बहरला हा मधुमास : भाग १
"सनी अगं काय करते आहेस हे?" बेडरूम मध्ये येत ईशाने विचारले.
"अगं ममा, मी माझा घागरा आणि ओढणी शोधते आहे.आपल्याला फंक्शनला जायचे आहे ना संध्याकाळी?" सनीने सांगितले.
तिने बरेच कपडे कपाटातून खाली काढले होते.
"अरे देवाऽ, मला सांगायचं ना, मी शोधून देते तुला.तू राहू दे बरं." असं म्हणत ईशानी तिला कपाटापासून बाजूला केले. आणि तिला बेडवर बसवले.
"मला कोणता घागरा घालायचा आहे. तुला काय माहित??" असं जरा चीडुन म्हणाली.
"हो बाई, मी दाखवते ना तुला. तूच निवड कोणता घालायचा आहे तो. पण आता हे सगळे कपडे, साड्या तू बाहेर काढले आहेस. त्या कोणाआवरणार?" असं ईशा चिडून म्हणाली.
थोडं थांबून सनी म्हणाली," अऽऽ मीच आवरेन ना."
"होऽ म्हणे मी आवरेन ना. आली मोठी आवरणारी." कपाटातून सनी चे कपडे काढत ईशा म्हणाली.
सनी, ईशाची सहा वर्षाची मुलगी.
आज संध्याकाळी, ईशा आणि तिची फॅमिली तनिष्क हॉलला लग्नाच्या रिसेप्शन साठी जाणार होती. निशाची कॉलेजमधील मैत्रीण सई.
सईचे नुकतेच लग्न झाले होते. आणि तिच्याच लग्नाचे हे रिसेप्शन होते. तिने हे शुभमला सांगितले. आणि संध्याकाळी लवकर येण्यासाठी सुचवले होते. हेच सनीने ऐकले.आणि लगेच कपाट उघडून, बाईसाहेब घागरा ओढणी शोधू लागल्या. जो तीला या कार्यक्रमासाठी घालायचा होता.
सई ही ईशाची मैत्रीण. कॉलेजमध्ये असतानाची. म्हणजे फर्स्ट इयरची. या दोघी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीही बी.एस.सी. करताना सोबत होत्या.'तिचे लग्न झाले ' हे ऐकून तिला खूपच बरे वाटले होते. जरा उशिरा का होईना. पण झाले. तिचे म्हणजे ईशाचे लग्न होऊन आता.. म्हणजे जवळजवळ आठ वर्षे उलटली होती. ती दोन मुलांची आईही झाली होती.
ही कथा तुम्ही kusumanjali.com या लिंक वर वाचत आहात.
काही असो..
पण आज, तिच्याबरोबरच्या सगळ्या आठवणी फेर धरून, तिच्या भोवती नाचू लागल्या. आणि तिच्या मनाचे फुलपाखरू त्या आठवणींवर जाऊन बसले.
ईशा आणि सई कॉलेजमधील मैत्रिणी. दोघीही बी.एस.सी. करत होत्या. सई जवळच्याच गावातून दररोज कॉलेजला येत असे. तर ईशाचे घर, कॉलेज पासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते. दोघी एकच बेंचवर बसत असत. म्हणुनच या दोघींची मैत्री झाली. ईशाचे वडील याच शहरात नोकरी करत होते. पण सईचे बाबा गावी शेती करत होते. परिस्थिती बेताचीच होती. सईची इंजिनियर होण्याची इच्छा होती. पण.. वडिलांनी तयारी दाखवली नाही. त्यामुळे मग ग्रॅज्युएशन करण्याचा तिने निर्णय घेतला. त्यामुळे तिचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पण सध्या तरी तिच्यासमोर ग्रॅज्युएट व्हावे. हेच ध्येय होते. दिसायला ती छान होती. रंग गोरा.. आणि हसरा चेहरा.. नेहमीच असायचा. केस हलकेसे कुरळे होते. त्यांना ती नेहमीच एक क्लचर लावायची. तेच तिला छान दिसत होतं.
एक दिवस कॉलेजमध्ये लंच ब्रेक झाला. पण सई उठलीच नाही.
"ये चल ना. लंच ब्रेक झाला आहे मॅडम." ईशा म्हणाली.
"नाही, अगं आज मी टिफिन आणलेला नाहीये. तु जा, मला नाही यायचं. मी इथेच बसते वाचत." सईने शांतपणे सांगितले.
"का गं?" ईशाने परत विचारले.
"अगं झालाच नाही. आज डबा. कारण जरा दादाला म्हणजे वडिलांना बरं नव्हतं."असं तिने सांगितलं.
पण सांगताना तिचा चेहरा उदास झाला होता. हे ईशाच्या लक्षात आले.
म्हणून मग तीने विचारले, "सई आपलं पुढचं लेक्चर कशाचे आहे?"
कारण असं एकटीला सोडून तिलाही जावेसेच वाटत नव्हते. तिने विचारले, पण दुसऱ्याच क्षणी तिच्या लक्षात आले की पुढचे लेक्चर कशाचे आहे.
त्यामुळे मग,"आपण घरी जाऊया. मी पण टिफिन नाही आणलेला आज." असं म्हणून दोघेही घरी यायला निघाल्या.
घरी आल्यानंतर त्यांच्या शेजारचा अभय हा, पप्पा सोबत हॉलमध्ये गप्पा मारत बसला होता. नकळत अभयची आणि सई ची नजरानजर झाली.नंतर थोडेसे बोलणेही झाले.
ईशा आणि सई या दोघीही काहीतरी चाऊ म्याऊ खाऊन कॉलेजमध्ये परतल्या.
त्यानंतर ही बऱ्याच वेळा या दोघांची भेट कॉलेजमध्ये, या ना त्या निमित्ताने होत होती.
