फॉलोअर

हरतालिका व्रत आणि कथा पूजाविधी

 हरतालिका व्रत आणि कथा पूजाविधीमन मोहवून टाकणारा श्रावण.

मन हिंदोळ्यावर झोके घेते.

ते ही याच महिन्यात.

असा हा श्रावण महिना संपततो.तो दिवस म्हणजे पोळा.आणि हा सण साजरा झालयानंतर सर्वांना वेध लागतातश्रीगणपती बाप्पाच्या आगमनाचे.

पण महिला वर्गाला गौरीच्या तयारीचे.

त्याआधी येते ते म्हणजे हरितालिका हे व्रत.


भाद्रपद शुद्ध तृतीया, ही तिथी म्हणजे.. समस्त महिला वर्गाला एक ओढ लागते ती म्हणजे हरतालिका या व्रताची. 

हे व्रत..

 कुमारिकांनी 'चांगला पती मिळावा' म्हणून करायचे.तर विवाहित महिलांनी त्यांचे 'सौभाग्य अखंड राहावे' यासाठी करायचे असते.

म्हणूनच प्रत्येक महिला, मुली या व्रताची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात.

या व्रताला 'हरितालिका व्रत'असे का म्हटले जाते?

 हे आपण पाहणार आहोत ..

तर एकदा काय झाले. शंकर आणि पार्वती हे कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. 

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात. 

गप्पा करता करता सहज पार्वती ने भगवान शंकरांना विचारले," हे प्रभु सर्वव्रतां मध्ये चांगले आणि श्रेष्ठ असे कोणते व्रत आहे?ज्यामध्ये श्रम थोडे पण लाभ जास्त मिळतो.असे व्रत मला तुम्ही सांगा."

हा प्रश्न ऐकुन महादेवांनी पार्वती कडे स्मितहास्य करत पाहिले.

म्हणुन पुन्हा पार्वतीनेच विचारले,"मला कोणत्या पुण्याईने तुम्ही पति म्हणुन प्राप्त झाला आहात?"

तेव्हा भगवान शंकर म्हणाले,"जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, तसेच चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहेत.देवतामध्ये भगवान श्रीविष्णू श्रेष्ठ आहेत. तसेच व्रतामध्ये 'हरितालिका व्रत' हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि याच व्रतामुळे तु मला प्राप्त झाली आहे."


"हो का? मला सांगा ना ती कथा! नक्कीच ऐकायला आवडेल मलाही."असे पार्वती ने उत्सुकतेने विचारले.

त्यावर महादेव म्हणाले,"ऐकायला आवडेल तुला?"

"हो, का नाही आवडणार?"पार्वती म्हणाली.

"तर ऐक.."

असे म्हणुन ते सांगु लागले.

तु लहान असताना..म्हणजे लहान पणापासूनच महादेवाची भक्त आहे.

आणि तेव्हा पासूनच तु 'भगवान शंकराची प्राप्ती व्हावी' ह्याच उद्देशाने मोठे कठोर तप केले.त्या मध्ये तु फक्त झाडांची पिकलेली पानं खात होती.कितीही थंडी, वारा, पाऊस, ऊन हे सगळे सहन करत करतच तप करत राहिली आहे.

असे हे, आपल्या मुलीचे श्रम पाहून पार्वती च्या वडिलांना फार फार दु:ख झाले.आणि अशीही तेजस्वी आणि दृढ निश्चयी कन्या कोणाला द्यायची?

हा त्यांना प्रश्न पडला.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

इतक्यात तिथे नारद मुनींची स्वारी प्रकट झाली.

या नारदमुनींचे हिमालय राजानी खूप खूप मनापासून स्वागत केले. आणि त्याची मनोभावे पूजा करून, त्यांना येण्याचे कारण विचारले. 

तेव्हा नारदमुनी म्हणाले, "तुझी कन्या म्हणजे पार्वती, ही आता उपवर झाली आहे.सर्व गुण संपन्न अशी ही तु भगवान श्रीविष्णूला द्यावी, म्हणजेच तिचा विवाह श्री विष्णूंशी लावुन द्यावा.अगदी तिच्या योग्य वर आहे, त्यांनीच मला तुझ्याकडे पाठवले आहे. म्हणूनच मी आलो आहे." असे सांगितले.

हिमालय राजाला खूप मोठा हर्ष वाटला..हे अहोभाग्य माझ्या मुलीला लाभणार आहे. या कल्पनेत त्यांनी यासाठी होकार देउन टाकला.आणि त्या नंतर नारदमुनी तिथून दुसरीकडे निघून गेले. 


नारदमुनी निघुन गेल्यानंतर राजाने आपल्या मुलीला ही गोष्ट सांगितली. पण तिला ती आवडली नाही.

 म्हणुन ती खूप रागावली.चिडली. आणि कोपभवनात जाउन बसली.

नाराज असलेल्या पार्वती ला बघुन मग तिच्या मैत्रिणींनी तिला विचारले,"तुझ्या रागाचे कारण सांगना आम्हाला."

तेव्हा मग पार्वती म्हणाली."भगवान श्री शंकरा शिवाय मी कुणालाच पति म्हणुन स्वीकारूच शकत नाही.असा माझा दृढ निश्चय आहे."


