन्हीही चांगले होते. त्यामुळे दुसर्या नोकरीचा विचार सोडून दिला. पुणे सोडू नाही वाटले."त्याने स्पष्टीकरण दिले. ती शांतपणे ऐकत होती. थोडे थांबून परत तो म्हणाला, "दोन वर्षांपूर्वी बहिणीचे लग्न केले, आणि एक वर्षापूर्वी वडील आम्हाला सोडून गेले. त्यावेळी, हे दुःख काय असते? हे कळाले, पण मला सर्विस होती. त्यामुळे जरा चटके कमी बसले."

 हे सांगताना तो भाऊक झाला होता.

तर ऐकताना सईच्याही नेत्र कडा पाणवल्या होत्या. याच दुःखाने ती ही पूर्ण होरपळून निघाली होती.

"खरंच सांगू सई? मला त्यावेळी तुझी तीव्रतेने आठवण झाली. तसंही मी तुला विसरलोच नाही."त्याने सांगितले.

"काय ऽऽ?" त्याचे हे ऐकून तीने जरा मोठ्यानेच विचारले. 

हो सई मी तुला विसरलोच नाही." त्याने स्वतःमध्ये डोकावत सांगितले.

 "म्हणजे?" तीने परत शॉक लागल्यासारखे विचारले.

"हो सई, मी तेव्हाच तुला काहीतरी सांगणार होतो. पण तुझ्या बाबतीत जे घडले त्यामुळे परत तू कॉलेजला आलीच नाही.म्हणुन आपली भेट ही झाली नाही. आज इतक्या वर्षानंतर आपली भेट होत आहे."


आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

इतक्यात वेटर ऑर्डर केलेले घेऊन आला. "ईशा कुठे असते? काही कल्पना."तीने विचारले. हे विचारून तिने विषयाला थोडी कलाटणी दिली. 

"कदाचित आईला माहित असेल. ती कुठे आहे. अभय तिचे लग्न वगैरे कधी झाले?" 

सईने अधिक जाणून घेण्यासाठी विचारले. "आई बाबा दोघेही तिच्या लग्नाला गेले होते." अभयने स्पष्टीकरण दिले.

 सई म्हणाली, "तुम्हा सर्वांच्या मलाही आठवणी येत होत्या. पण घरच्या व्यापात काहीच सुचत नव्हते. त्यामुळे पुस्तकं सुद्धा कधी उघडून बघितले नाहीत. पण आता तू भेटला तर त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला आहे. माझी आणि ईशाची, फक्त एक ते दीड वर्षाची मैत्री. आम्ही दोघींनी इतर मुलींशी कधी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न नाही केला. असो. हा आता इतिहास झाला." सई नेही थोडे मन मोकळे केले.

थोडा वेळ थांबून अभय परत म्हणाला," इथेच या मग तुम्ही पण राहायला.म्हणजे तू आणि आई. भावाचा जॉब चांगला आहे तुझ्या. तुही येथेच काहीतरी कर. सगळे एकत्र राहताल." यावर सईने सांगितले,"सध्या तरी, काही हा विचार नाही. कारण माझे क्लासेस छान चालत आहेत गावी. तेव्हा बघू, विचार तर माझाही असाच आहे."

असेच आणखी बरेच बोलणे झाले. आणि अचानक तिचे लक्ष घड्याळाकडे गेले.

"चला, आता मला निघायला हवं.जय येईलच घरी."ती म्हणाली.

"एवढ्यातचं;"तो.

"मग किती वाजले बघ ना? तुझं वाट पाहणारे कोणी नाही का?" सईने प्रश्न केला.

"हो आहे ना, आई. बायको तर नाही अजून." थोड्या मिश्किलपणे तो म्हणाला.

सईला त्याची चाचपणी करायची म्हणून तिनेही मुद्दामच हा प्रश्न विचारला होता. तिलाही इच्छित उत्तर मिळाले होते.


 अभयने तिला तिच्या अपार्टमेंटच्या गेट जवळ सोडले.

 "पुन्हा भेटूच." असे म्हणून त्याने बाय बाय केले आणि तो निघून गेला.


आणि या भेटीचे म्हणा किंवा फुलू ला

गलेल्या प्रेमाचे पुढे काय होणार?

वाचत राहा..


भाग १

भाग ३


सौ. शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या