काही भेटीच्या नंतर अभयला जाणवले की आपल्याला ही आवडु लागली आहे.नव्हे आपण चांगलेच तिच्यात गुंतत चाललो आहोत.
तिचे हसणे,सहज बोलणे, हळुच गालावरची बट बाजुला करणे.या तिच्या अदा माझ्या मनाची पकड घेत आहेत.
'पाहुनी तुझ्या या मोहक अदा ,
झालो मी तुझ्या वर फिदा.
'पण एवढ्यात काहिच सांगायचे नाही.'असेच त्याने ठरवले.मैत्रिच्या वर्तुळात भेटणे होतच होते.
अभय, हा म्हणजे ईशाच्या कॉलनीत राहणारा मुलगा होता. त्याचे वडील येथे नोकरीला होते. म्हणून तो येथेच म्हणजे ईशाच्या घराच्या दोन घरं पुढेच त्यांचे कुटुंब किरायाने राहत होते.त्याला एक बहिण होती.ती आता अकरावीला होती.तो ईशाच्याच पण सीनिअर कॉलेजला होता.आणि सिव्हिल सर्व्हिसेस ची तयारी करत होता.
ईशाचे आणि सईचे हे तिसरे वर्ष चालू झाले होते.अभ्यास वाढला होता. कारण कुठलाही विषय बॅक राहायला नको म्हणून.
एके दिवशी सकाळी सई उठली. कॉलेजला जायची म्हणून भरभर आवरत होती.तर वडिलांचे एकदम ओरडणे तिच्या कानावर पडले.लगेच तिच्या आईची हाक तिच्या कानावर पडली."अगं सईऽऽ हे बघ कसे करतायेत??" घाबरूनच तिने येऊन बघितले पण तिलाही काही कळेनाच 'नेमके काय होत आहे म्हणून?' मग लगेच क्षणाचाही विलंब न लावता ती शेजारच्या काकांना बोलवायला गेली.
काही वेळातच त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले दिवस उपचार चालू होते पण तिथेही त्यांना या तिघांनापोरकं करून ते निघून गेले
सई ला एक छोटा भाऊ होता जय नावाचा त्याचे तो इयत्ता नववीत होता वडील शेतीच करत होते शेती स्वतःची थोडीच होती पण इतरांची कामेही शेतीची कामे ते करत होते फक्त मुलांनी शिकावं असं त्यांना वाटत होतं आई ही थोडीफार शेतीच्या कामे करायला जात होती पण तिची प्रकृती जरा नाजूकच होती जास्त काम तिला होत नव्हती हे असे म्हणजे पतीच्या अकस्मिक जाण्याने तिच्या मनाला एकदम शॉक बसला होता बाई दीड महिना कोमातच होती
ईशाला आहे कळाल्यावर,ती पप्पांना सोबत घेऊन सईच्या भेटीसाठी आली. आणि तिला तू केव्हाही कॉलेजला ये मी तुला सगळ्या नोट्स तयार ठेवते असं सांगून गेली अभयनेची ईशा कडे सगळी चौकशी केली. जे झाले ते कळाल्यावर त्यालाही खूपच वाईट वाटले होते.
सई ने मात्र या घटनेनंतर कॉलेजचे तोंडही पाहिले नाही. तिचा शिक्षणातील रस कमी झाला होता. ज्या वडिलांसाठी ती कॉलेज करत होती. तेच आता राहिले नव्हते.
पण काही दिवस गेल्यानंतर, घरातली आर्थिक परिस्थिती ढासळली. आई ही कोमात होती. घरही चालवायचे होते. आणि भाऊ लहान होता. एकदमच सर्व कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. शिवाय शेतीत हिला काहीच काम करता येत नव्हते.
दीड महिन्यानंतर आई शुद्धीवर आली. तेव्हा जरा हिला हायसं वाटलं. पण तरीही आर्थिक प्रश्न कायमच होता. आईला मदतीला घेऊन मग हीच शेतात काही काही काम करू लागली. मामाचा थोडाफार तिला आधार होता.
पण शेतीतून पीक कधी येणार ?असा तिला प्रश्न पडला.इथे तर रोज पैसे लागतात घरात ??
त्यावेळी वडिलांचे छत्र डोक्यावर असण्याची किंमत तिला कळली.
ही कथा तुम्ही kusumanjali.com वर वाचत आहात.
मग तिनं ट्युशन घ्यायला सुरुवात केली. गावात दहावीपर्यंत शाळा होती. त्यामुळे ट्युशनला मुले मिळाली. सुरुवातीला दोन विद्यार्थी होते. मग आणखी दोन आले. आणि मुलगी ट्युशन घेते आहे, म्हटल्यावर मुलीही येऊ लागल्या.मग हिलाही हुरुप आला शिकवण्याचा.
त्यानंतर तिने वर्गाप्रमाणे बॅच केल्या.सकाळी दोन तास तिचे त्यासाठी राखीव झाले.त्यानंतर मग ती घरात हवं नको बघायची. काही आणने असेल तर ते करायची.नंतरच्या वेळात शेतीची कामे.असं तिचं रुटीन ठरलं.आणि या सर्व गडबडीत तिने स्वतःच्या शिक्षणाला महत्त्व दिले नाही. नव्हे तिने तो विचारही केला नाही. आपले नाही पण भावाचे शिक्षण मात्र, व्यवस्थित कम्प्लीट करायचं हे तिने मनाशी पक्क ठरवलं होतं.
बघुया पुढील भागात
भावाचे शिक्षण पुर्ण होईल का?
हिचे लग्न होईल का?
सौ. शुभांगी सुहास जूजगर.
1 टिप्पण्या
Very nice article.
उत्तर द्याहटवा