यावर उपाय म्हणून मग तीच्या या सख्यांनी, गुपचुप तिला अरण्यात नेले. आणि तिथे एका नदी किनारी त्या थांबल्या.तर तिथे त्यांना जवळच एक गुहा दिसली. आणि मग या गुहेमध्ये जाऊन पार्वतीने उपवास केला. तिथे वाळुचे शिवलिंग पार्वतीसह स्थापन केले. आणि त्याची पूजा केली. पूजेमध्ये जवळपासचे सगळे पर्ण आणि जी फुल मिळाली ती वाहिली. आणि दिवसभर उपवास केला. रात्री जागरण ही केले.

 

तो दिवस म्हणजेच 'भाद्रपद शुद्ध तृतीयेचा' होता. आणि पार्वतीच्या त्या पुजेच्या पुण्याने कैलासतील महादेवाचे आसन डळमळीत झाले. आणि म्हणून मग महादेवाने इथे येऊन म्हणजेच या अरण्यात येऊन दर्शन दिले.

 आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

"हे मुली,मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय वर पाहिजे तो माग."असे ते पार्वती ला म्हणाले.

पार्वती म्हणाली," हे देवा, तुम्हाला मी मनापासून नमस्कार करते. आणि मला तुम्ही पती रूपात मिळावेत, यासाठीच मी हे सगळं करत आहे. दुसरी माझी कुठलीच इच्छा नाही."

"तथास्तु" म्हणून भगवान महादेव तेथुन अदृश्य झाले.

 

पुढे दुसऱ्या दिवशी, पुजलेल्या शिवलिंगाची उत्तर पूजा करून, ते वाहत्या नदीतील पाण्यात विसर्जित केले. मैत्रींनीं सहित त्यांचे पारणे केले.


त्यानंतर पार्वतीला शोधत शोधत तिचे वडील तिथे येऊन पोहोचले.

आल्यावर त्यांनी पार्वतीला, येथे येण्याचे कारण विचारले.

 मग पार्वतीने सगळी हकीगत त्यांना सांगितली. 

यावर ,"तुझे लग्न मी महादेवांशी लावून देईन." असे वचन दिले.

 त्यानंतर मग सगळे घरी आले.


काही दिवसांनंतर एका सुमुहूर्तावर भगवान शंकराचे आणि पार्वतीचे लग्न झाले.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

पार्वतीने केलेल्या या व्रतालाच 'हरितालिका व्रत' असे म्हणतात.

गौरीच्या रूपातील पार्वतीने, शिवालाच आपला पति मानले होते.आणि यासाठीच कठोर असे तप अन् हे व्रतही तीने केले होते.म्हणुन तीच्या मैत्रिणींनी, तीला कोणालाही न सांगता लांब जंगलात नेऊन,

 हे व्रत केले.

हरन करून हे व्रत केले म्हणुन या व्रताला 'हरितालिका व्रत'हे नाव पडले आहे.


हे व्रत करण्याची विधी..

ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल,

 त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी काढून महादेवाचे, वाळूचे पार्वती सहित लिंग स्थापन करावे.षोडशोपचारे त्याची पूजा करावी. नंतर निरांजनाने आरती ही करावी.मनोभावे त्याची प्रार्थना करावी. आणि थोडी फुले पाने पत्री रूपी असे सगळे वाहून मनोभावे प्रार्थना करा. आणि नंतर ही हरितालिकेची कहाणी अवश्य वाचावी.

शक्यतो त्या रात्री जागरण करावे.

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

याव्रताने मानवप्राणी पापा पासून मुक्त होतो. साता जन्माची पातक नाहीसे होते.ईच्छित फल प्राप्त होते.स्त्रियांचे सौभाग्य वाढते.या 

दिवशी व्रत करणाऱ्याने काही खावू नये.म्हणजेच उपवास करावा.


ही कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती दाने द्यावीत. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी. आणि व्रताचे विसर्जन करावे.


सामान्यतः हे व्रत कुमारिकांनी आणि सौभाग्यवती स्त्रियांनी केले पाहिजे, विधवा महिलांनी केले तरी चालते.


हरितालिका व्रत, हे एकदा सुरू केले की मध्येच सोडता येत नाही. प्रत्येक वर्षी हे पूर्ण नियमाने करायलाच पाहिजे.


हे व्रत केल्यानंतर, रात्री जागरण, काही मैत्रिणी मिळुन करायला हवे.


हे व्रत ज्या घरात होते, तेथे सुख, सौभाग्य, अखंड नांदते.


 असं पुरणामध्ये सांगितलेलं आहे.


देवी हरतालिके ची ही आरती..


जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।धृ।।

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

अर्धांगी वसशी। जाशी याज्ञा माहेरासी।

तेथे अपमान पावसी। यज्ञकुंडी गुप्त होसी।

तुजय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।१।।


 जन्मसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।

 उग्र तपश्चर्या मोठी। आचारसी उठा उठी।

जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।२।।


ताप पंचाग्नि साधनें। धूम्रपाने अधोवदनें।

 केली बहु उपोषणे। शंभू भ्रतारा कारणे।

जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।३।।


 लीला दाखविसी दृष्टी। हे व्रत करिसी लोकांसाठी।

 पुन्हा वरिसी दुर्जटी। मज रक्षावे संकटी।

जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।४।।

आपण ही कथा kusumanjali.com वर वाचत आहात.

काय वर्णूतव गुण। अल्पमति नारायण।

 माते दाखवी चरण। चुकवावे जन्म मरण।

जय देवी हरितालिके।सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीते। ज्ञानदीप कळिके।।५।।


(ही संपूर्ण माहिती पुराणातील आहे 🙏🏻)

सौ.शुभांगी सुहास जुजगर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या